Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Monday, May 4, 2015

0 शायरीचा गुलदस्ता भाग १०.

निदा फाजली, एक चालत बोलत अंजुमन ,   यांची हि गज़ल आहे. 
प्रत्येक गज़ल हि काहीना काही आशय  घेऊन येते. प्रत्येक शेर वेगवगळ्या विषयाशी ओळख करून देतो.
गजल वाचल्यावर प्रत्येकाला असे वाटते की गजल ही त्याच्या  साठीच लिहिलेली आहे.

कही छत थी, दिवारो-दर थे कही, मिला मुझको घर का पता देरसे,
दिया तो बहुत जिन्दगिने मुझे, मगर जो दिया वो दिया देरसे.

घराच छत  कुठे तर दरवाजे-भिंती कुठे भलतीकडेच असल्यामुळे मला, माझ आपलं पूर्ण  घर मिळायला उशीर झाला.
तस पाहिलं तर मला या जीवनात खूप काही मिळाल. प्रत्येकाला मिळत असतं. परंतु मला उशिरा मिळाल .
वेळ निघून गेली होती आता त्या मिळालेल्याची काहीच किंमत माझ्या जीवनात नव्हती,
 त्याची आवश्यक्यता हि नव्हती.

हुवा न कोई काम मामुलसे, गुजरे शबोरोज कुछ इस तरह
कभी चांद चमका गलत वक्तपर, कभी घरमें सुरज उगा देरसे.

काय कहाणी सांगू जीवनाची? प्रत्येक कामात अडचणी. कोणतच  काम सहजतेने झाले नाही.
आयुष्यातील दिवस रात्र (शबोरोज) असे गेले कि कधीच वेळेवर चंद्र उगवला नाही तर
सूर्य नेहमीच उशिरा उगवला.

ये इत्तेफ़ाक़त  का खेल है, यही है जुदाई, यही मेल है,
मै मुडमुडके देखा किया दूर तक, बनी वो खामोशी, सदा देरसे |

जीवनात घडणार्या गोष्टी या योगायोगाच्या असतात. मग एखाद्याची भेट काय आणि ताटातूट काय?
परंतु मी मागे वळून वळून क्षितिजा पर्यंत पाहत राहिलो कि कोणीतरी साद ( आवाज ) देईल. आम्हाला बोलावेल.
परंतु दर वेळेला एक भीषण शांतताच नजरेस पडली. आणि आसाच एक दिवस आवाज आला परंतु त्यावेळेस
उशीर झालेला होता.

कही रुक गये राह में बेसबब, कही वक्तसे पहले घर आई शब,
हुए बंद दरवाजे खुलखुलके सब, जहा भी गया मै - गया देरसे. |

आता या सर्वासाठी केव्हा केव्हा माझीच चूक होती ना. कारण नसताना आम्ही रस्त्यात थांबलो, तर कधी निघायच्या  वेळीच
अंधारून आलं. अनेक दरवाजे माझ्या साठी उघडले गेले, आणि बंद झाले. कारण मी प्रत्येक ठिकाणी उशीराच  पोहोचलो.

सजा दिनभि रोशन, हुई रातभी, भरे जाम, लहरी बरसात भी,
रहे साथ कुछ ऐसे हालत भी , जो होना था जल्दी हुआ देरसे ]

अस नाही कि आमच्या जीवनात बहार हि कधीच आली नाही. चमचमती रात्र कधीच आली नाही. पावसाळ्याचा आनंदही लुटला नाही, प्याले भरभरून रिकामे  झाले नाहीत. अस कही नाही. हे सर्व कही झाल, परंतु अशा वेळी झाल कि ज्या वेळी व्हायला हव होतं तेव्हा झाल नाही. .


दत्तात्रय पटवर्धन

No comments: