Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.
Showing posts with label history of chess. Show all posts
Showing posts with label history of chess. Show all posts

Wednesday, May 13, 2015

0 बुद्धिबळाचा इतिहास : भाग ७

पर्शिया मध्ये या खेळात काही बदल करण्यात आलेत. आपणाकडे जो 'गज' होता तो पाच घरात चालत असे.
एक समोरील घरात, हे सोंडेचे प्रतिक होते. आणि एक घर कर्ण रेषेत, अशी चार घरं, जी चार पायांचे प्रतिक होते.
परंतु पर्शिअन सैन्यात गज म्हणजेच हत्ती चे महत्व नव्हते म्हणून त्यांनी गज ( bishop ) चे समोरील घरात
जाणे बंद केले व त्या ऐवजी कर्ण रेषेत एका ऐवजी दोन खरात जाण्याचे बळ दिले. पर्शिअत या खेळावर
भारतापेक्षा  जास्त विचार करण्यात आला तसाच त्यांनी एक महत्वाचा बदल केला तो हा कि जर राजावर जोर
असेल तर "शाह" म्हणून घोषणा करायची. हाच शब्दप्रयोग आपण सध्या 'शह' म्हणून उदगारतो. हीच घोषणा
पुढे इंग्रजीत 'चेक' म्हणून प्रचारात आली. अशी घोषणा करण्या मगच उद्देश हा कि शत्रुपक्षाला सचेत करणे कि
तुझा राजा धोक्यात आहे जेणे करून त्याचे लक्ष नसेल तर राजा मरेल आणि डाव आकस्मित पणे संपेल.पुढे
'check  mate ' सारखे शब्द प्रयोगात आले.

जेव्हा राजा कोणत्याही घरात सरकू शकत नाही,म्हणजेच असे कोणतेही घर राजा साठी उपलब्ध नसते जेथे
ते घर शत्रू पक्षाच्या जोराविना आहे. अशा परिस्थितीस पर्शिअन लोकं 'मानद'असे महानत. याचा अर्थ गोंधळलेला यातूनच पुढे 'mate ' हा शब्द प्रचारात आला. म्हणूनच 'mate ' चा अर्थे 'राजा मेला' असा न होता 'गोंधळलेला राजा' असा होतो.

पर्शिआत 'चतुरंग' चा 'झतरंग' असा अपभ्रंश झाला. राजाचे नामकरण 'शाह' म्हणून करण्यात आले. चातुरांगातला 'मंत्री' हा 'फर्झीन' झाला . घोडा अस्प , बिशप (elephant ) पिल तर foot soldier हा पियादा म्हणून नावारूपास आला. फर्झीन या
शब्दाचा उपयोग संत कबीर तसेच संत रहिम यांच्याही डोह्यांत सापडतो,
उदा. बडा बढाई न करे, छोटा बहु इतराय
        ज्यो प्यादया फरझी भया , तेढा तेढा जाय || ( कबीर )

रहिमान सिधी चाल सो प्यादा होत वजीर
फरजी साह न हुई सके, गती तेढी तासीर. || ( रहीम )

Sunday, April 19, 2015

0 बुद्धिबळाचा इतिहास भाग 5.


आपण चतुरंग या खेळातील सोंगट्या बाबत पहिले. या सोंगट्या व त्याच्या चाली बद्द्ल आपण पाहू. संस्कृत
काळात या गोट्यांच्या चाली आणि त्यांचे बळ यात फारच अंतर आहे. त्यावेळेसच्या गोट्याचे बळ खूपच कमी होते. सोंगट्या जास्तीती जास्त एक किव्वा दोन घर चालत असत, तोही  एक हत्ती सोडला तर. आज हत्ती , वजीर (राणी), उंट यांचा लांब पल्ल्याचा मारा खेळाला गती देऊन जातो. अगदी दूर बसूनही या सोंगट्या शत्रू पक्षाच्या मोहरांवर नजर ठेऊन असतात, अगदी आजच्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राप्रमाणे.

चतुरंग काळात राजा कोणत्याही दिशेला एक घर चालू शकत होता. आजच्या प्रमाणेच त्याकाळीही राजा अत्यंत महत्वाचे मोहरे होते. राजा मारला गेला कि खेळ संपायचा. आजच्या आधुनिक खेळात राजा मारला जात नाही. संकृत काळात राजा वर जर बळ असेल तर याची घोषणा करण्याची गरज नसे. त्यामुळे जर राजाला चेक / शह बसला असेल व ते खेळाडूच्या लक्षात आले नाही तर राजा मारला जायचा. आणि डाव अनपेक्षितपणे संपायचा. एखाद वेळी राजा हा अशा घरात सरकवला जायचा जेथे शत्रू पक्षाचे बळ आहे आणि मग राजा मारला जायचा.
त्यावेळी 'इललीगल चाल' ( illegal move ) ची संकल्पना नव्हती.

पटावरील दुसरी महत्वाची सोंगटी म्हणजे 'मंत्री' . मंत्री म्हणजे राजाचा सल्लागार (next to king ). "मंत्री" या संस्कृत शब्दापासूनच इंग्रजीत 'mentor' , 'monitor' सारखे शब्द आले. 'मंत्री' हि सोंगटी आजच्या 'राणी' ची पूर्वज. या सोंगटी ची चाल म्हणजे एक घर कर्ण रेषेत. समोर, मागे किव्वा बाजूला हा मंत्री चालू शकत नसे. राजाचा सहकारी म्हणून याला राजापेक्षा अर्धे बळ अशी संकल्पना होती.

तिसरे महत्वाचे मोहरे म्हणजे 'गज' (elephant), हे मोहरे आजच्या 'बिशप' चे पूर्वज. हे मोहरे एक घर कर्ण रेषेत किव्वा एक घर पुढे चालू शकत होते. अशा रीतीने 'गज' पाच घरात चालू शकत होता. या मागील संकल्पना अशी कि गजाचे चार पाय कर्ण रेषेत येणाऱ्या चार घरांवर आपले बळ दाखवत असे तर सोंड हि समोरील घरावर बळ प्रस्थापित  करत असे.

'अश्व' हे मोहरे म्हणजे आजचा' 'घोडा'. या घोड्याच्या चालीत आज पर्यंत काहीही बदल झालेला नाही. त्या काळीही घोडा आजच्या प्रमाणेच अडीच घर चालतो.

प्यादे हे एक मोहरे ज्याला एक घर पुढे जाण्याचा अधिकार होता, तसेच शत्रूपक्षाचे मोहरे मारतान पुढील कर्ण रेषेतील घरात मारता येत असे. हे प्यादे पट  पार करून पलीकडे जात असे तेव्हा त्याचे 'मंत्री' या सोंगट मध्ये रूपांतरण होत असे.
'रथ' (chariot ) किव्वा रोका (boat , ship ) हे मोहरे आजच्या हत्तीच्या मोहऱ्याची प्रतिकृती होती. पटावरील हे एकच मोहरे असे होते ज्याला लांब पल्ल्याचामारा करण्याचे बळ होते. 'रोका' ( शिप ) या नावामुळे इतिहास तज्ञांचे म्हणणे असे होते कि भारतीय युद्ध पद्धतीत नौका हि नव्हती त्यामुळे हा खेळ भारताचा नाही. या विवाद बद्दल आपण पुढे पाहूच. तूर्त तरी एवडेच.