Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Thursday, April 30, 2015

0 बुद्धिबळाचा इतिहास भाग 6

सहाव्या शतकात चतुरंग हा खेळ पर्शियात आला. येथे गोट्यांची नावे पर्शियन भाषेत
अथवा उच्चाराप्रमाणे ठेवली गेली. पर्शियन भाषेत, 'चतुरंग' चे 'झतरंग' असे
झाले. अरबी मध्ये 'शतरंज' , मलाई मध्ये 'झीतोर' तर मंगोल मध्ये 'शतर'
अशी नावे बदलली. पर्शियांस या खेळात जास्त बदल करू शकले नाहीत
कारण अरबांनी याच शतकात येथे हल्ले केले आणि आपले राज्य स्थापन केले.
पर्शिअन साहित्यात 'कार्नामक'  नामक ग्रंथात, पहलवी भाषेत, या खेळाची माहिती मिळते.
पर्शियात 'फिर्दीसी' नावाचा कवी क ९५५ - १०१० या काळात होऊन गेला. त्याने 'शाह्नामा'
हे महाकाव्य लिहिले. या महाकाव्यात या खेळाविषयी विस्तृत माहिती मिळते.
याच महाकाव्यात एक दुसरी कथा बुद्धिबळ शोधाची दिलेली आहे.
एक राणी अत्यंत चिंतीत होती. तिची दोन सावत्र मुले, 'तल्हन्द' आणि 'गव्ह' यांच्यातील
 वैमनस्य हे तिच्या चिंतेचे कारण होते. दोघे सावत्र भाऊ असल्यामुळे सत्तेचा
खरा अधिकारी कोण यावरून त्याच्यात वैमनस्य निर्माण झालेले. एका युद्ध प्रसंगी राणीला
माहिती मिळते कि, तल्हन्द हा युद्धात मारला गेला. तिला गव्ह वर शंका येते.
शेवटी तिचा गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने तिच्या दरबारातील गुरु बुद्धिबळ पाटाची
निर्मिती करतात व त्यावरून राणीला दाखवतात कि युद्ध भूमीवर तल्हन्द हा कसा
युद्धाच्या थकव्यामुळे मेला न कि त्याच्या भावाच्या हाताने. हे स्पष्ट करीत असताना
 'shah mat ' (शाह मात ) या पर्सिअन शब्दाचा उपयोग केलेला आहे. या शब्दाचा अर्थ
' the king is dumbfounded or exhausted ' असा होतो. परंतु 'मात' या शब्दाचा अर्थ आपण
'राजाचा मृत्यू' ( The king is died ) असा घेतो. याच कथेतील या शब्दप्रयोगावरून
आपण 'शह आणि  मात' असा शब्दप्रयोग करू लागलो. पुढे हाच शब्द इंग्रजीत 'check mate'
म्हणून प्रचलित झाला. या पर्शिअन काळातील बुद्धिबळ सोंगट्या आज अस्तित्वात नाहीत
परंतु भारतीय आणि पर्शिअन लोकांची खेळतानाची चित्रे अशा अनेक पुस्तकांत तसेच महाकाव्यात
दिलेले आहेत. त्यावरून या खेळाचे कल्पना येते. दत्तात्रय पटवर्धन 

No comments: