आम्ही खवळुनिया उठतो
पाहुनी हे जग इलेक्शनचे
गवसता नोटा करोडोच्या
साठा टनावारी मदिरेचा II
अभागी जीव खपती ह्या इथे
शेतामधी पिकवायला सोने
परि नशिबी असे यांच्या
सदा कवडीमोल हो जीणे II
नसे खळगी भराया शेवटी अन्न
फिरे हा सावकारा घरी अन्नान्न
फायदाही नसे सरकारी योजनांचा
फस्त सारे कराया आहे बडे मत्स्य II
ना 'जाणता राजा', 'अहिल्याबाई' थोर
म्हणाया कागदोपत्री असे 'सुराज्य'
कृषीमंत्री आम्ही केंद्रात असता कसे
गळां फाशी इथे घेती दररोज कृषक II
जनांमनाची सोडलेली असे त्यांनी
म्हणे भार तुमचा आमुच्या खांद्यावरी
'काय द्याचे' राज्य अमुचे स्वप्न आहे
'फायद्याचे बोल' अमुचे लक्ष आहे II
पक्षी-विपक्षी आजी आम्हां मोल आहे
आमच्या शब्दास येथे तोल आहे
(पर)राष्ट्रवादीच्या नशिबी घोर आहे
सोनियाच्या घरी प्रवेश बंद आहे II
कधी 'हात' हाती घ्या
कधी स्वहस्ते घडाळ्या ल्या
कधी 'कमल'दले गा लक्ष्मीस्तोत्र
मुखी सदैव 'समाजवादी' मंत्र II
हे कोण म्हणता, मतदार जनता?
आमुच्या पुढे यांची काय महता?
देऊनी आश्वासनें, मिळवितो मत्ता
घेउनी यांची मतें, पळवितो सत्ता II
प्रकाश पटवर्धन
You may like to read this
आजचा सुविचार
आजचा सुविचार
Send Feedback
No comments: