Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Friday, April 24, 2015

0 असे हे इंग्रजी शब्द , भाग ८



सध्या 'आप' पार्टी मध्ये घमासान चालू आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. प्रशांत भूषण , योगेंद्र यादव यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकेचा  भडीमार सुरु केला आहे. त्यामुळे आप पार्टीने प्रशांत भूषण  आणि योगेंद्र यादव यांना पार्टीतून निश्काशित केले. या वेळी प्रशांत भूषण म्हणाले, " AAP  actions remind of Stalinist purges."

आता "stalinist purge" म्हणजे काय? ते आपण पाहू. Purge म्हणजे to clear the unwanted, to remove or eliminate unwanted, म्हणजेच "आपल्याला नको असलेले बाजूला सारणे."
स्टालिन हा रशियातील एक हुकुमशाह. त्याला वाटत होते आपले एक छत्री राज्य रशियात असावे. म्हणून त्याने आपल्या विरोधकांचा बिमोड करण्यासाठी त्यांच्या वर  छल  तंत्राचा वापर सुरु केला. त्यांना लेबर क्यम्प मध्ये पाठवण्यात येत असे. त्याने २० मिलिअन लोकांना लेबर क्यम्प मध्ये पाठवले तेथील जुलूम असह्य झाल्यामुळे अर्धे मृत्युमुखी पडले. मिडिया वर कठोर निर्बंध लादण्यात आले. अशा अन्याया विरुद्धही कुणी कठोर पणे उभा राहिला तर त्याला सैबेरियात धाडण्यात येत असे. म्हणून प्रशांत भूषण व इतरांना जेव्हा आप पार्टीतून काढून टाकण्यात आले तेव्हा त्यांनी याची तुलना " stalinist purge " शी केली. ज्या प्रमाणे स्टालिन ने त्याला नको असलेल्यांना बळजबरीने दूर केले तसेच  केजरीवाल त्यांना नको असलेल्यांना दूर करीत आहेत.

मिड-डे च्या २३ एप्रिल, २०१५ च्या अंकात गौरव डुबे म्हणतात, "As Bollywood struggles to hit the bull's eye at the Box Office this year, American action thriller 'Furious 7' has grossed over Rs.100 crore in India." म्हणजेच, बॉलीवूड या वर्षी चांगला गल्ला मिळवण्यास झटत होते तेव्हा अमेरिकन थरार चित्रपट 'Furious 7' ने भारतात शंभर कोटीच्या वर विक्रमी कमाई  केली.

येथे Box Office म्हणजे 'an area in a theater where tickets are sold for movies, play etc. Income from ticket sales (as from a film) -- सिनेमागृहातील अशी जागा जिथे तिकीटाची विक्री होते किंवा अशा तिकीट विक्रीतून झालेली विक्रमी कमाई.

एखाद्या चित्रपटाबद्दल 'Box Office hit' असा शब्दप्रयोग सुद्धा केला जातो. याचे अर्थ त्या चित्रपटाने विक्रमी  कमाई केली.

त्याकाळी म्हणजेच अगदी शेक्सपिअर च्या काळात नाट्यगृहात प्रवेश करताना दरवाजावर तिकिटाचे पैसे एका पेटीत ( Box ) मध्ये टाकले जात असत. ती पेटी लहान असल्यामुळे लवकरच भरत असे. मग ती पेटी मागच्या ऑफिस मध्ये जाऊन रिकामी केली जात असे. पेटी लहान करण्याचे कारण म्हणजे जास्त पैसा पाहून चोरी करण्याचा मोह चोरांना किंवा दरोडेखोरांना होऊ नये. म्हणूनच मागच्या ऑफिस साठी 'Box office ' हा शब्द रुळला. व पुढे  तिकीट आली व तिकीट विक्री एका विशिष्ट ठिकाणी होऊ लागली व त्या ऑफिसला 'Box office' म्हणू लागले.


दत्तात्रय पटवर्धन

No comments: