एकदा मी बाप्याच्या घरी गेलो. आश्चर्य वाटतंय का? होत काहीतरी काम. पण मनात पक्क होत काहीतरी ऐकावं लागणार तेव्हांच माझ काम होणार.
मी घरी गेलो. घरातल्या सगळ्यांशी गप्पा मारल्या परंतु बाप्या काहीतरी विचारात गढलेला दिसला. मी त्याला विचारलं, "बाप्या काय विचार करतोय रे?"
बस, लगेच सुरु झाला. म्हणाला, "काल मला एक स्वप्न पडलं."
मी थोडा हादरलोच. बाप्याच स्वप्न!!!
तर बाप्या पुढे सुरु, " अरे काल माझ्या स्वप्नात, एक कुत्रा आणि मांजर आलं". आता तर मला ४४० व्होल्ट चा झटकाच लागला.
बाप्या म्हणाला, " तो कुत्रा आणि मांजर बोलत होते". बोंबला आता कुत्रा आणि मांजर बोलत होते,
मनात विचार आला आता बाप्याला ठाण्याला नाहीतर सरळ बंगलोर "निमांस" लाच न्यावे लागणार.
परंतु ऐकण तर भागच आहे. मीच विचारलं, काय बोलत hote?"
तर बाप्या म्हणाला, " कुत्रा म्हणत होता, माझा घराचा मालक मला सर्व सेवा देतो. घरातील मंडळी मला प्रेम करतात, खायला देतात.
मला वाटते तो देव आहे.
मी म्हणालो "मग मांजर काय काय म्हणाली,"
बाप्या म्हणाला, " अरे मांजर म्हणाली, माझ्याही घराचा मालक मला सर्व सेवा देतो. घरातील मंडळी मला प्रेम करतात, घरातील मुले माझ्याशी खेळतात.
मला तर वाटते मीच देव आहे."
मी विचार करत आहे यातील बरोबर कोण? या बाप्याच्या परीक्षेत एक कठीण प्रश्न असणारच.
या एकाच प्रश्नात चारही 'life lines ' जाणार.
मी म्हणालो "बाप्या मांजरच बरोबर न!! बघ आसाराम बापू , किती सेवा मिळते, तीही लाखो लोकांकडून. किती प्रेम मिळते, अगदी सर्व कसे जीव द्यायला तयार होतात.
मग आसाराम बापू सारख्यांना मांजरीसाराखेच वाटते न!! ते चुकणे शक्य आहे का रे?"
त्यावर बाप्या चिडला व म्हणाला, अरे मांजरीला गर्व आहे. आणि कुत्रा विनम्र आहे. आपल्याच मालकाकडून (गुरुकडून) मान साम्मानाची अपेक्षा योग्य नाही.
काबिर्दसाजी म्हणतात, अहं अगीन हिरदै जरै, गुरु सो चाहै मान
तिनको जम न्योता दिया, हो हमारे महेमान.
हृदयात अहंकाराचा अग्नी एव्हडा तीव्र आहे कि आपण जो आपल्यला सेवा देतो त्याच्याच कडून मान साम्मानाची अपेक्षा करतो. आपल्या गुरु कडूनच स्नामानाची अपेक्षा
केली जाते. अशा अहंकारी ना यमराजाचे निमंत्रण असते कि या तुम्ही आमचे पाहुणे व्हा. तुम्ही गुरुभक्त होण्याच्या लायकीचे नाहीत. अहंकार हि दुखाची खान आहे.
दत्तात्रय पटवर्धन

आजचा सुविचार
आजचा सुविचार
Send Feedback
No comments: