Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Saturday, May 24, 2014

0 बुद्धिबळातील प्यादे.



सर्वांना माहित आहे कि  'प्याद' बुद्धिबळातील एक साधा घटक. अगदी 'आम आदमी' सारखा आर के लक्ष्मण च्या कॉमन मैन ची आठवण करून देणारा! याच्याकडे तसे कोणतेही कसब नाही (असा समज असतो ) या प्याद्याची झेप व चाल हि छोटीच - अगदी "कदम कदम बढाये जा" च्या तालावर बेतलेली. तरी सुद्धा फिलिडोर सारखा खेळाडू व लेखक म्हणतो " Pawn is the soul of a game".  आता प्रश्न पडेल कि असं का? फिलीडोरचे म्हणणे तंतोतंत खरे आहे. ‘लहान मूर्ती पण मोठी कीर्ती’ ही म्हण ‘प्याद्या’ ला चपलखपणे लागू होते.

आता हेच बघाना, विरोधकांचे मातब्बर सेनानी, मार्गात एकटे उभे राहून अडविण्याचे ‘बाजीप्रभू’ चे शौर्य हे प्याद दाखविते. ह्या प्यादांचा उपयोग एखाद्या चिलखताप्रमाणे बचावासाठी वा परिस्थितीनुसार होणारे प्रहार झेलण्यासाठी, विरोधकाला आपल्या क्षेत्रात घुसण्यापासून अडथळा निर्माण करण्यासाठी, विरोधकांच्या मोठमोठ्या सोंगट्याचा रस्ता अडवण्यासाठी होतो येव्हाडेच नव्हे तर वेळप्रसंगी राजाला शह देण्यासाठी या प्याद्यांना नेहमी पुढे उभे केले जाते. पटावरील हा 'कॉमन म्याजेव्हा  सारा पट पार करून पलीकडे पोहचून हा सामान्य जेव्हा वजिर (Queening of Pawn ) होतो, तेव्हा त्याचे खरे महत्व कळते. आहे कि नाही “सामान्यातील असामान्यत्व”!

    बुध्दीबळातील ‘प्याद्याप्रमाणे आयुष्याच्या पटावरही सामान्य माणसाला - "कॉमन मेन' ला वजीर होण्याची संधी तेव्हाच मिळते जेव्हा तो विपरीत परिस्थितीची सारी आव्हाने पार करण्यासाठी झगडतो, चांगल्या-वाईटाचे प्रहार झेलतो, सारी क्षमता पणाला लावतो, सगळा पट पार करतो.


रहिमन आपल्या एका दोह्यात म्हणतात,


रहिमन सिधी चाल सो, प्यादा होत वजीर ,
फरजी साह न हुई सके, गती तेढी  तासीर |


प्याद्याच्या ह्या अलौकिक क्षमतेचं मर्म सांगताना रहिमन म्हणतात, प्याद्याला क्षमतेची पूर्ण जाणीव आहे व तो सामान्यच राहू इच्छीतो. त्याच्या सरळ व एका वेळी एकच घर’! अश्या चालीवरून ध्यानात यावे तो वजीर होतो. घोडा मात्र तिरकस चाल असल्यामुळे, तर सरळमार्गी हत्तीची एकापेक्षा जास्त घरे चालण्याच्या रीतीमुळे वजीर होऊ शकत नाही.

इतिहासात अशी अनेक उदाहरणे आपल्याला दिसून येतात. अगदी ताजे उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदी – “चायवालेसे देशके पंतप्रधान!” .


दत्तात्रय पटवर्धन 

वाचा 


कबीराचे दोहे
वळून पाहताना भाग 2
अनामिक का सफर भाग 1

No comments: