Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Thursday, September 18, 2014

0 असे हे इंग्रजी शब्द : भाग 5


मागील लेखातील रुल ऑफ थंब 'rule of thumb' पिण्याच्या बाबतीतही होता असे मी सांगितले तर थोडे आश्चर्य वाटेल. पिण्याच्या बाबतीतला रूल ऑफ थंब म्हणजे पहिला पेला रिचवला कि मग दुसरा प्याला घ्यायचाच नाही किंवा भरलेला पेला समोर असेल तर फक्त तीन बोटांच्या रुंदी इतकी ग्लासातील दारू प्यायची ज्यामुळे चटक लागणार नाही आणि तळीरामही होणार नाही. आयुष्य मग 'एकच प्याला' म्हणत म्हणत सरणार नाही. समाजातील अनेक तळीराम व त्यांची झालेली दुर्गती पाहून ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ ह्या म्हणीप्रमाणे काही शहाण्यांनी आपल्या चळवळीतून इंग्रजी भाषेला एक शब्दाचे दान दिले. तो शब्द म्हणजे ‘Teetotaler’. आज आपण ह्या शब्दाच्या निर्मितीशी निगडीत कथेचा विचार करणार आहोत.

     एकोणिसाव्या शतकात 'अमेरिकन टेम्पेरन्स यूनियन' ने प्रेस्तोन, इंग्लंड येथे प्रथम हि  चळवळ सुरु केली. या चळवळीत दारू वा तत्सम मादक द्रव्यापासून दूर राहणाऱ्यांची संघटना उभी केली व त्या विरोधी प्रचार सुरु केला. या चळवळीत सामील झालेल्यांना एक प्रतिज्ञा पत्र लिहून द्यावे लागत असे. अश्या चळवळीतील कार्यकर्त्यांना कुठेही सही करताना सहीच्या आधी "T"  लिहिण्याची प्रथा होती. या  "T" चा अर्थ होता "Total Abstinance". पुढे T + total म्हणजे ज्यांनी शपथ पत्रावर सह्या केल्या आहेत ते T-totaller किंवा  teetotallers असे झाले. तेव्हा पासून हा शब्द दारू न पिणा-यांसाठी वापरात येऊ लागला.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शाकाहारी व  दारूला न शिवणारे व्यक्ती आहेत हे इंग्रजीत कसे व्यक्त केले आहे -  Prime Minister Narendra Modi is a vegitarian teetotaller.

     पिण्याच्या बाबतीतील रूल ऑफ थब म्हणजेच ‘’Social drinking” चा अर्थ पिणे दुय्यम असावे, त्याची सवय लागू नये,  पिणा-याचा तळीराम होऊ नये, हा सुविचार होता. याच अर्थाचा एक दुसरा वाक्प्रचार म्हणजे - To be able to hold one's liquor. म्हणजेच मर्यादेत राहून दारू पिणे.

कालांतराने समाजात आधुनिक विचारसरणी वाढीस लागली व दारू वा तत्सम मादक पेयपानासाठी वेगवेगळी करणे शोधली जाऊ लागली. ‘चेंज/बदल म्हणून’, ‘समारंभ म्हणून’, ‘आनंद साजरा करण्यासाठी’, ‘सामाजिक सद्भावना’, इ.  काही माणसे प्रसंग पाहून पिण्याचा आनंद घेतात. एखाद्या समारंभाच्या वेळी, सणाच्या दिवशी किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या  प्रसंगाने ते दारूचे सेवन करतात. यालाच आपण "social drinking" असे म्हणतो.

काही महाभाग तर पिण्याच्या बाबतीत हद्द पार करतात. वेळ मिळेल त्यावेळेस ओठाला ग्लास लावतात. त्यांना फक्त बहाणा हवा असतो. अशा पिण्यास " alcoholic" असे म्हटले जाते.
  गम्मत म्हणजे ह्या देशात दारूबंदीचा आग्रह महात्मा गांधीनी जरी धरला तरी त्या तत्वापेक्षाही महत्वाचे ठरले ते पिणारे अन मद्याच्या विक्रीपासून अबकारी कर मिळविणारे सरकार! गावागावातून स्त्रियांनी दारूची दुकाने बंद करण्यासाठी केलेली आंदोलने काय, अर्ज-विनंत्या काय, त्यासाठी केलेले मतदान काय, सारे क्षणिक ठरले; दारू पासून परावृत्त करू शकले नाही. What cannot be cured........ दुसरे काय!




दत्तात्रय पटवर्धन    


Send Feedback

No comments: