Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Saturday, July 5, 2014

3 कलाजगत : भाग २

मित्रांनो,
कसे आहात? पावसाचा गार शिडकावा झाला कि उन्हाचा पारा वाढत चाललाय नि तुमच्या डोक्यात असंख्य प्रश्नांचे किडे वळवळत असतील. नवीन पुस्तक हाती घेतलेय कि वेळ कुठे मिळतो हल्ली वाचनाला असा मुलामा द्याल प्रश्नाला. किती गं प्रश्न विचारतेस म्हणून नाकं मुरडू नका. माझं मात्र नियमित वाचन सुरु असते.

आज मी ज्या पुस्तकाविषयी लिहिणार आहे त्याबद्दल माझ्या मनात लिहू कि नको हा संभ्रम आहे. मी ज्या वेळी हे आत्मचरित्र वाचले होते तेंव्हा हा खेळाडू यशाच्या नि कौतुकाच्या शिखरावर होता. लान्स आर्मस्त्रोंग ह्या सायकलपटूचे आत्मचरित्र “इट्स नॉट अबाऊट बाईक: माय जर्नी ब्याक टू लाईफ” हे आहे. त्याने कॅन्सरसारख्या व्याधीवर मात करून खेळात पुनरागमन करून प्रत्येकासमोर आदर्श निर्माण केला होता परंतु नजीकच्या काळात डोपिंग टेस्टमध्ये बंदी असलेली औषधे घेतल्याचे कबूल केले, परिणामस्वरूप त्याची सगळी पदके काढून घेण्यात आली. प्रतिष्ठा, मानमरातब धुळीला मिळालेल्या कॅन्सर ह्या व्याधीशी झुंजणाऱ्या योध्याच्या ओंजळीत काय उरलेय हा प्रश्न मला सतावतोय? तूर्तास सगळं बाजूला ठेवून जगण्यास प्रेरणा देणाऱ्या पुस्तकाविषयी जाणून घेऊया.

१९९९ ‘टूअर द फ्रांस’ ह्या जगप्रसिद्ध स्पर्धेचा विजेता बनल्यानंतर हे पुस्तक लान्स व स्याली जेनकिन्स ह्यांनी लिहले. लान्सने सलग सात वेळा टूअर द फ्रांस ही स्पर्धा जिंकलेली आहे. पुस्तकात त्याचे बालपण, तारुण्य, सायकलपटू बनण्यासाठी केलेला संघर्ष चितारण्यात आलाय १९९३ साली २१ वर्षीय लान्स वर्ल्ड सायकलिंग च्याम्पियन बनतो आणि ४ वर्षांनी एक दिवस अचानक “टेस्टीक्यूलर कॅन्सर फुफ्फुस आणि पोटाकडे फैलत होता डॉ. जिम रीव्स शस्त्रक्रिया करून टेस्टीकल्स काढून टाकतात. कॅन्सर आता मेंदूवर हल्ला चढवतो अश्या कठीण प्रसंगी इंडियाना युनिवर्सिटी मधील डॉ. लौरेन्स इनहोर्ण ह्या टेस्टीक्यूलर कॅन्सर तज्ञाकडे जातो. त्याच्या जगण्याची फक्त ४०% आशा असते. नियती खरच खूप क्रूर आहे. लहानपणापासून संघर्षाने त्याची पाठ सोडली नाही. लान्स कॅन्सरशी लढताना खूप भावस्पर्शी बोलतो,          “ जीवनात वेदना तात्पुरती असते. वेदना क्षण, तास, दिवस किंवा वर्षभर टिकून राहते पण हळूहळू ती सांदीकोपऱ्यात पडते आणि त्याची जागा दुसरी गोष्ट घेते . जर मी डाव अर्ध्यावर टाकला तर मी वेदनेला स्वाधीन होईल. कधीही सगळं काही सोडून देण्याचा माझ्या मनात विचार आला कि मी स्वतःला प्रश्न विचारतो कि मला कशासोबत जगायला आवडेल?.”

लान्सच्या मेंदूवर शस्त्रक्रिया केल्या जाते. शस्त्रक्रियेच्या आदल्या रात्री तो मृत्यूचा विचार करतो आणि म्हणतो, “मी माझ्या जीवनमूल्यांचा शोध घेत स्वतःला विचारले कि आज जर मी मेलो तर, मरताना देखील मृत्युशी दोन हात करायला आवडेल कि मृत्युला शांतपणे स्वाधीन व्हायला आवडेल? मी कुठली आशा बाळगावी. मी माझ्या आयुष्याच्या वाटचालीत समाधानी आहे का? शेवटी मी ठरवले कि मी निश्चितच एक चांगला व्यक्ती आहे जरी मी ह्याहून चांगला होऊ शकलो असतो. ह्याच वेळेला मला हेही उमगलेय कि कॅन्सर कशाची पर्वा करत नाही.” तो आणखी तीन केमोथेरपीला सामोरे गेला. १९९७ मध्ये तो कॅन्सरमुक्त म्हणून घोषित केल्या जातो. १९९७ साली तो कॅन्सरशी लढा देण्यास मदत करण्यासाठी लान्स आर्मस्त्रोंग फाउंडेशन सुरु करतो. १९९८ मध्ये क्रिस्टीन शी विवाहबद्ध होऊन सुखी जीवन जगतोय
प्रश्नांच्या जंजाळात अडकला असाल तर एकदा आवर्जून वाचा. इट्स नॉट अबाऊट बाईक: माय जर्नी ब्याक टू लाईफ.
फिर मिलेंगे अगले हफ्ते तब तक अपना खयाल रखना.
तुमची सखी,
विजया यादव.

3 comments:

  1. “Pain is temporary. It may last a minute, or an hour, or a day, or a year, but eventually it will subside and something else will take its place. If I quit, however, it lasts forever. That surrender, even the smallest act of giving up, stays with me. So when I feel like quitting, I ask myself, which would I rather live with?”

    ReplyDelete
  2. माझी आई मला म्हणाली , " जर तुला कुठे जायचं असेल तर तुला ते स्वतःच करावं लागेल. तुझ्या साठी दुसरं कोणी करणार नाही."
    आर्मस्त्रोंग

    ReplyDelete
  3. विशाल केतकरJuly 6, 2014 at 5:18 PM

    वाचनीय पुस्तक. जगण्याला व जीवनाला अर्थ देणार असं. "संध्या छाया भिवविती मजला" हे नसर्गिक. परंतु जीवनाशी झगडा करून पुन्हा आयुष्याच्या मार्गावर मार्गक्रमण करणाऱ्या आर्मस्त्रोंग चे हे चरित्र.
    तो एके ठिकाणी म्हणतो, आशा हीच भयाची 'antidote ' आहे.

    ReplyDelete