Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Sunday, April 19, 2015

0 बुद्धिबळाचा इतिहास भाग 5.


आपण चतुरंग या खेळातील सोंगट्या बाबत पहिले. या सोंगट्या व त्याच्या चाली बद्द्ल आपण पाहू. संस्कृत
काळात या गोट्यांच्या चाली आणि त्यांचे बळ यात फारच अंतर आहे. त्यावेळेसच्या गोट्याचे बळ खूपच कमी होते. सोंगट्या जास्तीती जास्त एक किव्वा दोन घर चालत असत, तोही  एक हत्ती सोडला तर. आज हत्ती , वजीर (राणी), उंट यांचा लांब पल्ल्याचा मारा खेळाला गती देऊन जातो. अगदी दूर बसूनही या सोंगट्या शत्रू पक्षाच्या मोहरांवर नजर ठेऊन असतात, अगदी आजच्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राप्रमाणे.

चतुरंग काळात राजा कोणत्याही दिशेला एक घर चालू शकत होता. आजच्या प्रमाणेच त्याकाळीही राजा अत्यंत महत्वाचे मोहरे होते. राजा मारला गेला कि खेळ संपायचा. आजच्या आधुनिक खेळात राजा मारला जात नाही. संकृत काळात राजा वर जर बळ असेल तर याची घोषणा करण्याची गरज नसे. त्यामुळे जर राजाला चेक / शह बसला असेल व ते खेळाडूच्या लक्षात आले नाही तर राजा मारला जायचा. आणि डाव अनपेक्षितपणे संपायचा. एखाद वेळी राजा हा अशा घरात सरकवला जायचा जेथे शत्रू पक्षाचे बळ आहे आणि मग राजा मारला जायचा.
त्यावेळी 'इललीगल चाल' ( illegal move ) ची संकल्पना नव्हती.

पटावरील दुसरी महत्वाची सोंगटी म्हणजे 'मंत्री' . मंत्री म्हणजे राजाचा सल्लागार (next to king ). "मंत्री" या संस्कृत शब्दापासूनच इंग्रजीत 'mentor' , 'monitor' सारखे शब्द आले. 'मंत्री' हि सोंगटी आजच्या 'राणी' ची पूर्वज. या सोंगटी ची चाल म्हणजे एक घर कर्ण रेषेत. समोर, मागे किव्वा बाजूला हा मंत्री चालू शकत नसे. राजाचा सहकारी म्हणून याला राजापेक्षा अर्धे बळ अशी संकल्पना होती.

तिसरे महत्वाचे मोहरे म्हणजे 'गज' (elephant), हे मोहरे आजच्या 'बिशप' चे पूर्वज. हे मोहरे एक घर कर्ण रेषेत किव्वा एक घर पुढे चालू शकत होते. अशा रीतीने 'गज' पाच घरात चालू शकत होता. या मागील संकल्पना अशी कि गजाचे चार पाय कर्ण रेषेत येणाऱ्या चार घरांवर आपले बळ दाखवत असे तर सोंड हि समोरील घरावर बळ प्रस्थापित  करत असे.

'अश्व' हे मोहरे म्हणजे आजचा' 'घोडा'. या घोड्याच्या चालीत आज पर्यंत काहीही बदल झालेला नाही. त्या काळीही घोडा आजच्या प्रमाणेच अडीच घर चालतो.

प्यादे हे एक मोहरे ज्याला एक घर पुढे जाण्याचा अधिकार होता, तसेच शत्रूपक्षाचे मोहरे मारतान पुढील कर्ण रेषेतील घरात मारता येत असे. हे प्यादे पट  पार करून पलीकडे जात असे तेव्हा त्याचे 'मंत्री' या सोंगट मध्ये रूपांतरण होत असे.
'रथ' (chariot ) किव्वा रोका (boat , ship ) हे मोहरे आजच्या हत्तीच्या मोहऱ्याची प्रतिकृती होती. पटावरील हे एकच मोहरे असे होते ज्याला लांब पल्ल्याचामारा करण्याचे बळ होते. 'रोका' ( शिप ) या नावामुळे इतिहास तज्ञांचे म्हणणे असे होते कि भारतीय युद्ध पद्धतीत नौका हि नव्हती त्यामुळे हा खेळ भारताचा नाही. या विवाद बद्दल आपण पुढे पाहूच. तूर्त तरी एवडेच.

No comments: