भारतीय लोकशाहीचे मंदिर म्हणून ज्याची ख्याती आहे अशी भारतीय संसद अन शेर-ओ-शायरीचे नाते खूप जुने आहे. आपले म्हणणे मोठ्या खुबिने अन परीणामकतेने मांडण्यासाठी वेळोवेळी प्रख्यात नेते मंडळी शायरीचा सहारा घेतानां दिसतात. वानगी दाखल काही प्रसंग येथे नमूद करतो -
१६ व्या लोकसभा निवडणुकीत NDA ला कधीही नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात बहुमत मिळालं कि १५ व्या लोकसभेतील सताधारी वा सर्वात मोठा पक्ष कॉंग्रेसची परिथिती मोठी दयनीय झाली. ‘सत्ताधारी’ हि बिरुदावली तर हिसकावून घेतली गेलीच पण स्वबळावर विरोधी पक्षनेतेपदहि मिळणे दुरापास्त झाले आणि विरोधी पक्षनेतेपदासाठी सारा यु.पी.ए.चा गोतावळा जमा करावा लागला. ह्या बहुमताचा रेटा इतका जोरदार/असह्य होता कि श्रीमती सुमित्रा महाजन यांची लोकसभा अध्यक्षा (speaker ) म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर मोदींना शेलकी विशेषणे लावणाऱ्या व ते कधीही पंतप्रधान होणे नाही असा जावईशोध लावणाऱ्या नेत्यांनां आपल्या अभिनंदनपर भाषणांत लहान वा अल्प खासदार असलेल्या पक्षांना बोलण्यासाठी/त्यांच्या मतदार संघाचे प्रश्न मांडण्यासाठी जास्त वेळ देण्याची विनंती करावी लागली. कॉंग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाची स्थिती एकूण खासदारांपैकी १०% खासदारहि नसावे इतकी दयनीय झाली अन इतर लहान पक्षांची स्थिती तर नगण्यच झाली – ६ पक्ष अवघा एकच खासदार देऊ शकला.. म्हणून प्रत्येकाच्या मनात शंका असावी कि सत्ताधारी पक्ष सगळ्या लहान पक्षांना बरोबर घेऊन चालेल कां कि आपलीच मनमानी करेल?
(१) नेमकी हीच बाब मल्लिकार्जुन यांच्या भाषणातून व्यक्त झाली कि अध्यक्ष महोदया, आम्हाला विश्वास आहे कि आपण या सर्व पक्षांना बरोबर घेऊन वाटचाल कराल -
हयात लेके चलो, कायनात लेके चलो,
चलो तो सारे जमाने को साथ लेके चलो ||
१५ व्या लोकसभेत रेल मंत्री म्हणून अंतरिम बजेट संसदेत मांडताना सुरवातीलाच मल्लिकार्जुन एक शेर उद्घृत केला –
सादिक हूँ अपने कौल में ग़ालिब ख़ुदा गवाह,
लिखता हुँ सच के ' झूट की आदत नहीं मुझे " ||
(२) ‘Rail Tariff Authority’ ची स्थापना करताना ते म्हणाले होते कि ह्यामुळे रेल्वे भाडे ठरवताना पारदर्शिता निर्माण होईल. "RTA is a path breaking decision. Determination of rates will no longer be an exercise behind veils where the Railways and Users could only peep covertly at what was happening on the other side."
त्यावेळेस त्यांनी हा शेर पेश केला –
कभी चिलमन से हम झाके, कभी चिलमन से वो झाके
लगा दो आग चिलमन को , न हम झाके न वो झाके ||
( चिलमन : पडदा, मुगले-आज़म सारख्या सिनेमात चटईवजा पडदा ज्याच्या पलीकडे स्त्रिया बसलेल्या असतात.)
(३) तारकेश्वरी सिन्हा यांना कही कारणावरून कांग्रेस पक्षातून बाहेर काढलं, तेव्हा एक जाहिर सभेत त्या म्हणाल्या –
गुलसिता को लहू की जरुरत पड़ी,
सबसे पहले ही गर्दन हमारी कटी,
फिर भी कहते है मुझसे ये अहले-चमन
ये चमन है हमारा तुम्हारा नहीं ||
(४) जवाहरलाल नेहरू अजारी असताना त्यांना भेटायला गेलेल्या नर्गिसने जेव्हा नेहरूंच्या तब्येतीची विचारपूस केली तेव्हा त्यांनी ह्या शेरचा चपलखपणे उपयोग केला होता-
उनके देखेसे, जो आ जाती हैं मुह्पर रौनक ,
वो समझते है कि बिमार का हाल अच्छा हैं ||
असे होते आणि आहेत नेते मंडळी अन त्यांचे शायरी-प्रेम!
दत्तात्रय पटवर्धन
विजया यादव
शायरीचा गुलदस्ता भाग ४
शायरीचा गुलदस्ता भाग ३
शायरीचा गुलदस्ता. भाग २
शायरीचा गुलदस्ता. भाग १
No comments: