Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Thursday, September 25, 2014

4 कुरण : रामचंद्र नलावडे.


कुरण : रामचंद्र नलावडे
भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट आचार, समाजाला लागलेली एक कीड. लाकडाच्या  ओंडक्याला आतून पोखरून काढणारी वाळवी तसाच समाजाला आतून पोखरणारा म्हणजे भ्रष्टाचार. आज हा भ्रष्टाचार प्रत्येक क्षेत्रात अगदी खुलेआम दिसून पडतो. हि भ्रष्टाचाराची वाळवी अगदी खालच्या थरापासून ते अगदी वरच्या थरापर्यंत सरेआम चालू आहे. अशातच  समाजातून मग कुठे त्याच्या विरुद्ध पडसाद उमटतात. असाच एक पडसाद  उमटला तो रामचंद्र नलावडे यांच्या 'कुरण' या कादंबरीतून.लेखक स्वत: सरकारच्या महसुल विभागात नोकरी करत होते. त्यामुळे त्यांच्या निरीक्षणातून निर्माण झालेली हि प्रस्तुती.

कोकणातील सारंगपूर नावाच्या तालुक्याच्या गावाचे बाजीराव डोईफोडे हे मामलेदार, नायब तहसीलदार म्हणून काम करणारी देशमुख नावाची तरुणी. तहसिलदाराच्या तालावर नाचणारा तलाठी संघाचा सर्वेसर्वा असलेला लक्ष्मण, प्रांतसाहेब मोडक, लाचलुचपत प्रतिबंधन इन्स्पेक्टर कांबळे आणि माने. यात मग आलेच समजातील तथाकथीत नामवंत माणसे जसे ठेकेदार, खाणीचे मालक इ.  समाजात जसे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध असणारी काही मंडळी असते तसेच तहसिलदाराच्या घरातच त्यांचा मुलगा मंदार, भ्रष्ट आचरणाचा तिटकारा असणारा दाखवला आहे. अशा व्यक्तिरेखा श्री  नलावडे यांनी उभ्या केलेल्या आहेत. या व्यक्तिरेखांच सुंदर रेखाटन हेच या कादंबरीच बलस्थान आहे. एक काळ असा होता कि या लोकांमध्ये काम करण्याची तळमळ होती, लोकांसाठी झिजण्याची तयारी होती, परंतु आज तिचा मागमूसही राहिलेला नाही. या कादंबरीचं वैशिष्ट हे कि पापभिरू आणि ध्येयासक्त माणसेही संगतीने कशी बदलतात आणि नैतिकदृष्ट्या त्यांचे अध:पतन कसे होते याचीही दृश्ये अत्यंत ठळकपणे चित्रित केलेली आहे.  मग कळतं कि एक सडलेला आंबा दहा आब्यांना कसा खराब करतो ते. प्रश्न उत्पन्न होतो कि दहा आंबे एकाला सुधरवू शकत नाही का?

हि समाजाची पोखरण कुठवर चालेल हे सांगता येत नाही. हे अध:पतन असंच चालू राहून समाजाची पूर्ण राखरांगोळी होणार आहे हेही सांगता येत नाही. मला कुठेस वाचलेलं आठवत कि एकदा पंडित नेहरू यांनीलॉर्ड माउंटबेटन यांना पत्र लिहिलं आणि कळवलं कि, " लाइसेंस कोटा पॉलिसी मुळे भ्रष्टाचारला चालना मिळत आहे." यावर

माउंटबेटन यांनी उत्तर दिले कि,
" मि. नेहरू, ज्यावेळेला आपण जिना झाडतो तेव्हा त्याची सुरवात वरून करतो."
किती मार्मिक आणि समर्पक उत्तर.

"कुरण" या कादंबरीतून आपण पोखरत चाललेल्या समाजाचे चित्र तर पाहतोच परंतु वाचताना मनात विचार येतो कि कधी आपण हा जिना साफ करायला सुरवात करणार आहोत. आणि जिना साफ करायचा म्हणजे त्याची सुरवात वरून करायची मग, who will bell the cat?


कुरण 
लेखक : रामचंद्र नलावडे
लोकवाग्मय गृह,
पृष्ठे : 260
किंमत : रुपये ३००.

दत्तात्रय पटवर्धन


आजचा सुविचार
आजचा सुविचार






4 comments:

  1. इंग्रजीत एक शब्द आहे - बॉटलनेक अन अर्थ आहे अरुंद वा कोंडी करणारी जागा. बाटली असो वा सरकारी खाते, आशी स्थिती वरच्या बाजुलाच असते, हे विषेश!

    ReplyDelete