Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Tuesday, May 13, 2014

2 कबीराचे दोहे भाग ४



काल बाप्या असाच फिरत फिरत घरी आला. जरा आनंदातच दिसत होता.चहा पिता पिता म्हणाला, एक कोडं विचारू का?”.  मी म्हणालो, अरे बाप्या, तू स्वताच एक कोडं आहे रे. मला अजून किती कोड्यात टाकशील. तुझी केमिस्ट्री समजणे अगदी कठीण. 
मला अनुभवाने माहित होत की हा काही ऐकणार नाही, मलाच ऐकावं लागेल. म्हणून म्हणालो, “सांग 
बाप्या म्हणाला, " एक मासा दुसऱ्या माशाला काय म्हणाला असेल?" 
मी म्हणालो, " भलतच काय! घेऊन तर नाहीस ना आला.".
हा असा इब्लीस बाप्प्या! दिसायला साधा सरळ पण कधी सरळ चेंडू टाकेल तर कधी क्यारम चेंडू टाकेल याचा नेम नाही. तो घरात असे पर्यंत माझ, “काय विचारेल, काय विचारेल” असं चाचपण सुरु असतं. अन एकदा गेला की, “हुश्श!”. माझा शाळेत दरारा पण, येथे...  नेहमी प्रमाणे, मी काही तरी उत्तर द्यायचं अन त्यान वितभर छाती फुगवून, एखाद्या कसलेल्या टी.व्ही. वरच्या अन्कर सारखा खर्जातील आवाजात, “आणखी एक चान्स” म्हणायचे,. त्यापेक्षा सरळ शरण येणे मी आज पसंद केले, अगदी “विना-अट शरणागती!”       
मला माहित होतं याच्या प्रश्नाचं अपेक्षित उत्तर देता येणार नाही म्हणून मी विचार करण्याचा प्रयत्नच न करता शरणागतीचा मार्ग अनुसरला.
बाप्या.मग विजयी मुद्रेने म्हणाला, ऐक मीच सांगतोअरे एक मासा दुसऱ्या माशाला काय वेगळं सांगणार. तो मासा दुसऱ्याला म्हणाला, “तू जर तोंड वंद ठेवलस तर कधीहि गळाला अडकणार नाही. 
 
एखाद्या तत्ववेत्याच्या शैलीत तो विग्रजीत पुढे बोलता झाला,"If you keep your mouth shut, you will never get caught."  माझ्याकडे मोहरा वळवत तो म्हणाला, “ आपलही असच आहे. माणसाने तोंड उघडल रे उघडल कि काही घोटाळा होण्याची शक्यता निर्माण होते – मग ते बोलण्यासाठी असो की खाण्यासाठी.” बाप्प्याचे हे बोलणे मला जरा जास्तच वाटले. मी त्यला म्हणालो,”काहीतरीच काय बोलतोस! खाण्यासाठी तोंड उघडल्याने काय मोठे आभाळ कोसळणार आहे. असल्या फालतू प्रश्नाला अडखळेल तो बाप्प्या कसला! एखाद्याने Point Blank वरून सरळ खोपडीत गोळी घालावी तश्या पद्दतीने त्याने माझ्या तोंडावर धडधड वाक्ये फेकली, “हे आता कळणार नाही, पण जेव्हा एखादा डॉक्टर तुम्हाला ‘मीठ किवा साखर खाऊ नका’ असे सांगेल, तेव्हा एव्हढासा चेहराकरून घरी याल अन वाहिनीना म्हणाल, ‘बाप्प्याच तेव्हा ऐकलं असत तर बर झालं असत. पण वेळ गेलेली असेल. तेव्हा सावध व्हा. तोंडावर नियंत्रण ठेवायला शिका म्हणजे कधीही अशी विचित्र परिस्थिती निर्माण होणार नाही.

काही तरी बोलायचं म्हणून मी म्हणालो, अरे  बाप्या, तोंड अगदी बंद ठेऊन कसे चालेल. खाण्यापिण्यासाठी का.... मला मध्येच थाबवत तो शांतपणे म्हणाला, " कधी कबीर वाचला आहेस का?”  आधीचा अनुभव लक्षात घेऊन मी पुन: चूप रहाणेच पसंद केले. थोड्यावेळाने  उत्तर येत नाही असे पाहून तो स्वत:च उत्तरला, “कबीरदास म्हणतात –


ऐसी वाणी बोलिये, मनका आपा खोल,
औरन को सितल करे, खुदही सितल होय|
 
      मी ह्या प्रश्नोतराने वैतागत बोललो, “बाप्प्या, आज काय माझा पोपट करायचं ठरवून आला आहेस काय? मासा काय, कबीरदास काय! सगळ कसं डोक्यावरून जात, अन तू इकडे अर्थ सांगत बसलायस.” तर हा माझ्या त्राग्याकडे कानाडोळा करीत बोलला,”अरे अशा वाणीचा उपयोग करा ज्यामुळे दुसऱ्याच मन शांत होईल,  ऐकणाऱ्याच्या मनाआनंद येईल - न कि त्याच्या मनात कडवेपणा, द्वेष, क्रोध, भाव जागृत होईल.” एक सुस्कारा सोडून बाप्प्या पुढे म्हणाला, “तुमचा दोष नाही, तुम्हाला कबीरदास, रामदास, इ सारखे संत कळत नाही कारण तुम्हाला हवी असतात पाश्चिमात्य पुस्तके, 'How to win friends',  'How to influence people', How to ---.अरे इथे साक्षात ज्ञानरूपी-काऊ(Cow) उभी असताना तुम्हाला हाऊ(How) कसे सुचते तेच काळात नाही.”  
 
     बाप्प्या खर बोलत होता. आम्ही डेल कार्नेजी वाचतो पण, संतवचने वाचण्यात कमीपणा समजतो. आज वाटायला लागले की बाप्प्या असाच रोज यावा म्हणजे रोज एक दोहा/श्लोक तरी कानावर पडेल. मनोमन मी वाकून बाप्प्याला दंडवत घालता झालो.



आपल्या प्रतिक्रिया नमूद करा.
दत्तात्रय पटवर्धन 

2 comments:

  1. मस्त झालंय लेखन. ब्लॉगवर खुप कमी वेळा एवढ दर्जेदार लेखन वाचायला मिळतं. लिहिते रहा.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद, आपली प्रतिक्रिया नेहमीच आमचा उत्साह द्विगुणीत करेल.

      Delete