Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Sunday, July 13, 2014

0 वळून पाहताना : भाग ११
आज आपण गुजराथच्या कच्छ प्रांतातील एका ९० कि.मी. म्हणजेच ६० मैलाच्या दलदलीच्या (marshland) तुकड्याचा इतिहास पहाणार आहोत. हा प्रश्न भूमापन प्रकारात मोडतो व त्यामुळे टेक्निकल बाबीचा असल्याने साध्या-सरळ सर्वांना कळेल अशा शब्दात, टेक्निकल संदर्भ वगळून सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. हा विवाद सन १९०८ च्या सुमारास प्रथम: मुंबई इलाख्यातील कच्छ आणि सिंध प्रांतांच्या राजांत उद्भवला व मुंबई इलाखायाच्या सरकारने सन १९१४ला दिलेला निर्णय दोन्ही राजांनी मान्य केला.

     सन १९६५ च्या युद्धानंतर हा प्रश्न पाकीस्थानाने पुन्हा उकरून काढला व दोन्ही देशानी आपापले मुद्दे मांडले. अंती हा प्रश्न आंतरराष्ट्रीय लवादाकडे वर्ग करण्यात आला व तत्कालीन ब्रिटीश प्रधानमंत्री, हेराल्ड विल्सन याच्या पुढाकाराने सन १९६८ मध्ये लवादाचा निर्णय झाला ज्यात पाकीस्थानला विवादित भूमीच्या(९००० स्क्वे.कि.मी.) १०% भूमी ( ५,५०० स्क्वे.कि.मी.) देण्यात आली.

     सन १९६९ पासून १२ वेळा द्विपक्षीय चर्चाच्या फेऱ्या झाल्या असल्या तरी हा प्रश्न अनिर्णयीत आहे. अजूनही दोन्ही देशांच्या ह्या प्रांतातील सीमा निश्चित केल्या नसल्यामुळे मासेमारी नौका व मच्छीमार एकमेकांच्या हद्दीत अनधिकृतपणे प्रवेश केल्यामुळे पकडले जात आहेत. तसेच समुद्र किनाऱ्यापासून २०० नोटीकल मैलाच्या (३७० कि.मी) क्षेत्राचा व्यावसायिक/व्यापारी उपयोग (EEZs) करता येत नाही.  सन १९९९ ला कारगिल युद्धाच्या एखाद महिन्यानंतर, भारतीय वायुसेनेने पाकिस्थानी १६ कर्मी असलेल्या टेहेळणी विमानाने भारतीय हवाई हद्दीचा भंग केल्यामुळे, पाडले होते तेव्हा बरीच तणावाची स्तिती उत्पन्न झाली होती.

      सियाचेन व सर क्रीक ह्या दोन प्रांतांच्या संबंधात काही बाबी समान आहेत उदा., दोन्ही प्रांत निर्मनुष्य आहे. दोन्ही प्रांतात नैसर्गिक तेल व वायू साठे असल्याची संभावना असल्याने दोन्ही देश इंच इंच भूमी लढवत आहेत. असो. 

प्रकाश पटवर्धन 

No comments: