Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Sunday, June 1, 2014

0 शायरीचा गुलदस्ता भाग ४



गाजिओमे बू रहेगी जबतलक ईमान कि
तब तो लन्दन तक चलेगी तेग़ हिन्दुस्तान कि |


जो पर्यन्त शुर सैनिकांमध्ये इमानदारीचा अंश आहे. तो वर हिंदुस्तानची तलवार थेट लन्दन पर्यन्त जाऊन भिडेल  ......

१८५७ च्या स्वातंत्र लढ्यात बंडखोर सैन्याकडून  लढाईत उतरणार्या या ८२ वर्षाच्या बादशहाला वृद्धा म्हणायचे कि  युवावृद्ध हा प्रश्न  पडतो. जीवनात प्रत्येकाला नाशिबाबरोबर सापशिडीचा खेळ खेळावा लागतो. कुणाच्या जीवनात हे नशीब शकुनी सारखे असते. अत्यंत कुशलतेने फासे फेकत असतो आणि भांजे 'चार गिरे चार' असा जल्लोष करत असतो. असाच काही या बादशाच्या बाबतीत घडत होतं. नशिबाचे फासे
उलटेच पडत होते.
जफर बारा तेरा वर्षाचा होता तेव्हा गुलाम कादिर याने दिल्लीवर आक्रमण केले. अनन्वित अत्याचार केलेत. बेगम आणि मुलांना मारपीट केली.
बादशाहाला ( जफ़र चे आजोबा) दरबारात त्याच्या उरावर बसून खंजिराने त्याचा एक डोळाच फोडला. त्या दृशाचा वर्णन करताना जफ़र साहेब
लिहितात,

कोई आँख न थी जो ऑसुओंसे तर न थी
कोई दिल न था जो उस गमसे खाली न था |

अस  बालपणापासून उध्वस्त जीवन जागणार्या बदशाहने लिहिले,

न किसीकी आँख का नूर हु , न किसीके दिलका करार हु ,
जो किसीके काम न आ सके , वो मै एक  मुश्ते-गुबार हु |


नूर : प्रकाश , लाइट
मुश्ते-गुबार  :  मूठभर धूळ

--- कुणाच्या नेत्राचा मी प्रकाश बनू शकलो नाही , कुणाच्या दृदयाला मी आनंद देऊ शकलो नाही
कुणाच्या उपयोगी पडणार नाही अशी मी एक मूठभर धूळ आहे.

बादशहा जफ़र ला ११ ऑक्टोबर १८५९ ला रंगून येथे हद्दपार करण्यात आले. तेव्हा "लगता नही है दिल मेरा उजड़े दायर में ......." या गजलचा  जन्म झाला. त्यातील एक लोकप्रिय मक्ता आहे,

कितना था बदनसीब जफ़र दफ्न के लिए ,
दो गज जमी न मिल सकी कु-ए-यार में |


कु-ए-यार  : प्रेयसीची गल्ली. कूचा म्हणजे गल्ली .

जफ़र आपल्या नशिबाला कोसताना म्हणतो, मी किती कमनशिबी आहे कि मला मृत्युनंतर  दफन करण्यासाठी आपल्या प्रेयसी (मातृभूमी ) च्या गल्लीत दोन गज जागाही  मिळाली नाही.

बस,

यही हसरत थी के घर मेरा मदीने में रहे,
बना रंगून में, अरमां मेरे दिलके दिल में रह गए. 


 दत्तात्रय पटवर्धन 
विजया यादव 
शायरीचा गुलदस्ता भाग ३
 शायरीचा गुलदस्ता. भाग २
 शायरीचा गुलदस्ता. भाग १

No comments: