Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Sunday, May 31, 2015

1 शायरीचा गुलदस्ता भाग 11


उर्दू शायरी मध्ये 'चिराग' शब्दाचा प्रयोग अनेकदा केलेला आपणाला आढळतो. चिराग या शब्दाचा अर्थ 'दिवा' असा होतो.परंतु चिराग हा शब्द वेगवेगळ्या संकेताने अनेक वेळा वापरलेला दिसतो. असाच एक शेर पहा,

शहर के अंधेरे को इक चिराग काफी है.
सौ  चराग जलते है इक चराग जलनेसे.                         अज्ञात

समाजात जो अंधार पसरलेला आहे, ज्या कुप्रथा रूढ झालेल्या आहेत त्या दूर करण्यासाठी एका दिव्याची गरज असते. येथे 'चिराग' हा शब्द आदर्श, सभ्य, संस्कारी माणसाच प्रतिक आहे. एक झिजस, एक राम, एक महात्मा गांधी, एक सावरकर, एक भगत सिंग, एक टिळक,  एक बाबासाहेब आंबेडकर, हजारो लाखो लोकांना जागृत करतात. अन्याया विरुद्ध जुलमी राजवटी विरुद्ध, उठाव करण्यास प्रवृत्त करतात.  अशी एकच व्यक्ती समाजातील  अंधकार दूर करण्यास समर्थ असते कारण तोच दिवा हजारो दिव्यांना प्रज्वलित करतो म्हणजेच एक व्यक्ती हजारो लाखो लोकांना कार्य सिद्धीस नेण्यास प्रवृत्त करत असते.

हथेलियोने  बचाया बहुत चरागों को,
मगर हवा भी अजब जाविए बदलती है.                           अज्ञात

जाविए : कोण, angles

जेव्हा हवा सुरु होते तेव्हा दिवा विझु नए म्हणून आपण त्या दिव्याला हाताने झाकतो. येथे 'चराग' म्हणजे एखादा उत्कट विचार, संस्कार, प्रथा, किव्वा सभ्यता. 'हथेली' हे सभ्य माणसाच प्रतिक. म्हणजेच सभ्य माणसांनी हे संस्कार, ही सभ्यता समाजात  टिकून राहण्यासाठी कसोशिने प्रयत्न केलेत. परंतु "हवा भी अजब जाविये बदलती है."   परंतु जुलुमी हवा वेगवेगळ्या दिशेने या दिव्यावर आक्रमण करून हा दिवा विझवण्याचा प्रयत्न करत असते.

दत्तात्रय पटवर्धन

1 comment:

  1. फार छान विश्लेषण. उर्दु काव्यात अशी सिंबल्स म्हणुन कांही प्रचलित शब्द वापरले जातात. आशा शब्दांचा खरा अर्थ कळल्यावर त्या व्दिपदीचा वा गजलचा मजा अनुभवास येतो व शायराची ताकद कळते. डटे रहो.

    ReplyDelete