Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Tuesday, September 9, 2014

0 असे हे इंग्रजी शब्द : भाग 3

न्यायाधीश फ्रान्सीस बुल्लर स्टिक्स विकताना दाखवला आहे. 
प्रत्येक वयात शब्दांचा किंवा एखाद्या गोष्टीचा अर्थ आणि संदर्भ बदलत असतो. बालपणी 'दिल' म्हणजे फक्त एक धडधडणारे दृदय, तरुणपणात हा संदर्भ बदलतो आणि म्हातारपणी 'दिल' धडधडू  लागले कि सारे अस्वस्थ होतात.साप्रकार लहानपणी कोणाला ठेंगा दाखविण्यासाठी अंगठ्याचा केला जातो, तर मोठेपणी त्याचा thumps up ! होतो. आता हा अंगठा दिसला कि फेसबुक वरून फेरफटका मारतोय कि काय असाच भास होतो.

इंग्रजी भाषा-विश्वात आपली भेट "Rule  of thumb" शी होते.  ऐकताना गंमत वाटेल कि पूर्वीच्या काळी बायकोला मारण्यासाठी इंग्लंडमध्ये अंगठ्याइतक्या जाडीची काठी वापराची मुभा होती. असे म्हणतात कि सतराव्या शतकात इंग्लिश न्यायाधीश सर फ्रान्सिस बुल्लर  यांनी असा नियम बनवला होता कि पतीने पत्नीला काठीने मारण्यात  काही गैर नाही, जर ती काठी अंगठ्याच्या जाडीची असेल. मग सगळीकडे याच्या विरोधात आक्रोश निर्माण झाला. अनेक मासिकातून, वृत्तपत्रातून कार्टून्स येऊ लागली. परंतु  अशा प्रकारच्या नियमाला कोठेही पुरावा नाही आणि जरी असा नियम नसला तरी त्या काळी स्त्री ला अशी वागणूक दिली जात होती यात काही वाद नाही. काही जण यालाच rule of thumb ची जन्म कहाणी मानतात. परंतु याचा संबंध नाही असे अनेकांचे म्हणणे आहे.
  
आता अगठ्याचा उपयोग मापनासाठी कसा होत गेला हे पाहणे उद्बोधक ठरेल. बरं अंगठा इंग्लंड मध्येच वापरला जात असे असेही नाही तर सर्व इंडो-युरोपिअन देशात त्याचे चलन होते. डच लोक duim, फ्रेंच pouce, इटालियन pollice, स्पानिश pulgada, तर संकृतात अन्गुलम म्हणत.

एक कथा अशीही आहे कि पूर्वीच्या काळी शेतकरी पेरणी विशिष्ट अंतरावर करण्यासाठी वा विशिष्ट खोली मापण्यासाठी अंगठ्याचा उपयोग करीत असतं. बिअरच्या किण्वन क्रियेसाठी लागणारे योग्य तापमान त्या द्रवात अंगठा घालून तपासात असतं. सुतार आपल्या कामात मोजमाप करण्यासाठी अंगठ्याचा उपयोग करायचा. आजही चित्र काढताना आपण एखादी वस्तू आपल्या नजरेसमोर अंगठा/बोट ठेऊन त्या वस्तूचे मापन चित्र काढण्यासाठी करतो. मी कुठेसं असही ऐकलं आहे कि जर चार बोटं वळवून अंगठा उभा ठेवला अगदी थम्स अप प्रमाणे व त्या अगठ्यात जितका बाक असेल तितका तो माणूस गर्विष्ठ असतो. अशा अनेक उदाहरणावरून रुळे of thumb या वाक्प्रचाराचा जन्म झाला असावा असे मत आहे. अर्थात हे सारे कयास आहेत.

Rule of thumb means a method of procedure based on experience and common sense, a general principle regarded as roughly correct but not intended to be scientifically accurate. 

याचाच अर्थ असा कि अनुभवावरून बनवलेला एखादा सरळसोट नियम. तो प्रत्येक ठिकाणी लागू होईलच असे नाही कारण या नियमाला काही शास्त्रीय आधार नसतो. उदा. अंगठ्याच्या लांबी एव्हडं म्हणजे एक इंच असा सरळसोट नियम. 

Rule of Thumb’ च्या जन्माची हि चित्तर-कथा तुम्हाला आवडली असेलच.

दत्तात्रय पटवर्धन 

No comments: