कबीरदासजीच्या काळात समाजावर रुढींचा जबरदस्त पगडा होता. यज्ञामध्ये हजारो प्राणी बळी दिले जात होते. विविध सुखांच्या अपेक्षेने, त्याच्या इच्छापुर्तीसाठी तसेच परमेश्वर प्राप्तीसाठी अनेक विधींचे पालन केले जात होते. या विधी अत्यंत कठोरतेने पाळल्या जात होत्या. काही तात्विकदृष्ट्या मनाला न पटणाऱ्या प्रथाहि पिढी दर पिढी स्वीकारल्या व पाळल्या जात होत्या. अशा प्रथांचा कुठून व कशा आल्या हा सुध्धा एक अध्ययनाचा विषय आहे. सर्व प्राणी जगताला एकाच परमपित्याने निर्मिले असता त्यातील कोणा एकाचा बळी म्हणजे मारणे देवाला कसे रुचावे, तो प्रसन्न कसा होणार?. कबीरदासजीनी ह्या प्रथांचा फोलपणा स्पष्ट करण्यासाठी म्हणून या प्रथांवर अत्यंत कडक शब्दात टीका केलेली आहे. या समाजाला कडक टीकेच्या चाबकाच्या फटकाऱ्यानी शुद्धीवर आणणारे कबीरदास हे एक क्रांतिकारी संतच होते.
कबीरदास म्हणतात, मोको कहा धुंडे रे बंदे , मै तो तेरे पास मे |
एक शेतकरी आनंदी जीवन जगात होता कारण तो समाधानी होता. एकदा एक साधू त्या शेतकऱ्याच्या घरी उतरला. गप्पा गप्पात तो साधू म्हणाला, " अरे तू एव्हडी मेहनत करतो आणि तरीही गरीबच, या जगात हिऱ्याच्या खाणी आहेत. तू जर का याचा शोध घेतला तर श्रीमंत होशील, अगदी सम्राटच. पहाट होताच साधू आपल्या मार्गाने निघून गेला. दिवसभर शेतकऱ्याला चैन नाही. त्याला फक्त हिऱ्याच्या खाणीच दिसत होत्या. या हिऱ्याच्या खाणीनी त्याचे समाधान हिरावून घेतलं. तो अत्यंत दुख्खी झाला. एक दिवस हिऱ्याच्या खाणीच्या शोधात त्याने घर सोडले. हिऱ्यासाठी एखाद्या भिकाऱ्यासारखा तो वणवण भटकत राहिला व अंत: राजपथावर मृतावस्तेत आढळला पण त्याला हिऱ्याची खाण काही सापडली नाही.
पुढे काही वर्षांनी तोच साधू त्या गावातून जात असताना त्या शेतकऱ्याच्या घरी गेला. पहातो तो तेथे दुसरेच नवे कोणी. चौकशी अंती सर्व कथा कळली. घरासमोरच्या पटांगणात काही मुले चकाकणाऱ्या दगडांशी खेळताना साधूने पहिले. मुलांकडे विचारणा केली तेव्हा कळले कि ते दगड शेताजवळून जाणाऱ्या ओढ्यातील आहेत. साधू म्हणाला, “अरे हे तर हिरे आहेत. “
परमात्मा रुपी हिरासुद्धा असाच जवळ असतो परंतु आपण त्याचा शोध बाहेरच्या विश्वात घेत भटकत (कि भरकटत) असतो. कबीरदासजी म्हणतात, “परमात्मा काही बकरी, मेंढी, देवळात, मशिदीत, चर्च, व गुरुद्वारात नसून तो आपाल्यातच आहे. तो कर्मकांडात नाही, तो जोग बैराग्यात नाही तर तो प्रत्येकाच्या श्वासात आहे. फक्त सच्या दिलाने शोधाल तर हा हिरा एका क्षणात मिळू शकतो. फक्त जरुरी आहे मान झुकविण्याची .......... अहंकाराचा लोप होऊन विनयाचा उगम म्हणजेच परमात्म्याच्या सानिध्यात जाण्याचा मार्ग. ध्यानात घ्या, भांड्यात पाणी तेव्हाच येते जेव्हा भांडे आपला सारा अहंकार त्यजून पाण्याकडे वाकून विनंती करते. मागणाऱ्या व देणाऱ्यातील हे नाते लक्षात आले कि सर्व सोपे होते. पण लक्षात कोण घेतो.

No comments: