Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Friday, May 23, 2014

0 वळून पाहताना ! भाग 2


मागील भेटीत भारत-पाक सीमेवरील परिस्थितीच्या संदर्भात थोडी चर्चा झाली होती पण आपण ह्या दोन्ही युद्धजन्य देशांची पार्श्वभूमी नीट समजू शकलो नव्हतो.  आज थोड त्यावर लक्ष केंद्रित करू या.

         ब्रिटीशांच्या राज्यात इंडियन आर्मीम्हणून ओळखले जाणारे सैन्य सन १८९५ मध्ये उभे करण्यात आले. ह्या व्यतिरिक्त कंपनी सरकारच्या काळातील तीन प्रेसिडेन्सी आर्मीज वेगळ्या होत्या. सन १९०३ मध्ये ह्या तीन प्रेसिडेन्सी आर्मिज भारतीय सैन्यातविलीन करण्यात आल्या. ओगस्ट १५, १९४७ ला भारतभूचे भारत व पाकीस्थान असे दोन भाग पडले तसेच ते भारतीय सैन्याचे, त्याच्या फार्मेशन्स, युनिट्स, असेट्स व भारतीय वंशाच्या सैनिकांचे. त्यापैकी अनुक्रमे २/३ सेना, ‘भारतीय सेना म्हणून तर १/३ सेना हि पाकीस्थानी सेना म्हणून स्वातत्रोतर (त्यानंतरच्या) काळात ओळखली जाऊ लागली. याला अपवाद होता तो ४ थ्या गुरखा रेजिमेंटचा, ज्यात प्रमुख्याने नेपाळी, जे भारतीय वंशाचे सैनिक नव्हते म्हणून, हि रेजिमेंट ब्रिटीश आर्मीला वर्ग करण्यात आली. असे असले तरी, जवळ जवळ सर्व ब्रिटीश युनिट्सची आयुधे भारतीय सेनेकडे राहिली. भारतीय सेनेतील जवळ-जवळ सर्व मुसलमान सैनिकानी पाकिस्तानी सेनेचा मार्ग धरला.
      पाकिस्थानला अनुभवी सैनिकी अधिकाऱ्याच्या अभावापोटी शेकडो ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या सेवा करारावर घ्याव्या लागल्या. ह्या सर्वाचा परिपाक म्हणजे भारत, पाकीस्थान आणि ओघाने बांगलादेशच्या सेनेत सामन्यात: ब्रिटीश संस्कृती दिसून येते. भारतीय सेनेचे तत्कालीन सर्वेसर्वा चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल बुचर होते तर जनरल करिअप्पा हे प्रथम भारतीय सेनानी ठरले.      
        सन १८५८ ते १९४७ च्या दरम्यान अनेक आंतरराष्ट्रीय युद्धात भारतीय सेना ब्रिटीशांकडून उतरली, त्यात दोन विश्व युद्धे(WW/I = 175,000  & WW/II = 250,000)  महत्वपूर्ण आहेत. सन १९११ मध्ये भारतीय आर्मी एकट(Act) पास झाला. स्वतंत्र भारताचा भारतीय आर्मी एकट(Act) पास व्हायला सन १९५० उजाडावे लागले. दोन्ही सेना ब्रिटीशांच्या भारतीय सेनेचे अंग असल्यामुळे ब्रिटिशानी अवलंबलेली रेजिमेंट पद्धतच ह्या दोन्ही सेनांनी पुढे सुरु ठेवली. आर्म्ड तसेच आर्टिलरीमध्ये अमेरिकेच्या बटालियन प्रमाणे, ४०-५० रणगाडे आणि १८ आर्टिलरी नग असतात. आर्म्ड रेजिमेंटचा एक उपविभाग, स्क्वाड्रन/ट्रूप म्हणून ओळखला जातो. ब्रिटीश पद्धतीप्रमाणे पायदळ, हवाईदल व नौसेनेसाठी अनुक्रमे ब्रिगेडीयर, स्क़्वाड्रन लीडर, आणि ऐअर मार्शलची पदे होती व आहेत. भारताजवळ १३ आणि १७ ग्रेनेदिअर्स ह्या उंटावरील भारतीय इन्फंट्री बटालियन होत्या. ह्याचबरोबर भारतीय सेनेत ५० व ५१ ह्या दोन ब्रिगेडसमध्ये अनेक एअर-बोर्न इन्फंट्री बटालियन्स होत्या. पण अशी कोणतीच सोय पाकिस्थानी सेनेत नव्हती. दोन्ही देशातील पंजाब प्रांताप्रमाणे, सेनेतही पंजाब रेजिमेंट तेव्हा होत्या व आजही आहेत. गुणात्मकदृष्ट्या जरी भारत-पाक सेनेमध्ये फारसा फरक नसला तरी कमांड आणि कंट्रोलच्या बाबतीत भारत पाकपेक्षा नेहमी सरस होता व आहे, हे जवळ जवळ सर्व युद्धात स्पष्ट झाले आहे.
     आज भारतीय सेनेचा पसारा फार वाढला आहे. भारत आणि पाकच्या सैनिक क्षमतेचा तौलनिक अभ्यास केला तर ध्यानात येईल की आर्मी कॉर्प्सच्या संदर्भात भारत व पाक कडे अनुक्रमे ९ आणि ८ कॉर्प्स, १३ लाख भारतीय सैनिक आणि ५ लाख पाक सैनिक,  ४१०० पेक्षा जास्त रणगाडे भारताकडे तर २५०० पाककडे आहेत.
      भारतीय हवाई दलात (आय.ए.एफ.) १७०,०० कॉम्बेट., तर पाक हवाई दलात (पी.ए.एफ.) ४५,०००हून जास्त. आय.ए.एफ़ कडे ७०० लढाऊ फायटर बॉम्बर्स + २० Attack Helicopters आहेत तर पाक हवाई दलात कडे ४०० च्या वर लढाऊ फायटर बॉम्बर्स आहेत. भारताकडे एकूण १२ हवाई तळे आहेत तर पाककडे फक्त ६.  AWACS (Air-borne Warning And Control System) भारताकडे ३ तर पाककडे ९ आहेत. मिसाईलच्या संदर्भात दोन्ही देशाची स्थिती समतोल आहे. नौसेनेच्या बाबतीत बघायला गेलो तर भारताकडे ५५,००० नौसैनिक, १ विमानवाहू नौका, १६ सबमरीन + १ अणू-इंधनावर चालणारी सबमरीन आणि २० लढाऊ नौका आहेत, तर पाक कडे २५,००० नौसैनिक, व १६ लढाऊ नौका आहेत. मिसाईलच्या क्षेत्रात दोन्ही देशांची स्थिती सारखीच असली तरी पाककडे न्युक्लीअर वॉरहेड्स(Nuclear warheads) ९० ते १०० च्या दरम्यान आहेत आणि भारताकडे ८०.
        भारत आणि पाकच्या सीमांचा विचार केला तर पाकला भारतीय व अफगाण सीमेवरच (२९१२+२४३०=५३४२ कि.मी.) सैन्य ठेवणे गरजेचे आहे. भारताला पाकसह चीनच्या व बांगलादेशच्या सीमेचा (२९१२+३३८०+४०५३=१०३४५ कि.मी.) विचार करावा लागतो. आज अफगाण सीमेचा मोठा फायदा पाकिस्थानला होत आहे कारण अमेरिकेला अफगाणिस्थानात आपला वचक दोन बाबीसाठी ठेवावयाचा आहे इस्लामी दहशतवादाला शह देण्यासाठी किंवा आपल्या काबूत ठेवण्यासाठी आणि दुसरीकडे तेल-उत्पादक देशांवर, दक्षिण आशियावर करडी नजर ठेवण्यासाठी. आबोटाबादला इस्लामी दहशतवादी ओसामाचा काटा काढल्यानंतर अमेरिका आता पाकिस्थानला पूर्वीसारखी मदत देताना दिसत नाही हे तुझ्या लक्षात आलेच असेल.  
       मला वाटत आता स्थिती तुझ्या मनात स्पष्ट होत चालली असेल. आजच्या पत्रात दोन्ही देशांच्या बलाबलाचा विचार केला. पुढील पत्रापासून युद्धांचा व तत्कालीन परिस्थितीचा विचार करू. तोपर्यंत, 

प्रकाश पटवर्धन 

वाचा 

No comments: