Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Wednesday, May 28, 2014

0 शायरीचा गुलदस्ता. भाग २


उर्दू  मध्ये 'मय' म्हणजे 'मद्य'. प्रेमी युगलाना या प्रेमरूपी मद्याची  धुंदी  चढते. हि इष्काची धुंदी याला नशा म्हटलं जात. यातच कधी  प्रेयसीचा वियोग होतो आणि या वियोगाच्या दुक्खा मुळे व ते विसरण्यासाठी तो मादिरालयात जाऊन पोहचतो. याच मादिरायला 'मयकदा' किव्वा 'मयखाना' असे म्हणतात. आता मदिरालय म्हटलं कि मद्य देणारी युवती म्हणजे 'साकी' अथवा 'साकीया' आणि तिच्या हातातील प्याला येतोच. हा प्याला म्हणजे 'जाम' अथवा 'सागर'. या मद्याची धुंदी म्हणजे 'सरूर' आणि हि अवस्था पुष्कळ वेळ राहते त्याला 'खुमार' म्हणतात.

उर्दू शायरी मध्ये हे शब्द वारंवार  येतात. त्यामुळे अनेकवेळा असे वाटते कि उर्दू शायर हा मदिरा आणि मदिरालय याचा पुरस्कर्ता आहे. त्यामुळे शायरी आणि शायर हे बदनाम झालेले आहेत. उर्दू शायरी मध्ये हे सर्व शब्द अनेकवेळा प्रतीकात्मक म्हणून वापरले जातात.

उसके पैमाने कुछ और, मेरे पैमाने में कुछ और
देखना साक़ी हो न जाये, तेरे मैखाने में कुछ और |

इथे शायर या सर्व बदनाम शब्दांचा प्रतीकात्मक म्हणून उपयोग करतो. मैखाना म्हणजे जग, (world ) साक़ी म्हणजे देव आणि
पैमाना म्हणजे नशीब असे संकेत वापरलेले आहेत.

आता येथे शायर देवाला नेहमीचाच प्रश्न विचारत आहे. कोणाच्या नशिबात  काय तर कोणाच्या नशिबात काय. अरे देवा तुझ्या या जगात
असाच अन्याय चालेल तर एक दिवस मोठा हाहाकार माजेल.

असाच पुढील शेर पहा,

इक जगह बैठकर पी लूं ये मेरा दस्तूर नहीं,
मैकदा तंग बना लू ,  मुझे मंजूर नहीं |

आता हा शायर कसा अगदी पियक्कड़ वाटतो ना?   येथे 'मैकदा तंग बनादू ' विचारांना सीमित ठेवणे (confinement of thought ) असा आहे.प्रत्येक धर्मात कर्मकांडाच्या
विशिष्ट सीमेत माणसाला बांधून ठेवलं आहे ( religious dogmas ) . त्यापलीकडे जाऊन विचार करण्याला पाबंदी आहे . म्हणून शायर म्हणतो कि, मला या विचारांच्या
पलीकडे जायचं आहे एखाद्या विशिष्ट ढाच्यात बसून विचार करणे माझ्या स्वभावात नाही आणि विचारांना सीमित ठेवण मला मंजूर नाही. 


 दत्तात्रय पटवर्धन 
विजया यादव  

वाचा 
 

No comments: