जीवनाचा खरा अर्थ काय आहे? प्रश्न ज्याचा,
उत्तरही त्याचं, हो ना. कुणी कितीही ठरवलं तरी हवं तिथे माणसाला पोचता येत नाही.
मनाच्या खोल डोहात शिरून आपल्या माणसाला खेचून बाहेर काढता येत नाही ह्याचं जास्त
दु:ख. मरणप्राय यातना सहन करण्यापेक्षा संपून टाकूया सगळं एकदाचं, हा भयानक विचार
कुणाच्या डोक्यात रुजला तर? सोपं आहे, देवदूत बनून आपल्या जीवलगाला हाताशी धरून
प्रकाशाची पाऊलवाट दाखवायला हवी. आपल्यात ईश्वरी अंश आहेच ना ! नाकारून कसे
चालेल...काहीही झालं तरी साथ सोडायची नाही.
काल, मी इट्स अ वंडरफुल लाईफ हा १९४६ सालचा
अमेरिकन सिनेमा पाहिला. सिनेमा फिलीफ वन स्टेम ह्यांच्या “द ग्रेटेस्ट गिफ्ट” ह्या
कथेवर आधारित आहे. कथेचा नायक ‘जॉर्ज बेली’ ज्याने आपली सगळी स्वप्ने इतरांसाठी उधळून
लावलेली असतात. क्रिसमस च्या दिवशी तो जीवनाला कंटाळून आत्महत्येचा विचार करतो.
जॉर्ज साठी अनेक जण ईश्वराची करुणा भाकतात....... जॉर्जला मदत करण्यासाठी
क्लेरेन्स नावाच्या देवदूताची नियुक्ती करण्यात येते, त्या बदल्यात क्लेरेन्सला
त्याचे पंख मोबदला म्हणून मिळणार असतात. जॉर्जच्या अस्तित्वाने अनेकांची आयुष्ये
सावरली आहेत आणि जर तो नसता ह्या जगात तर काय घडले असते हा फरक क्लेरेन्स दाखवतो.
वयाच्या १२ व्या वर्षी जॉर्ज आपल्या लहान
भावाला बर्फातून वाचवतो व त्या घटनेत त्याच्या डाव्या कानाला इजा पोहचते, डाव्या
कानाने कायमस्वरूपी ऐकू येत नाही. काही काळाने तो एका फार्मसिस्ट कडे कामाला असतो.
मुलाच्या मृत्युच्या दु:खात व्याकूळ होऊन तो गोळ्यांमध्ये विष मिसळतो ही बाब
जॉर्जच्या ध्यानात आल्यानंतर तो गोळ्या सांगितलेल्या ठिकाणी पोहचवत नाही. जॉर्ज
मुळात हळव्या मनाचा असतो, कुणाचाही सहज जीव जडावा इतका निरागस.....
जगभर भ्रमंती हे त्याचे स्वप्न असते. त्याचा
लहान भाऊ पदवीधर झाला कि तो दूर निघून जाणार असतो. जॉर्जचे वडील गरिबांसाठी बेली
“बिल्डींग अंड लोन असोसियेशन” चालवतात. जेणेकरून गरिबांना पैसे घेऊन स्वतःचे घर
बांधता येईल. मेरीचे जॉर्जवर प्रेम असते. एक दिवस अचानक त्याच्या वडिलांचे देहावसन
होते. लहान भाऊ पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी निघून जातो. व्यवसायाची जबाबदारी
जॉर्जला स्वीकारावी लागते. तो स्वप्नांना विसरून दुसर्यांसाठी झटतो. मेरीशी लग्न
करून चार अपत्यांचा पिता बनतो. त्या गावात पॉटर नावाचा धन्याढ माणूस जॉर्जच्या
वाईटावर टपलेला असतो. एक दिवस ब्यांकेत पैसे भरण्यास गेलेल्या त्याच्या काकांकडून
पैसे हरवतात. आठ हजार डॉलर उभे करणे अशक्य आहे हे तो जाणून पॉटर कडे मदत मागायला
जातो, तिथे तो लाथाडल्या जातो. जीवनाच्या अंधकारात बुडून तो पाण्यात उडी मारतो.........
खेळ खल्लास.....छे छे... क्लेरेन्स त्याला वाचवतो. तो हताश होऊन क्लेरेन्सला
म्हणतो, मी जन्मलो नसतो तर फार बरे झाले असते !
क्लेरेन्स सगळी सूत्रे हातात घेतो. सुरवातीला
एका बारमध्ये दोघे जातात. त्या बारमधील नेहमी अदबीने वागणारा नौकर जॉर्जला अपमानित
करतो. दोघे रस्त्यावर चालताना ओळखीच्या कुठल्याच खुणा त्याला दिसेनात म्हणून तो
हैराण होतो. त्याला एक बातमी मिळते कि फार्मसीस्टला खुनाच्या आरोपातून शिक्षा
झालीये तो तुरुंगात आहे. त्याच्या लहान भावाची समाधी दृष्टीस पडते. हे अशक्य आहे
मी त्याला स्वत: वाचवले. तुझं अस्तित्व शून्य आहे हे क्लेरेन्स सांगतो. तो धावत
सुटतो आई घराचा दरवाजा उघडते ती त्याला ओळखण्यास नकार देते. मेरीच्या शोधात तो एका
घरापाशी पोचतो. तिथे कुणीच नाही......... तो दु:खी होतो. शेवटी त्याला स्वतःच्या
जगण्याचे महत्व पटते. तो घरात शिरतो. हिशोब मागणारी माणसे जमलेली असतात तरी तो
मेरी नि मुलांच्या मिठीत विसावतो. हा सीन अत्यंत सुंदर दृष्यांकित करण्यात आला
आहे. विरह, प्रेम, वेदना, परतण्याचा आनंद....... क्रिसमसच्या दिवशी त्याला अनोखी
भेट मिळते. जॉर्ज संकटात आहे हे मेरी गावकर्यांना सांगते. लाडक्या जॉर्जच्या
मदतीला प्रत्येकजण पैसा घेऊन हजर होतो. इतकेच काय त्याच्यावर जळणारा त्याचा मित्र
पैसा पाठवतो. लहान भाऊ म्हणतो रिचेस्ट म्यान इन टाउन.......त्याच्या हातात एक
पुस्तक ठेवतो त्यात एका पानावर लिहलेले असते.
प्रिय जॉर्ज,
ज्या माणसाला मित्र आहेत तो कधीही अपयशी होत
नाही हे कायम लक्षात ठेव.
पंखांसाठी धन्यवाद.
क्लेरेन्स
क्रिसमस ट्रीवर बेल वाजते त्याची लहान मुलगी
म्हणते बाबा कुणालातरी पंख परत मिळालेत. आयुष्य खरचं खूप सुंदर आहे....
विजया यादव
It was actually a box-office flop at the time of its release, and only became the Christmas movie classic in the 1970s due to repeated television showings at Christmas-time when its copyright protection slipped and it fell into the public domain in 1974 and TV stations could air it for free. [Republic Pictures restored its copyright claim to the film in 1993, with exclusive video rights to it. Currently, it can be shown only on the NBC-TV network, and its distribution rights belong to Paramount Pictures.]
ReplyDeleteपंख मिळतील पण त्यात आकाशाला गवसणी घालण्याची ताकद वा क्षमता प्रयत्नांती मिळविणारे विरळाच. Very good.
ReplyDeleteही आमच्यासाठीही "The Greatest Gift' आहे.
ReplyDelete"काहीही झालं तरी साथ सोडायची नाही. "
खूपच छान !!