Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Saturday, May 24, 2014

0 शायरीचा गुलदस्ता. भाग १


खुशवंत सिंगच्या ट्रुथ, लव आणि मलाइस ह्या आत्मचरित्रात त्यांनी उल्लेख केला आहे कि अहमद फराज आणि कतील शिफाई हे पाकिस्तानी शायर जेंव्हा भारतात येतात त्यावेळी दारू पिण्याची अतृप्त इच्छा पूर्ण करतात. कारण पाकिस्तान मध्ये दारूबंदी आहे
खुशवंत सिंग म्हणतात, "ज्या प्रमाणे उंट लांबच्या प्रवासाला निघतो तेव्हा भरपूर पाणी पिउन घेतो तसा या दोघांचा प्रकार.
दारू पिणारे लोक एकत्र आले म्हणजे कॉकटेल वैगैरे सारखे प्रकार हे होणारच. वेगवेगळ्या प्रकारची मद्ये एकत्र करून पिल्याने एक वेगळीच खुमारी चढते.

अशा दारू  आणि कॉकटेल च्या  सानिध्यात येणाऱ्या अहमद फराज या शायराला एक आगळा वेगळा कॉकटेल सुचतो. या कॉकटेल ची मजा तुम्हीच चाखा .

गमे-दुनिया भी गमे-यार में शामिल करलो,
नश्शा बढ़ता है , शराबे जो शराबों में मिले ||

जगाचं दु:ख आपल्या दु:खात  मिसळून घ्या दु:खाला न्याराच रंग चढतो दु:खाची सरमिसळ होते आणि जगण्याची नशा आपल्या रोमारोमात भिनत जाते वेगळी खुमारी चढते जशी एखादी दारू दुसऱ्या दारूत मिसळल्यावर येते
मिर्झा गालिब हा शायर तर म्हणतो,

ईश्रते-कत्रा है दरिया में फ़ना हो जाना,
दर्द का हदसे गुजरना है दवा हो जाना ||

इश्रत :  आनंद , सुख, pleasure
कत्रा  :  बून्द, थम्ब, droplet , drop

पाण्याच्या थेंबाला समुद्रात विलीन होण्यातच आनंद असतो, ह्या आनंदाला शब्दात व्यक्त करणे कठीण. तसंच दु:खाचा प्याला काठोकाठ भरला कि तेच दु:ख एखाद्या औषधासारखं होतं.

गालिब असाही म्हणतो,

रंज से ख़ूगर हुवा इंसा तो मिट जाता है रंज,
मुश्किलें मुझपर  पड़ी इतनी की आसाँ हो गई ||

ख़ूगर  :  व्यसनी, अभ्यस्त, addicted , habituated
रंज  :  दुक्ख, क्लेश , grief , sorrow , distress



दत्तात्रय पटवर्धन 
विजया यादव 

वाचा 
कबीराचे दोहे भाग 1 
अनामिक का सफर भाग १  
वळून पाहताना भाग १ 
बुद्धिबळातील प्यादे

your comments will be an asset to us.

No comments: