Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Tuesday, June 2, 2015

0 शायरीचा गुलदस्ता भाग 12



मैत्री म्हटली कि ती मैत्री निभावण्याच्या आणाभाका , त्या शपथा, आठवतात. अनेक वेळा काहीना काही कारणावरून दिलेला शब्द  निभावता येत नाही  आणि मैत्री तुटते. या आणाभाका ज्याला उर्दूत 'वफा' म्हणतात आणि त्याविरुद्ध म्हणजे 'जफा'.
वफा आणि जफा या दोन शब्दांचा उपयोग  उर्दू शायरीत अनेक वेळा केलेला आढळतो. प्रेमावर जितकी शायरी आहे तितकीच शायरी वफा आणि  जफा वर आहे.

आता हाच शेर पहा,

जफ़ा के जिक्र पे तुम क्यो  संभल के बैठ गए,
तुम्हारी बात नहीं, बात है ज़माने की .                                          मजरूह सुल्तानपुरी

असे म्हणतात की truth should be sugar coated,  कारण सत्य गिळण्यास कठीण असतं. येथे शायर एक sugar coated pill आपल्याशी जफा (शपथेचा भंग करणाऱ्याला ) करणाऱ्याला देत आहे. तो म्हणतो की जेव्हा जफा ची ( जुलुमाची, शपथ तोडल्याची ) चर्चा सुरु झाली त्यावेळेस तू स्वतःला सावरून बसलीस. कारण तुला भीती होती की कुठे यात तुझंही नाव तर येणार नाहीना? तुलाही माहित आहे  की घेतलेल्या शपथेचा भंग कोणी केला. तुझी ती दयनीय स्थिती बघवली नाही व मी तुला इशारा केला की आंम्ही तुझी  गोष्ट करीत नाहीत,  be comfortable, be relaxed, आम्ही तर जगाची गोष्ट  करीत आहोत की हे जग किती जुलमी आहे. किती सौम्य रीतीने शायर तिच्या तोडलेल्या शपथेची कल्पना तिला करून देत आहे.

रंज तो ये है की वो अहले-वफ़ा टूट गया,
बेवफा कोइ भी हो, तुम न सही, हम ही सही.                              डॉ राही मासूम रझा

मैत्रीत केलेल्या आणाभाका अनेक वेळा तुटतात, त्याला नक्कीच कोणी न कोणी जवाबदार असतो. शायर म्हणतो की आपली मैत्री तुटली याच मला दु:ख आहे. आपण मैत्री निभाऊ शकलो नाही हीच जीवनाची tragedy  आहे. मग हि मैत्री कोणामुळे तुटली हा भाग दुय्यम आहे. तुझ्यामुळे नाही तर मान्य आहे की माझ्यामुळेच हे झाले. या वर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. आपली मैत्री तुटली हीच एक गोष्ट सत्य आही आणि त्याचच मला दु:ख आहे.

मेहबूब से भी हमने निभाई बराबरी,
वां लुत्फ़ कम  हुवा, तो यहाँ प्यार कम हुवा.                             मोमिन खां मोमिन

लुत्फ़ : आनंद, मजा , मिठास

शायर म्हणतो की मेहबूब बरोबर आम्ही बरोबरी निभावली. तिकडे लुत्फ़ कमी झाला म्हणजेच तिच्यातल सौंदर्य कमी झालं , तिच्या बरोबर बसण्यात आणि गप्पा मारण्यातला आनंद कमी झाला, तिच्यातली मिठास कमी झाली म्हणून आमच् प्रेमही कमी झालं. असा अर्थ आपण लुत्फ़ चा डिक्शनरी अर्थ घेतल्यास काढू. इथेही शायर एक sugar coated pill देत आहे. येथे लुत्फ अर्थ आहे वफाई कडे. तो म्हणतो की तिकडे वफा कमी झाली आणि त्याच प्रमाणात इकडे प्रेमही कमी झाले. अशा रीतीने आम्ही बरोबरी निभावून नेली. अप्रत्यक्षरित्या शायर दोष आपल्या कडे ठेवून तिला तिच्या बेवफाईची  जाणीव करून देत आहे.


दत्तात्रय पटवर्धन

No comments: