Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Monday, February 1, 2016

0 आज सारे आपले परकेच झाले





आज सारे आपले परकेच झाले
कोण सांगा कुणाला प्यार झाले I 

येथ सारे चिंब स्वार्थी जाहलेले
मानवाचे गोत्र त्यासी भार झाले I

मायबापा ठेवती बाहेर प्यारे
हे समाजी पापही मंजूर झालेI 

हा फुलोरा सुखवितो नेत्रास भारी
आज काट्यांचे असे ही वार झाले I 

आज दारी पाहुणे ही येत नाही 
सांत्वनी मेसेज येथे फार झाले I 

काय वर्णू येथले औदार्य देवा
वृध्द डोळे पाहुनी ते गार झाले I
 
आज श्रध्दा संपली, बाजार झाले
धर्म, प्रेषीतांचे रेटही मंजूर झाले I

हा खुला बाजार चाले दिवस राती 
येथ सारे वीर ही हो गार झाले I



-  प्रकाश पटवर्धन 

No comments: