Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Tuesday, July 29, 2014

0 कबीराचे दोहे : भाग ९

मी आणि बाप्या रस्त्याच्या कडेला कोणाची तरी वाट पाहत उभे होतो, बाजूला एक कुत्रा हाड चघळत होता. पुष्कळ वेळ त्याच ते चघळण चालूच होतं. तुम्ही म्हणाल, ह्यात नवल ते काय? अगदी सामान्य दृश्य आहे, नवीन काही नाही. मी बाप्याला म्हणालो, "बाप्या हे श्वान कोरड हाड केव्हाचं चघळत आहे. त्यात त्याला काय मजा येत असेल, देव जाणे! पण पहा न कसा मन लावून चघळत आहे. चघळून चघळून थकला कि परत दूर जातो आणि थोड्यावेळाने हाडाजवळ परत अन तीच क्रिया.  
         यावर बाप्या उत्तरला, " ते हाड तर सुकलेल आहेच त्यात काहीच रस नाही. परंतु तुला माहित आहे  का, ज्यावेळेस कुत्रा हाड चघळतो तेव्हा त्या कडक हाडामुळे त्याच्या तोंडात जखम होते व तेच  रक्त जिभेला लागत. अन हीच रक्ताची चव त्याला हाड चघळण्यात अडकवून ठेवते. हाडाची पर्यायाने रक्ताची आसक्ती, तृष्णा, यातच कुत्रा अडकून रहातो, हाडरूपी मायाचा त्याच्या मनाला अडकवून ठेवते. 

कबीरदास म्हणतात, 
 
माया मुई न मन मुवा , मरी मरी गया सरीर | 
आसा त्रिष्णा ना मुई, यो कही गया कबीर|| 


        काबिरादासाजी म्हणतात, माया कधी मरत नाही, मन कधी मरत नाही मरतं ते फक्त शरीर  तसेच आशा तृष्णा सुध्धा कधी मरत नाही. जातं ते फक्त शरीर. या आसक्ती मुळेच माणसाचे सुद्धा या पृथ्वीतलावर आवागमन चालू असते. या आवगामानातून मुक्ती मिळावयाची असेल तर त्याला आशा, आसक्ती, तृष्णा यातून मुक्त व्हाव लागेल.  

दत्तात्रय पटवर्धन

No comments: