Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Sunday, May 11, 2014

1 कबीराचे दोहे भाग 1

एका राजमहालातील एक पाल, मोठ्या आनंदात राजमहालाच्या छतावर विहरत होती. राजमहालाचे   ऐश्वर्य, राजमहालाच सौंदर्य याचा आनंद लुटत होती. दुसरी पाल बाहेरून आली आणि त्या पालीला म्हणाली, चलतेका सिनेमाला?” पहिली पाल रागाने म्हणाली, तुला कळत नाही, मी छत सांभाळून आहे. मी सिनेमाला आली तर हे छत कोण सांभाळणार?
बरोबर आहे!! बैलगाडीच्या खालून चालणाऱ्या कुत्र्यालाही असेच वाटते कि तोच गाडी चालत आहे. हा दोष त्याचा नाही त्याच्या अहंकाराचा आहे. अहंकार प्रत्येकाच्या स्वभावात आहे.  गौतम बुद्ध म्हणतात कि तुमच्या पेक्षा सर्वात  मोठा तुमचा मित्र कोणी नाही व तुमच्या पेक्षा तुमचा मोठा शत्रू कोणी नाही. सत्कृत्दर्शनी अत्यंत विरोधाभासी वाटते. तुम्हीच मित्र आणि तुम्हीच तुमचे शत्रू कसे शक्य आहे? अगदी सोपे त्रैराशिक! मी (-) अहंकार = तुम्ही तुमचे मित्र , तर मी (+) अहंकार = तुम्ही तुमचे शत्रू. बघा, जमतंय का. हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे.
तसे पाहिले तर प्रत्येक बाब हि आपल्यावरच अवलंबून असते. आपण या पृथ्वीतलावर जगतो आणि मेल्यानंतर स्वर्गात जाण्याच्या गोष्टी करतो. परंतु जिथे आपण आपले अवघे जीवन व्यतीत करतो त्या पृथ्वीला स्वर्ग बनवण्याचा विचारसुद्धा आपल्या मनात येत नाही. मेल्याशिवाय स्वर्ग नाही पण मरणाची तयारी नाही. मग स्वर्ग कसा मिळणार? ‘सदेह स्वर्गारोहण’? व्वा! व्वा! छान कल्पना! आम्ही "म" च्या ऐवजी "मा" करायला तयार. एक धर्म दुसऱ्या धर्मावर कुरघोडी करत एकमेकांना मारू लागले तरी बेहेत्तर.
कबीरदासजी म्हणतात,
 घुंगट के पट खोल रे तोहे पिया मिलेंगे, 
घट घट मे वो साई रमता कटुक वाचन मत बोल रे, तोहे पिया मिलेंगे.'

       कबीरदासजी वरील दोह्यातून हीच संकल्पना मोठ्या कल्पकतेने आमच्या पुढे सादर करतात.  कबीराच्या प्रत्येक शब्दाचा आनंद लुटता येतो. घुंगट, पदर जेव्हा डोळ्यावर असतो तेव्हा आम्हाला हे भौतिक  जग दिसत नाही. सर्वदूर अंधार दिसतो, भीती निर्माण होते, आत्मविश्वास डळमळतो.  अन अहंकाररूपी पदर जर आंतरिक डोळ्यावर असला तर......  आम्हाला परमात्मा कसा दिसेल? आणि या परमात्म्याचे दर्शन झाले कि तेथे अंधार राहील का? सगळीकडे प्रकाशच प्रकाश, तेजच तेज. जणू स्वर्गच!
येशू ख्रिस्ताला जेव्हा विचारले कि स्वर्गात कोण जाईल? तर क्रीस्ताने एका लहान मुलाला उचलले आणि म्हणाला, 'हा जाईल याचाच अर्थ असा कि जो लहानमुलाप्रमाणे निरागस  असेल, ज्याच्यात अहंकार नसेलतोच स्वर्गाचा अधिकारी.
कबीरदास पुढे म्हणतात कि, 
घट घट मे वो साई रमता, कटुक वचन मत बोल रे.तोहे पिया मिलेंगे.   
      प्रत्येकात परमात्मा वास करतो. म्हणून शरीराला परमात्म्याचे मंदिर मानले आहे. देह देवाचे मंदिर आहे. एक सुंदर उर्दू शेर आठवतो –
                       " हम तो दिल मे लिए फिरते है तस्वीरे-यार , जरासी गर्दन झुकाई और दिद कर लिए 
      आत्माराम सर्वांच्या हृदयात असतो. मात्र तो सर्वाना दिसत नाही. तस्वीरे-यारच्या/प्रियतमाच्या दर्शनसाठी गर्दन (मान) झुकविण्याची तयारी असावी लागते. परंतु आड येतो तो आमच्यातील  अहंकार.  गम्मत बघा, जर अहंकार त्यागलात तर किती सहजतेने प्रियतमाचे/आत्मारामाचे दर्शन होऊ शकेल. प्रत्येकाच्या हृदयात  परमेश्वर आहे म्हणून कोणासाठीटू शब्दाचा उपयोग करू नका, अशीच शिकवण कबीरजी देतात. 

दत्तात्रय पटवर्धन

1 comment:

  1. उत्तम. काबिर दास समजणे कठीणच.

    ReplyDelete