भाग ११ मध्ये आपण पाहिले कि चिराग हा शब्द कसा वेगवेगळ्या संकेताने वापरला जातो.आज एका घटनेमुळे एका उर्दू शेर ची आठवण झाली. घटना अशी कि दिल्लीचे कायदा मंत्री जितेंद्र तोमर यांना पोलिसांनी फर्जी डिग्री असल्याबाबत अटक केली.कायदे मंत्री याची वकिलीची डिग्री खोटी हा केव्हडा मोठा अपराध. परंतु या अटकेचे समर्थन करण्या ऐवजी अरविंद केसरीवाल यांनी या अटकेची निंदा करण्यास सुरवात केली. केद्र सरकार वर आरोप ठेवण्यात आलेत. आप पार्टीला बदनाम करण्यासाठी भाजप ची हि कुटनीती आहे. अरविंद केसरीवाल यांनी आप पार्टीची स्थापना केली होती ती भ्रष्टाचार निर्मुलन करण्यासाठी. आणि त्याच्या कायदे मंत्रीच खोट्या डिग्री बाबत जेल मध्ये गेला आणि आप पार्टीच्या या विचारधारेला काळिमा फासला. जितेंद्र तोमर आणि समर्थन करणारे सर्वच आप पार्टीचे वंशाचे दिवे.
शायर म्हणतो,
दिल के फफोले जल उठे सीने के दाग़ से
इस घरको आग लग गई, घरके चराग से. अज्ञात
आधीच हृदयात असलेले फ़फ़ोले त्याची आग असह्य. त्यात असा डाग, मग त्या आगीची तीव्रता अधिक भडकणार नाही तर काय? वंशाच्या दिव्यानेच घराला आग लावली काय करणार?
येथे चिराग या शब्दाचा अर्थ "वंशाचा दिवा" असा होतो.
चिराग या शब्दाचा उपयोग केलेला असाच एक शेर मला आठवतो,
शब-ए-इंतजार की कश्मकश में न पूछ कैसे सहर हुई,
कभी इक चराग जला दिया, कभी इक चराग बुझा दिया. मजरूह
येथे चिराग या शब्दाचा सांकेतिक अर्थ स्वप्नांचा चिराग, आशेचा चिराग, असा आहे.
शब-ए-इंतजार च्या कश्मकश ( उलझन) मध्ये सकाळ कशी झाली म्हणून काय सांगू! कधी एक दिवा प्रज्वलित केला तर कधी एक दिवा विझवला. म्हणजेच एक स्वप्न पाहिलं ते बाजूला सारलं मग दुसरं स्वप्न पाहिलं तेही बाजूला केलं. मग तिसर, चौथ अशी स्वप्नांची श्रुखलाच निर्माण झाली आणि सकाळ केव्हा झाली आम्हाला कळलंच नाही.
ज्यावेळेला आयुष्यात काही काळासाठी अंधकार निर्माण होतो त्यावेळेस स्वप्न फार महत्वाची ठरतात. It acts as buffer between you and the situation.
दत्तात्रय पटवर्धन
No comments: