Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Monday, June 9, 2014

0 शायरीचा गुलदस्ता : भाग ६

माशुक' हा एक उर्दू शायरीतला आवडता शब्द. प्रियतम, प्रेयसी, आशिक ह्या पंक्तीतला समानार्थी शब्द. माशुक नेहमीच त्याच्यासाठी सर्वांग सुंदर असतो. तिचे अत्यंत नाजूक लावण्य आणि त्यात नखरेल अदांची भर म्हणजे सौंदर्याला निसर्गाने लावलेली तीट..... लावण्याची नजाकत पाहून अगदी राजकुमार फिल्मी स्टाइल मध्ये म्हणतो " ये पांव जमीपर न रखना इसमे छाले पड़ जाएंगे.” एखादं मोरपिस हळूच गालावरून फिरते तो शहारणारा मोरपिशी स्पर्श म्हणजे तुझं सौंदर्य.... बर सौंदर्याची स्तुती तरी किती करावी, काही मर्यादा! आता हा शायर पहा काय म्हणतो,

बहुत बढ़ चढ़ के दावे चौदवी का चाँद करता है,
तुम्हे मेरी कसम उठना , जरा तुम भी संवर जाना ||

हा पौर्णिमेचा चंद्र स्वतःच्या सौंदर्याची तारीफ करण्यात गुंग असतो. सौंदर्याची मिजास अभिमानाने मिरवत असतो.... हे प्रियतमे तू जरा उठ तैयार हो अन त्याला दाखव खरं सौंदर्य काय असत म्हणजे त्याची गुर्मी उतरेल.

यावर जफ़र कलिम साहेब काय  म्हणतात,

जब संवरकर मेरा महबूबे-नजर बैठ गया,
चाँद शरमा के घटाओं में उधर बैठ गया ||

महबूबे नजर  :  beloved

आरस्पानी सौंदर्याचा ‘ब्युटी स्पॉट’ म्हणून मिरवणारा तिच्या चेहऱ्यावरील तीळ! हा घायाळ करणारा, भान हरखून टाकणारा असा हा तीळ सौंदर्याचे प्रतिक अन शायर साहेबांचा याकडे वेगळ्याच अंगाने पाहणारा हा त्याचा दृष्टीकोन –

अब ये समझा के तेरे रुखसार पे तिल का मतलब,
दौलते हुस्न पे दरबान बिठा रखा है || --- अज्ञात

ज्याप्रमाणे एखाद्या अमुल्य खजिन्यावर पहाऱ्यासाठी पहारेकरी असतो, अगदी त्याच प्रमाणे तुझ्या अमुल्य सौंदर्याच्या खजिन्यावर हा तीळरुपी दरबान बसवलेला दिसतोय! चेहऱ्यावरील तिळाचा अर्थ आता आता कुठे मला कळलाय. तुझ्या अफाट सौंदर्याचा रक्षक म्हणून तिळाची नेमणूक करणारा किती रोमाटिक. संगमरवरासारख्या गोऱ्यापान चेहेऱ्यावर हा काळ्या रंगाचा तीळ, जणू कोणाची नजर लागू नये म्हणून.

दत्तात्रय पटवर्धन
विजया यादव

शायरीचा गुलदस्ता भाग ५,   शायरीचा गुलदस्ता भाग ४,   शायरीचा गुलदस्ता भाग ३   शायरीचा गुलदस्ता. भाग २,    शायरीचा गुलदस्ता. भाग १

No comments: