एक आगळा वेगळा अनुभव –
शेंझेन प्रांतातील टर्मिनलमेंदूच्या कॅन्सरने ग्रासलेल्या अवघ्या ११ वर्षाच्या लीआंग योयीचे स्वत:चे जगणे अशक्य आहे हे
माहित असतानाही आपल्यासारख्या अन्य रोग्यांना जीवन देण्याचे सत्कार्य अगदी
मृत्युशय्येवर असतानाही कसे करता येईल, ह्याचा एक प्रामाणिक व मानवीय वस्तुपाठच
जगासमोर ठेवला आहे. दोस्तहो, हि उदात्तता, मानावाप्रती असलेली कळकळ आणि निर्भयता
मृत्युच्या छायेतही दाखवली, हे विशेष.
मित्रानो, ह्या चिमुकल्या
जीवाने जग सोडताना आपल्या जीवन-संग्रामाच्या अखेरच्या टप्प्यावर, तेथील डॉक्टरापाशी
आपली अवयव दानाची इच्छा व्यक्त केली तो म्हणाला, जगात कितीतरी मोठी माणसे आहेत, अन
मलाही त्यांच्या सारखे मोठे व्हायचे आहे.
शुक्रवारी ह्या डॉक्टर होण्याची
इच्छा बाळगणारा लीआंग योयी देवाघरी गेला. त्वरित
डॉक्टरांनी त्याची किडनी आणि लिवर काढण्याची तयारी केली व त्याचे प्रत्यारोपण
दुस-या रोग्यांच्या शरीरात केले. जसे लीआंग योयीचे मृत शरीर स्ट्रेचर वरून ऑपरेशन कक्षातून बाहेर काढण्यात आले
तसे सर्व डॉक्टर्स तेथे जमले व त्याला स्तब्ध उभे राहून वाकून मनाचा निरोप दिला.
अवयव दान |
ह्या बातमीने व फोटोने जगात
उत्फूर्त अशी प्रतिक्रिया उमटली. लीआंग योयीने अखेरच्या क्षणात दाखविलेल्या हिमतीचे व माणुसकीचे कौतुक
झाले व त्याने अनुसरलेल्या मार्ग अनेकांना स्पर्शून गेला.
दोस्तहो, जीवनाची सरगम
अल्पायुषी आहे, हे माहित असूनही आपण ह्या मर्त्य शरीराचाच विचार करतो. मात्र लीआंग
योयीने हि सरगम दीर्घायुषी कशी करता येईल हेच अवयव दान करून दाखवून दिले आहे. ‘केव्हडे हे औदार्य!’
विनम्र सलाम, मुजरा,
नमस्कार!
प्रकाश पटवर्धन
No comments: