Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Wednesday, September 10, 2014

0 उत्सव मनवा आयुष्याचा !

टिळक महाराज कळतंय मला
भांडुन काही उपयोग नाही
वेडे, मुर्ख, वा गाढव म्हणुन
गीता कोणा कळणार नाही II
मारुन-मुटकून कळले तरी
एकदम कधी वळणार नाही
मूर्ती-निर्माल्य विसर्जनाची
सहज संवय तुटणार नाही II
निराश नका होऊ देवा
विचार येथे सारे करती
पुढे कोणी येईल म्हणुनी
सगळेच मागे-मागे राहती II
जल-प्रदुषण दूर कराया
गोदाकाठी नासिक ग्रामी
भक्त दान स्वानंदे करीती
टनभार निर्माल्य अन लाखों मूर्ती II
उत्सव बाप्पाचा हो करीता
वाजत-गाजत दहा दिसाचा
तसाच देवा करा साजरा
उत्सव अपुल्या आयुष्याचा II
          - प्रकाश पटवर्धन.

No comments: