काल बाप्या भेटला होता. आपल्या नेहमीच्याच फॉर्ममध्ये. प्रश्न
विचारण्याच्या तयारीत. म्हणाला एक प्रश्न विचारतो. मी त्याला म्हटले' अरे
बाप्या तुझी प्रश्न विचारण्याची सवय गेली नाही का?'
त्यावर बाप्या म्हणतो, 'आम्ही ज्ञानाचे भुकेले, Why? What? When? How? हे आमचे मित्र. आमच्याकडे ज्ञान खेचून आणतात. मी त्याला खूप टाळण्याचा प्रयत्न केला. पण तो जाईल तर बाप्या कसचा? त्याचे प्रश्न म्हणजे विश्वनाथन आनंद ने आपल्या विरोधकाला बुचकळ्यात टाकणारी चाल. पण माझाही नाईलाज. मी त्याला म्हटले विचार बाबा प्रश्न.
बाप्या : GOD म्हणजे काय?
माझे तर डोकेच गगरायला लागले. मी म्हणालो, " बाप्या, अरे मोठे मोठे लोक याची व्याख्या करू शकले नाहीत.मी काय सांगू? अरे तू असे प्रश्न विचार जे शब्दात सांगता येतात.'
त्यावर बाप्या म्हणाला ' असे काय आहे जे शब्दात सांगता येत नाही. प्रत्येक गोष्ट हि शब्दात व्यक्त करता येते.'
मी म्हणालो, ' अरे बाप्या असे नाही, एकदा एक विद्यार्थी देवाकडे गेला. देवाने विचारले, 'काय रे बाबा काय हवंय?'
त्यावर विद्यार्थी म्हणाला, 'मला एक प्रश्न विचारायचा आहे?'
देव म्हणाला. ' विचार प्रश्न, पण असा प्रश्न विचार जो शब्दात सांगता येईल.'
त्यावर विद्यार्थी म्हणाला, 'असे काहीही नाही जे शब्दात सांगता येत नाही. व लगेचच आपला प्रश्न विचारला, 'देवा, मृत्यू म्हणजे काय?'
लगेचच देवाने तलवार काढली आणि त्याची मान उडवली.
बाप्या मृत्यू शब्दात व्यक्त करता येत नाही रे.
बाप्या म्हणतो,' अरे, मला शब्दात अडकवू नको. सांग GOD म्हणजे काय?
मी त्याला परत टाळण्याचा प्रयत्न केला. नंतर तो म्हणाला जाऊ दे मीच सांगतो GOD म्हणजे काय?
पुन्हा धडकी भरली. कारण याचे उत्तर म्हणजे काय सांगू. अरे, कॉलेज ला असताना zoology ची practical ची परीक्षा होती. त्याला pila dissection साठी आला होता. Dissection करत असताना तो शंख जास्तच दाबला गेला व फुटला. Dissection बाजूलाच राहिले. परीक्षक जवळ आले. सर्व प्रकार समजून गेले म्हणून सरळ प्रश्नच विचारायला सुरवात केली. एकही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. शेवटी परीक्षकांनी विचारले "तुम्ही किती वेळा या प्रयोगशाळेत आलात?
उत्तर : तीन वेळा
परीक्षक : केव्हा केव्हा?
बाप्या म्हणतो : मार्च, एप्रिल आणि आता पुन्हा मार्च.
अशी बाप्याची उत्तर.
असाच एकदा interview साठी गेला. प्रश्न होता : एखादा छंद
बाप्या म्हणतो ''हो वाचनाचा '
प्रश्न : काय वाचायला आवडते.
बाप्या म्हणतो :शेक्सपिअर वाचतो.
प्रश्न : त्याच्या पत्नीचे नाव काय?
बाप्या : सर, मी जेवडा शेक्स्पिअर वाचला त्यात त्याच्या पत्नीचे नावच कुठे आले नाही.
असा बाप्या आणि त्याचे प्रश्न आणि उत्तरं.
शेवटी नाईलाज म्हणून मी त्याला म्हणालो सांग बाबा उत्तर सांग.
तर बाप्या म्हणतो, 'अरे GOD म्हणजे Go On Duty.
मी म्हणालो, 'अरे बाप्या, तू तर कर्मयोगच तीन शब्दात सांगितलास.
तर लगेच म्हणतो, अगदी एखाद्या नाटकाच्या नायकाने फेकावी या थाटात.
परंतु खरच आहे देव काय आहे. आपल कर्तव्य करत रहा यातच देव आहे. कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपली कामे करीत रहा.
येथे मला रवींद्रनाथ टागोरांची कविता आठवते, ते लिहितात, एकदा सुर्य म्हणतो मी इतकी वर्ष बिना थकता काम करत आहे. आता मला विश्रामाची आवश्यकता आहे. माझे काम कोण स्वीकारेल. सर्वजण स्तब्ध होऊन सूर्याकडे बघू लागले. तेवढ्यात एक दिवा आला आणि म्हणाला, मी करेन जितके मला शक्य आहे तितके, to the extent I can!

दत्तात्रय पटवर्धन
You may like to see a video
Duty म्हणजेच कर्तव्ये. ह्या कर्तव्याचे पालन निरपेक्ष बुध्दीने करणे म्हणजेच भक्ती.
ReplyDelete