पहाट उमलत जाते, सूर्य रथांवर स्वार होऊन
आपल्या रोज भेटीला निघतो अन दिवसभरातलं काम आटोपून तो पश्चिमेच्या वाटेकडे झुकलेला
असतो... सकाळी सोनसळी उन्हाने आपल्याला सुखावतो माथ्यावर आला कि आग ओकणारा सुर्य अन
अश्या टळटळीत दुपारी लालजर्द गुलमोहर नजरेस पडावा मग मन आपसूक आनंदून जातं अन संध्यासमयी
सूर्य कमालीचा शांत भासतो.....त्या सूर्याच्या जागी सायीसम मउशार चंद्र नभी आरूढ
होतो अन मैफिलीत सामील होण्यासाठी ताऱ्यांचा खच पडू लागतो..... अजस्त्र महाकाय
समुद्राच्या लाटा अन दृष्टीत सहजासहजी न मावणारी त्याची अथांगता.... छोट्या छोट्या
लाटा
किनाऱ्याला बिलगतात अन लाट आनंदून जाते.....
आलेला दिवस पुढे ढकलायचा म्हणून किंवा कैक
समस्यांमध्ये अडकून पडतो एखाद्या जाळ्यात अडकून पाण्यावाचून जीवाची तडफड होणाऱ्या
माश्यासारखी अवस्था असते. खांदे पाडून चालत राहण्याच्या ऐवजी जीवनाशी हसतखेळत
लढायला शिकायला हवं... म्हणून एखादा छंद गाठीशी असला कि आपली जीवननौका निभावून
नेता येते.... एखादा चित्रपटातला सीन काळजावर कायमचा कोरल्या जातो, एखादीच ओळ
जगवते, एखादं पुस्तक आपल्याला आपली सारी दु:ख विसरून त्यावर मात कशी करावी ते
शिकवते...कास्ट अवे मधला समुद्रात विल्सन हा फुटबॉलशी वियोग होतोय म्हणून दु:खाने
वेडापिसा होणारा टॉम हंक बघून जीव कळवळतो... वा लेस मिझरेबल ह्या विक्टर
ह्युगोच्या पुस्तकातील जेन वाल्जेनला पोटासाठी ब्रेड चोरल्यामुळे जवळपास एकोणवीस
वर्षे तुरुंगवास भोगावा लागतो अन आपण प्रश्नांच्या गुंत्यात अडकून पडतो मनात
विचारांचं काहूर माजतं.
विजया यादव
कलेच्या क्षेत्रातील आपली उत्कट मुशाफिरी आपल्या लिखाणात प्रतिबिंबीत होते. पुस्तके आणि चित्रपट हि दोन्ही सशक्त माध्यमें आहेत व त्यावरील परिक्षणे वाचायला आवडेल.
ReplyDelete