बाप्याबरोबर मी असाच भटकंती करीत होतो, गप्पांमध्ये रंगलो होतो, किती अंतर चालून आलो ते गप्पांमुळे कळलेच नाही. एकदम थकवा जाणवला म्हणून एके ठिकाणी बसलो. गप्पा सुरूच होत्या. बाप्या असल्यावर विषय अमाप! तेव्हड्यात बाप्याचे लक्ष खजुराच्या झाडाकडे गेले. बाप्या म्हणाला चढतो वर, खजूर तोडून खाऊ.
मीही होकार भरला. बाप्या झाडावर चढायला तर लागला पण तो जसजसा वर जायला लागला तसतशी भीती वाटू लागली - पाय सटकला तर, चक्कर आली तर? खजुर तर नाही वरून पाय प्लास्टरमध्ये. तो मनातल्या मनात देवाची करुणा मागू लागला.
मनुष्य सेवा करतो, देवाची प्रार्थना करतो ती फक्त बदल्यात काही मिळण्याच्या उद्देशाने. रोज देवाला प्रसाद चढवतो, भोग चढवतो तोही देव खात नाही हे माहित असते म्हणून. देवाने जरी चुकून कां होईना थोडासा प्रसाद खाल्ला तर... मनात भाव नसतो, भक्ती नसते. सारा स्वार्थाचा मामला! कबीरदास म्हणतात असा मनुष्य सेवक होऊच शकत नाही कारण तो त्या सेवेच्या बदल्यात चौपट फळाची अपेक्षा करतात.

आपणही बाप्यासारखेच करत असतो नाही - संकटात देवाचे स्मरण करतो, देवाकडून काही अपेक्षा असली कि प्रार्थना करतो. बाप्याही तेच करत होता. म्हणाला, “ देवा, खजूर तोडून सुरक्षित खाली पोहचू दे, मी तुझ्या मंदिरात ५ रुपये दान करेल. बाप्याला हुरूप आला, आता तर देवाजवळ प्रार्थना केली होती. पुन्हा सरसर झाडावर चढू लागला. जसा खजूरा जवळ पोहचू लागला त्याच्या मनात विचार आला. प्रयत्न मी करतोय, जोखीम मी घेतोय, आणि मी देवाला ५ रुपये चढावा का चढवू? जसा हा विचार त्याच्या मनात आला बाप्या धडामकन खाली पडला. तशातही आकाशाकडे पाहून म्हणतो, " अरे देवा, थोडी गम्मतही सहन होत नाही? मी तर गमतीने म्हणालो होतो." "अरे (खजूर मिळाले असते) मी तर ५ काय १० रुपये चढवणार होतो.
कबीरदासजी म्हणतात,
कबीरदासजी म्हणतात,
फल कारण सेवा करे, करे न मनसे काम |
कहे कबीर सेवक नही, चहे चौगुना दाम ||
कहे कबीर सेवक नही, चहे चौगुना दाम ||
मनुष्य सेवा करतो, देवाची प्रार्थना करतो ती फक्त बदल्यात काही मिळण्याच्या उद्देशाने. रोज देवाला प्रसाद चढवतो, भोग चढवतो तोही देव खात नाही हे माहित असते म्हणून. देवाने जरी चुकून कां होईना थोडासा प्रसाद खाल्ला तर... मनात भाव नसतो, भक्ती नसते. सारा स्वार्थाचा मामला! कबीरदास म्हणतात असा मनुष्य सेवक होऊच शकत नाही कारण तो त्या सेवेच्या बदल्यात चौपट फळाची अपेक्षा करतात.
कबीराचे दोहे सुद्धा समजणे अवघडच आपण गोष्टीरुपातून समजावण्याचा प्रयत्न करता आहात ते खूपच छान आहे.
ReplyDeleteपुढील लेखांची वाट बघत आहे.
कबीराने मनुष्य स्वभाव, त्याचे कर्मकांड, कथनी आणि करणी यातील फरक यावर केलेली टीका नक्कीच वाखाणण्यासारखी आहे.
ReplyDeleteकर्मठ समाजासमोर अशी टीकेची धारदार तलवार घेऊन उभे राहणे हे नक्कीच हिमतीचे उदाहरण आहे.
ReplyDelete