लिवर प्रत्यारोपण –
मला वाटते कि अवयव दानासंबंधी आवश्यक माहिती आपण मागील दोन भागात जाणून घेतली आहे. आज आपल्या शरीरातील सर्वात मोठ्या अन महत्वाच्या अवयवाची – लीवरची व त्यासंबंधित रोग व लिवर प्रत्यारोपणाची माहिती घेणार आहोत.
तसे पहिले तर लिवर (3 lbs) मानवी शरीराचा सर्वात मोठा अंतर्गत अवयव असुन पचन संस्थेचा प्रमुख भाग आहे. खाल्लेल्या अन्नाचे पाचनक्रियेपेक्षा कितीतरी जास्त क्रिया लिवर करते. लिवर हे रक्तवाहिन्या (blood vessels), कोशिका (capillaries) आणि चयापाचायी प्रकोष्ठाची (Metabolic Cells) गुंतागुंतीची रचना असून ते शरीरातील पिष्टमय पदार्थ (fats) व लीपिडसचे विभाजन/विघटन करून पचनास मदत करते. कोलेस्टेरॉलची निर्मिती व शरीरात घुसलेल्या हानिकारक द्रव्यांचे शुद्धीकरण आणि शरीरासाठी अनावश्यक असलेल्या गोष्टींची विल्हेवाट लावण्याचे कार्यही लीवर करते.. लीवारला दोन महत्वाच्या रक्तवाहिन्या जोडलेल्या असतात – हेपटीक आर्टरी व पोर्टल वेन – ज्याद्वारे लीवारला रक्त पुरवठा होतो. हेपटीक आर्टरी लीवरला त्याचे कार्य करण्यासाठी व ते स्वस्थ ठेवण्यासाठी आवश्यक असा प्राणवायुमिश्रीत रक्ताचा पुरवठा करते तर पोर्टल वेनद्वारे पचलेले अन्नकण असलेल्या रक्ताचा पुरवठा करते व लिवर पचलेल्या अन्नकणावर प्रक्रिया करून शरीराला आवश्यक अशी कर्बोदके, अमिनो आम्ले व विष्टा वेगळी करते. वेगवेगळ्या आवश्यक रसायनांची (chemicals) निर्मिती चायापाचायी प्रकोष्ठात होत असते. हि सारी द्रव्ये ज्या ठिकाणी जमा केली जातात त्यांना लोबुल्स म्हणतात व असे हजारो लोबुल्स लिवर मध्ये वेगवेगळ्या द्रव्यांचे उत्पादन व फिल्टरेशनच्या कार्यात व्यस्त असतात. अशी अनेकानेक वेगवेगळी कार्ये करणारे लिवर रोगिष्ठ झाले वा निकामी झाले तर..........
लिवरचे त्रास/दुखणी – काही ठळक खुणा व लक्षणे:
o काविळीची लक्षणे;
o अशक्तता वा थकल्यासारखे वाटणे;
o भूक न लागणे;
o खाजणे वा सि-होसीस;
o वजन घटणे;
o खरचटणे व रक्तस्राव सहज होणे;
o पोटात रक्तस्राव होणे;
o काळ्या रंगाची परसाकडेस होणे;
o पोटास सूज येणे.
सिर्होसीस हे प्रौढ व्यक्तीमध्ये लिवर प्रत्यारोपणाचे सर्वसाधारण कारण आहे. रोगांचा प्रादुर्भाव, सिर्होसीसचा त्रास चांगल्या स्वस्थ लिवरला नष्ट करण्यास प्रवृत्त करतात. उदाहरणार्थ,
Ø हेपेटाइटिस बी चे दीर्घकालीन संक्रमण;
Ø अल्कोहोलचे दीर्घ सेवन;
Ø ऑटोइम्यून लिवर रोग;
Ø हेपेटाइटिस सी चे दीर्घकालीन संक्रमण;
Ø लीवरमध्ये चरबीची वाढ;
Ø लीवरचे अनुवांशिक रोग.
तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती नेहेमी स्वास्थ्याला हानिकारक बेक्टेरिया, व्हायरस सारख्या विषाणूशी लढा देत असतात. लीवरचे ऑटोइम्यून रोग म्हणजे ह्या प्रतिकारशक्तीने लिवरला शरीराचा भाग न मानता बाह्य अंग मानून त्याचा प्रतिकार करणे – त्यावर हल्ला करणे, होय तर अनुवांशिक रोग हे मात्या-पित्याकडून मुलांत आलेले आजार होत.
प्रत्यारोपण म्हणजे शस्त्रक्रियेने खराब झालेले लिवर काढून त्याजागी दुस-या व्यक्तीचे लिवर स्थापित करणे होय.
प्रत्येक प्रत्यारोपण केंद्राचे आपले नियम असतात व त्याप्रमाणे लिवर प्रत्यारोपण होते. परंतु जर आपण खालील पैकी कोणत्याही एका गटात मोडत असाल तर प्रत्यारोपणाची शक्यता कमी कमी होत जाते –
· लीवेरच्या बाहेर पसरलेला कॅन्सर;
· सिरिअस हृदय व लंग्स चे आजार;
· अल्कोहोल किवा ड्रग्स च्या सवयीचे दुष्परिणाम;
· कोणतेही सिरिअस इन्फेक्शन;
· एड्स;
प्रत्यारोपण आवश्यक असलेल्या रोग्याचे नाव राष्ट्रीय वेटिंग लिस्टवर ठेवताना ब्लड ग्रुप, बॉडी आकार आणि लिवर प्रत्यारोपणाची निकड, इ. विवरण दिले जाते. त्यात मृत्यूच्या समीप असणाऱ्या व प्रत्यारोपणाची गरज असणाऱ्याची नावे सर्वात वर असतात.
लिवर शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असून ती जवळपास १२ तास घेते व सामान्य (general) अनेस्तीया देऊन केली जाते. रोग्याला अश्या शस्त्रक्रियेनंतर एक ते दोन आठवडे तर आपली लिवर देणाऱ्या व्यक्तीला/डोनरला एक आठवडा हॉस्पिटलमध्ये राहावे लागते.
The details given in these articles are purely to provide basic information to the people and to support the movement of organ donation. The concerned may, therefore, get in touch with experts in the field.
प्रकाश पटवर्धन
मरावे परी अवयव रुपी राहावे : भाग ३
मरावे परी अवयव रुपी राहावे : भाग 2
मरावे परी अवयव रुपी रहावे : भाग १
No comments: