Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Tuesday, May 27, 2014

0 केजरीवाल आणि राजकारण.


श्री अरविंद केजरीवाल खरच ज्यांनी भारतातील राजकारणाला नवीन दिशा दाखविली अल्पावधीतच भल्या भल्या राजकारण्यांना जमले नाही ते सर्व त्यांनी करून दाखविले, मिळवून दाखविले अगदी स्वप्नवत वाटावे अशी दिल्लीची सत्ता ताब्यात घेतली आणि जनमानसात त्यांची स्वच्छ आणि प्रामाणिक प्रतिमा अधिकच उंचावली. खुर्चीचा मोह न धरता सत्तेवर कधीही पाणी सोडू शकतो हे सुद्धा त्यांनी दाखवून दिले. पण मग माशी कुठे शिंकली? एखाद्या निवडणुकीत यश नाही मिळाले म्हणून काही पक्ष संपत नाही, कारण खरच  सामाजिक चळवळी शी ज्यांची नाळ जोडली गेली आहे, फक्त समाज कारणाशी ज्यांनी सर्वस्व वाहिले असे प्रामाणिक कार्यकर्ते ह्या पक्षाशी जोडले गेले आहेत पण पुन्हा श्री अरविंद केजरीवाल यांचा तुरुंगातच राहण्याचा निर्णय त्यांच्या पक्षात आणि माझ्या सारख्या सामान्य माणसाला चक्रावून सोडणारा आहे त्याचे तर्कसंगत असे कारण आज तरी मिळत नाही किंवा त्यांचे समर्थक ही ते स्पष्ट करण्यात कुठे तरी कमी पडत आहे असे वाटते. आणि कार्यकर्त्यात संभ्रमावस्था निर्माण झालेली दिसते कोणी पक्ष सोडत आहे तर कोणी त्यांची भूमिका समजत नसल्याचे जाहीर पणे बोलत आहे.  मी तसा कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडलेला नाही पण एक देशाचा सर्वसामान्य नागरिक म्हणून काही  प्रश्न माझ्या मनात आलेत.  श्री अरविंद केजरीवाल आता किती दिवस तुरुंगात राहणार? त्याने काय साध्य होणार?  मोदी सरकार च्या शपथविधीत न जाण्या साठी या सारखी सोयीस्कर जागा दुसरी नाही हे त्यांच्या लक्षात आले का ? शपथ विधी नंतर कार्यकर्त्यांची भावना म्हणून तुरुंगातून बाहेर येणार का? श्री अरविंद केजरीवाल सुद्धा बाकी पक्षां सारखे राजकारण करणार काय? ह्याची उत्तरे येणारा काळच देईल हे मात्र खरे.


सतीश कुलकर्णी 

वाचा 
 

No comments: