अबरार अल्वी यांच्या कथनातून गुरु दत्तच्या जीवनातील सर्जनशील क्षणांचा आणि
दु:खद घटनांचा घेतलेला सूक्ष्म वेध म्हणजेच 'त्या दहा वर्षातील गुरु दत्त
'. १९५३ मध्ये गुरुदत्त नावाचा नवा तारा चित्रपट क्षेत्रात उदयास आला होता. हिंदी चित्रपट सृष्टीतील आख्यायिका बनलेला एक प्रभावी दिग्दर्शक असा ज्याचा उल्लेख केला जातो, तो गुरुदत्त.
अबरार-गुरुदत्त यांच्या १९५४-१९६४ या दशकातील सहप्रवासातून साकार झालेल्या
चित्रपट निर्मिती प्रक्रियेचा सूक्ष्म वेध घेणारं पुस्तक म्हणजे "त्या दहा
वर्षातील गुरु दत्त". भारतीय चित्रपटसृष्टीत गुरु दत्त यांचे स्थान एक
प्रतिभावंत दिग्दर्शक म्हणून झळकले. प्यासा, साहिब, बीबी और गुलाम, कागज
के फुल, असे चित्रपट अजूनही स्मरणात आहेत. अबरार अल्वी हे गुरु दत्त चे
घनिष्ट मित्र. एका सेट वर राज खोसला आणि अबरार अल्वी यांचा सवांद चालू
होता. तो सवांद ऐकून गुरु दत्त यांच्या लक्षात आले कि अबरार यांच्यात एक
प्रतिभावंत कलाकार दडलेला आहे. त्या क्षणाने गुरु दत्त आणि अबरार अल्वी
यांना जवळ आणलं आणि गुरु दत्त यांना एक जीवश्च-कंठश्च मित्र मिळाला.
त्यानंतर एक प्रवास सुरु झाला आणि मग वहिदा रहेमान असो किंवा मधुबालाची
विनोदी भूमिका असो या निर्णयात अबरार अल्वी यांचा विचार असायचाच.
सत्या सरन हे एक सुप्रसिद्ध पत्रकार यांनी अबरार अल्वी यांना बोलत केलं आणि गुरुदत्त यांच्या जीवनाचा वेध घेतला. आणि आपल्या ओघवत्या भाषेत अलवार पणे गुरु दत्त यांच्या संबंधातील कथा आणि दंतकथा या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर आणल्या. हा आठवणींचा खजाना म्हणजेच गुरु दत्त यांचा जीवनपट एखाद्या चित्रपटासारखा आपल्या समक्ष ठेवला. हा कलाकार कसा निर्माण झाला? त्याच्या सृजनशीलते मागील गूढ काय? त्याच्या व्यक्तिगत आयुष्याचे त्याच्या चित्रपटातून किती पडसाद उमटतात? अशा अनेक प्रश्नांचा उहापोह केलेला आहे.
वहिदा रहमान म्हणजे गुरुदत्तचा शोध अस म्हटलं जातं. हैद्राबाद येथे गुरु दत्त आणि वहिदा रेहमान यांची झालेली भेट व त्यातून तिला हिंदी चित्रपट सृष्टीत आणण्याचा विचार आणि प्रयत्न, यातूनच दोघांमध्ये झालेली भावनिक-मानसिक गुंतणूक व त्याचे त्यांच्या जीवनावर झालेला परिणाम याचेही निवेदन वाचायला मिळते.
'गुरु दत्त फिल्म्स' च्या द्वारे निर्मित चित्रपट यांची निर्मिती झाली कशी? तो तयार होताना, त्याचे कलाकार निवडताना, त्याची प्रकाशयोजना करताना, दिग्दर्शन करताना, संगीत देताना काय काय आणि कसं कसं घडतं याचं सविस्तर वर्णन या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतं. प्यासा मधील गुलाबो हि व्यक्तिरेखा अबरार यांना कशी सापडली व याच कथानक कसं तयार झालं याचं विवेचन वाचण्यासारखं आहे.
सिनेमा आणि त्याच विवेचन म्हटलं कि ती बाब एका व्यक्तीशी निगडीत राहत नाही तर त्याच्याशी संबंधित इतरांचा हि उहापोह कळत नकळत पणे करावाच लागतो. मग जॉनी वॉकर, मेहमूद, एस. डी. बर्मन यांच्या सारखे प्रतिभावंत यांचीही व्यक्तिचित्र रेखाटण्याची जवाबदारी लेखकावर येते. सत्या सरन यांनी हि जवाबदारी अगदी मुरलेल्या लेखकाप्रमाणे स्वीकारून हि व्यक्तिचित्र जिवंत उतरवली आहेत.
सत्या सरन यांच्या या पुस्तकाचे भाषांतर मिलिंद चंपानेरकर यांनी केलेलं आहे. पुस्तक वाचताना एक निरामय आनंद मिळतो हे नक्कीच.
पुस्तक वाचून झाल्यावर प्रत्येकाला एक उर्दू शेर आठवतो,
"बड़ी गौर से सुन रहा था जमाना,
तुम्ही सो गए दासता कहते कहते |"
त्या दहा वर्षातील गुरु दत्त
लेखक : सत्या सरन
सानुवाद : मिलिंद चंपानेरकर
रोहन प्रकाशन
पृष्ठे : २५९
किंमत : रु २५०/-
दत्तात्रय पटवर्धन

सलाम मलाला.
मलाला
बाप्याचे तत्वज्ञान
बाप्याचे तत्वज्ञान
सलाम मलाला.
सलाम मलाला.
सलाम मलाला.
No comments: