Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Tuesday, October 7, 2014

2 असे हे इंग्रजी शब्द : भाग ६

मेलेल्या सिंहावर संजीवनी मंत्राचा उपयोग करून त्याला जिवंत करणारा शेवटी त्या सिंहाचे भक्ष बनतो, हि कथा आपण लहानपणापासून वाचत व ऐकत आलो आहोत. मिळविलेल्या ज्ञानाचा तारतम्याने वापर केला नाही तर कसा विनाश होतो याचे हे जिवंत उदाहरण.  

मेरी शेली ह्या लेखिकेच्या Frankenstein या पुस्तकातील Dr . Frankenstein ची कथा हि अशीच. विक्टर फ्रैंकेस्टाइन हा तरुण तब्बल चार वर्षे अविरत मेहनत करून निर्जीव वस्तूंमध्ये प्राण फुंकता येतील का, प्राण प्राण फुंकून त्याला जिवंत करता येईल का, म्हणून संशोधन करीत असतो. शेवटी त्याला त्यात सफलता मिळते. मग तो दवाखाने, कबरी यातून मेलेल्या माणसांचे येनकेन प्रकारेण अवयव गोळा करतो, त्यांना जोडतो व त्यात प्राण फुंकतो आणि काय चमत्कार! कलाकृती जीवित होते. परंतु त्याचा गगनात न मावणारा आनंद क्षणभरच राहतो. थोड्याच वेळात त्याची घडवलेली मूर्ती महाकाय राक्षसाचे रूप धारण करते आणि त्याच्या वरच हल्ला करते. तो तेथून कसाबसा पळ काढतो आणि मग एक विनाशाची शृंखला सुरु होते. एकूण १८ भागात असलील्या ह्या कादंबरीचे लिखाण वयाच्या १८व्या वर्षी पहिल्या भागाने १८१८ मध्ये सुरु झाले व तो ‘अनामिक’ म्हणून १८२० मध्ये प्रकाशित झाला. तर दुसरा भाग १८२३ मध्ये स्वत:च्या नावे प्रसिद्द झाला. आज आपण Frankenstein लाच विनाशकारी राक्षस म्हणू लागलो. इंग्रजी भाषेला एक अमूल्य शब्द देऊन हा लेखिका गेली.  ह्या शब्दाचा उपयोग १८३०-४० (१८३८?) मध्ये झाला असावा –

Frankenstein  : A creation that gets out of control and bring harm to its creator; : One who creates something that brings ruins to himself. (एखादी निर्मितीच आपल्या निर्मात्याच्या घातास कारणीभूत ठरते).

     विनाशाचे तांडव बघायला व सहन करायला लावणारे असे अनेक मानवाच्या निर्बुध्दतेने घडलेले इतिहासात दिसतात पण मानव त्या पासून शिकलेला दिसत नाही. अगदी अलीकडील उदाहरणे पहावयाची झाल्यास –
असे म्हणतात कि इराक़ मधील तेलाच्या हव्यासापोटी सद्दाम हुसैन नावाच्या Frakenstein ला अमेरिकेनेच घडवले आणि तोच त्याच्या जन्मदात्याच्या मानगुटीवर बसून आव्हाने देऊ लागला, त्याच्या विनाशाची स्वप्ने पाहू लागला. सद्दाम हुसैन अमेरिकेचा फ्रैंकेस्टाइन म्हणून नंतर प्रसिद्द झाला..

     ८ जुलै २०१२ च्या 'Mail  Today ' च्या अंकात कुलदीप नायर
कुलदीप नायर
यांनी एक लेख लिहिला होता "
How congress invented a 'Sant'? त्यात त्यांनी म्हटले होते कि १९७७ मध्ये अकाली दल कॉंग्रेसला हरवून सत्तेत आली. ज्ञानी झैलसिंग यांना मुख्यमंत्री पदावरून खाली उतरावे लागले. त्यावेळी संजय गांधी
संजय गांधी
यांनी असा विचार मांडला कि आपण एखाद्या संताचा उपयोग अकाली दल ला आव्हान करण्यास करू. त्यासाठी संत भिंद्रनवाले यांची निवड झाली. पुढे काय झाले आपण सर्वाना माहीतच आहे. कुलदीप नायर
सारख्या प्रथितयश साहित्यिकाने ह्या शब्दाची मोठ्या मार्मिकतेने योजना करून कॉंग्रेसच्या ह्या अवघड जागेच्या दुखण्याचे वर्णन केले आहे -
"little did they realize at that time that they were creating a Frankenstein."

     पाकिस्तान नेहमीच दहशतवादाला खतपाणी घालत असतं. आता तोच दहशतवाद त्यांना गिळू पाहत आहे. Indian Express च्या २७ जानेवारी २०११ च्या लेखाचा मथळा होता -         "Terrorism : Pak has created 'Frankenstein's monster', says India." खरच दहशतवाद हा पाकिस्तानने जन्माला घातलेला फ्रैंकेस्टाइनचा राक्षस आहे आणि आज तो त्याच्याच जीवावर उठलेला जाणवतो आहे.

     एखादा लेखक कसा कळत नकळत एखाद्या शब्दाला जन्माला घालतो आणि जगात अजरामर होतो याचे "फ्रैंकेस्टाइन"  हे उत्तम उदाहरण आहे. 


दत्तात्रय पटवर्धन 





आजचा सुविचार
आजचा सुविचार


Send Feedback

2 comments: