पाकिस्तानच्या आय.एस.आय. ने
लष्कर आणि जैसे मोहम्मद या अतिरेकी संगठनाना हाताशी धरून आयोजिलेला भारतीय
संसदेवरील डिसेंबर १३, २००१ ला केलेल्या
हल्ल्यात पांच अतिरेकी पांढऱ्या अम्बेसेडर गाडीतून संसदेच्या परिसरात घुसले व गोळीबार
सुरु केला. ह्यावेळी संसदेचे कार्य ४० मी करिता तहकूब करण्यात आलेले होते.
तत्कालीन गृह मंत्री व काही अधिकारी सदनात उपस्थित होते. त्यानंतर सुरु झालेल्या
गोळीबारात एकूण - पांच आतंकवादी, ५
पोलीस, एक संसदेचा गार्ड व माळी मृत्युमुखी पडले तर १८ जण जखमी झाले.
अतिरेक्यांच्या पाशी मिळालेल्या मोबाईल, पत्रके, इ वरून
त्यांच्या सहकाऱ्याचा शोध घेण्यात आला व ते डिसेंबर १५ ला काश्मीर मध्ये पोलीसाकरर्वी जेरबंद केले गेले.
ह्या तपासात सहकाऱ्याची नावे पुढे आली – अफजल गुरु, शौकत हुसेन, एस.ए.आर. गिलानी,
आणि नवजोत संधू ए.के.ए.अफसान.
में २००२ मध्ये सी.पी.सी.च्या कलम १७३ अन्वये रिपोर्ट दाखल
करण्यात आला. ही ९० साक्षीदार( ८० फिर्यादी तर १० बचाव पक्षाकडून) व जवळ जवळ ३००
वेगवेगळ्या कागदपत्रे असलेली केस विविध कायद्याच्या अनेक कलमानुसार ट्रायल कोर्टात
चालली व सहा महिन्याच्या कालावधीत केस निकाली निघाली. नवजोत संधू ए.के.ए.अफसानला
एका आरोपाखाली पांच वर्षाची सक्तमजुरी व दंड ठोठावण्यात आला तर उरलेल्या सर्वांना
मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. तसेच त्यांच्या कडे मिळालेले सुमारे १० लाख
रुपये ‘पोटा’ च्या कलम ६ खाली सरकार खाती जमा करण्यात आले.
उच्च न्यायालयात अपिलात
गीलानीला निर्दोष ठरविण्यात आले तर अफजल गुरु व शौकत हुसेनचा खालच्या कोर्टाचा
निर्णय ग्राह्य धरण्यात आला. उच्चतम न्यायालयाने अपिलावर शौकत हुसेनच्या शिक्षेत
बदल करून ती १० वर्षाच्या सक्तमजुरीत बदलली तर अफजल गुरुची मृत्युदंडाची शिक्षा
कायम केली गेली. गीलानीला १० वर्षाची शिक्षा पूर्ण होण्याआधी ९ महिने आधी चांगल्या
वर्तणुकी साठी सोडण्यात आले.
अफजल गुरु ने त्यानंतर
मा.राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज केला होता व तो फेटाळला गेल्यावर फेब्रुवारी ९, २०१३
ला तिहार जेलमध्ये त्याला फासावर लटकाविण्यात आले व नंतर पूर्ण धर्मिक इतमामाने
दफनाविण्यात आले.
आदल्या रात्री सर्व तयारी केलेली होती जेव्हा त्यांना एक लेपटोप
(जो परतल्यावर गाझी बाबाला द्यायचा होता – हाच गाझी बाबा काही दिवसापूर्वी
नेपाळच्या सीमेवर दिल्ली पोलिसांनी जेरबंद केल्याचे आठवत असेलच) व १० लाख रुपये
देण्यात आले. त्यांच्या जप्त केलेल्या मोबाईलवरून स्पष्ट झाले होते कि ते अफजल
गुरूच्या सतत संपर्कात होते. हा संसदेवरील हल्ला अमेरिकेच्या ९/११ च्या हल्ल्य
सारखाच गंभीर होता. नशिबाने थोडक्यात निभावले!
आमच्या इंटेलिजन्सची अकार्यक्षमता तसेच असफलता व टेक्नोलोजिकल
विकासाची आवश्यकता वेळोवेळी स्पष्ट झाली आहे. नजीकच्या काळातील हा सर्वात धाडसी
आतंकी हल्ला मानला जातो ज्यामुळे भारत व पाकीस्थान हे दोन्ही देश युद्धाच्या
तयारीने समोरा समोर उभे ठाकते होते.
हा सूडाचा प्रवास येथेच संपत नाही तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या
मुंबईवर हल्ला करण्याचा कुटील डावही पाकने आखला होता. तो पुढच्या वेळी बघू.
प्रकाश पटवर्धन
No comments: