मागील आठवड्यात मला फीड बॅक द्वारा एक विचारणा करण्यात आली होती कि इंग्रजीत '
once in a blue moon' हा शब्द प्रयोग केला जातो. निळ्या चंद्राचा उपयोग
कसा झाला. खरच आहे. चंद्र कधी निळा असू शकतो का? होय हे शक्य आहे. जेव्हा
पृथ्वीच्या वातावरणात विशिष्ट प्रकारचे बदल झाले तर हे शक्य आहे. परंतु
हेही खचितच घडत. १८८३ मध्ये इंडोनेशियातील Mount Krakatoa येथे वोल्कॅनो
स्पोट झाला आणि प्रचंड प्रमाणात धूळ आकाशात पसरली आणि आकाशाच्या वरील
पातळीवर जमा झाली त्यावेळी चंद्र निळसर दिसला होता. याला प्रकाशाच्या
परवार्तानाचे नियम कारणीभूत आहेत. अशा घटना १९८३, १९८० तसेच १९९१ मध्येही
घडल्या. परंतु ' once in a blue moon ' मधील ब्लू मून ला वेगळच कारण आहे.
आपणास ठाऊक आहे पौर्णिमेचा चंद्र हा महिन्यातून एकदाच दिसतो. परंतु कधी
कधी एखाद्या महिन्यात असा चंद्र दुसऱ्यांदा दिसतो. इंग्रज शेतकऱ्यांच्या
कैलेंडर मध्ये हा पूर्ण चंद्राचा दिवस लाल रंगाने दर्शविला जात होता. परंतु
ज्या महिन्यात तो दुसऱ्यांदा दिसत असे तो दिवस निळ्या रंगाने दर्शविला जात
असे. आता हि घटना हि खचितच घडत असे. म्हणून जेव्हा एखादी घटना खचितच घडते
त्याला "once in a blue moon" असे म्हणतात.
Once in a blue moon : something that happens rarely.
आताच काही दिवसापूर्वी भारत आणि इंग्लंड मधील कसोटी शृंखला संपन्न झाली. भारताला यात लाजिरवाणी हार पत्करावी लागली. त्यावेळेस कोच फ्लेचर व कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्यावर कडाडून टीका झाली. त्यावेळी विश्वनाथ, भारताचा माजी खेळाडू, म्हणाला'
" I am not happy with his keeping and captaincy, he has got his own mind. He always keeps repeating that. He always expects a miracle. Miracles cannot happen all the time,it happens once in a blue moon."
म्हणजेच चमत्कार हे क्वचितच घडतात.
Mid day meal चा उपक्रम सरकारकडून राबवला जातो. अनेक शाळांमध्ये मुलांना मधल्या सुटीत या उपक्रमांतर्गत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. क्वचितच या सुविधा दिल्या जातात परंतु अनुदान तर घेतले जातेच. अशाच एका पाहणीच वृत्त देताना ' The Shilong Times' या वृत्तपत्राने आपल्या १२ जून २०१२ च्या अंकात "School students deprived of midday meal scheme" या मथळ्या खाली एक लेख लिहिला होता. त्यातील एक वाक्य असे होते,
"Children who were spoken to, informed that they are not getting any foods items under the scheme, while adding " Only once in a blue moon cooked pulses are distributed in the school."
ज्या विद्य्रार्थ्यांना विचारले त्यांनी अशी माहिती पुरवली कि, " या उपक्रमांतर्गत आम्हाला कोणत्याही प्रकारचे अन्न दिले जात नाही क्वचितच कधीतरी शिजवलेली डाळ वाटली जाते."
एखादा मित्र खूप दिवसांनी भेटला तर म्हणतो "दूज का चांद" असाच हा once in a blue moon म्हणजे दूज का चांद.
दत्तात्रय पटवर्धन
भाग 1
भाग 2
भाग 3
भाग 4
भाग 5

No comments: