Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Friday, January 22, 2016

0 स्मरता जरा सुखाला, हे काय हो जहाले



स्मरता जरा सुखाला, हे काय हो जहाले
बाजार हे व्यथांचे, वरतीच काय गेले I
समजून घे खरे हे, दुःखात सुख आहे
या मानवी जगाचा, तोची सखाच आहे I
त्या मागण्याच साठी, सारेच एक झाले
ते कारखानदारां, वाईट मात्र झाले I
देऊ नको फुकाचे, घे काम, घाम गाळी
छातीवरीच कोणी, नेवू शके न बाळी I
कोणी कशास गाळी, दो बुंद आसवांचे
माझे मलाच थोडे, ऐकू कुणा कुणाचे I
ठेवू नका भरवसा, कोणी नसे कुणाचे 
स्वार्थात मग्न सारे, मागेच ते धनाचे I
सोडून शेत जागा, धांवू नकोस मागे
टोप्या खुणावती रे, संकेत ते भ्रमाचे I
टोप्याही लोकशाही, रंगात रंगलेल्या 
भांगेपरी नशेच्या, धुंदीत धुंदलेल्या I 
कैवार फार झाला, गजेंन्द्र ठार गेला 
'अरविंद' काय सांगु, 'विश्वास'घात झाला I
सुतक कुणास नाही, जो तो हिरीरी ने
दोषारोपी करती, तरीही क्रमाक्रमाने I
          -  प्रकाश पटवर्धन  

No comments: