Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Tuesday, December 23, 2014

0 कबीराचे दोहे : भाग १६

इसाप  हा झांथस च्या घरी स्वयंपाकी होतो. त्याकाळी गुलाम ठेवले जात असतं. इसाप  हा असाच झांथस चा गुलाम होता. अत्यंत बुद्धीमानी, कमी उंचीचा व दिसायला अगदी कुरूपच. एके दिवशी झांथस कडे त्याचा मित्र येतो. झांथस इसापला म्हणाला कि आज माझा मित्र आलेला आहे त्याच्यासाठी सर्वात उत्तम पदार्थ बनवशील. जेवणाची वेळ झाली तेव्हा झांथस इसापला म्हणाला कि वाढायला सुरवात कर.. इसाप वाढायला लागतो आणि झांथस ते पाहून थक्कच होतो. काय केले असेल या इसापने? त्याने सर्व पदार्थ बोकडाच्याच जिभेचे. यावर झांथस म्हणाला कि, इसाप हे काय सर्व पदार्थ बोकडाच्याच जिभेचे? यावर इसाप म्हणाला कि, जगात जीभे एव्हडी उत्कृष्ट वस्तू दुसरी कोणतीच नाही आणि तुम्ही मला सर्वात उत्कृष्ट पदार्थ करायला सांगितले होते. झांथस  काहीच न बोलता शांत बसतो. मग रात्रीच्या भोजनासाठी सर्वात निकृष्ट पदार्थ बनवण्यास सांगतो. रात्र होते आणि दोघेजण जेवायला बसतात. पुन्हा पाहतात तो काय? पुन्हा बोकडाच्याच जीभा. यावर झांथस इसापकडे एक कटाक्ष टाकतो.   त्याची प्रष्णरूपी  नजर इसापला कळते व तो म्हणतो कि या जगतात जीभे एव्हडी वाईट गोष्ट काहीच नसेल. जीभच सर्वात निकृष्ट आहे.

बरोबर आहे कबीर दासजी म्हणतात,

कुटील वचन सबसे बुरा जासे होत न हार,
साधू वचन जल रूप है, बरसे अमृतधार.  (कबीर दास )

 
या जिभेतुन जेव्हा कटू वचन बाहेर पडतात त्यावेळेस कलह निर्माण होतो परंतु ज्यावेळेस याच जिभेतुन प्रेमाचे स्नेहाचे शब्द बाहेर पडतात तेव्हा हीच जीभ मात्र मैत्री जोडते. हि जीभच आहे जी मैत्री जोडते आणि  मैत्री तोडते. "अंधे का बेटा अंधा " हे शब्द जेव्हा या जिभेतुन पडतात तेव्हाच महाभारताच्या युद्धाची बीजे पेरली जातात. जिभेला झालेली जखम तर बरी होते परंतु जीभे मुळे झालेली जखम बरी होतं नाही.
एक संस्कृत सुभाषित सुद्धा हेच सांगते,
वाग्माधुर्यात सर्वलोकप्रियत्वम, वाक्पारुश्यात सर्वलोक अप्रियत्वम,
किंवा लोके कोकीलेनोपकार: , किंवा लोके गर्दाभेणाप्रकार: ||

मधुर बोलणारे सर्वांना  प्रिय होतात. कठोर वचनाने अप्रिय होतात. कोकिळेने जगावर असे कोणते उपकार केलेले आहेत तरी तो  सर्वांना आवडतो आणि गाढवाने  कुणाचे काय वाईट केले कि ते कोणालाच आवडत नाही. या सर्वांच एकच कारण आहे ती म्हणजे जीभ. म्हणूनच समजदार माणसे म्हणतात  "खाताना आणि बोलताना जिभेवर ताबा ठेवला पाहिजे.

 दत्तात्रय पटवर्धन

कबीराचे दोहे : भाग ७

कबीराचे दोहे : भाग ७
कबीराचे दोहे : भाग ७

कबीराचे दोहे : भाग ७

Thursday, December 18, 2014

0 पेशावर मध्ये विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या.

पेशावर मधील आर्मी स्कूल मध्ये बेछूट गोळीबार करून १३२ विद्यार्थ्यांची हत्या करण्याची बातमी जगभर पसरली आणि जग स्तब्ध झाले. प्रत्येकाच्या  मनात एकच प्रश्न  डोकावू लागला, मग आपण civilised कि uncivilised ? पेशावर मधील वारसक रस्त्यावरील हि शाळा पाकिस्तानी लष्करातर्फे चालवण्यात येते. या शाळेच्या परीक्षा सुरु होत्या आणि मंगळवारी  सकाळी साडे दहाच्या सुमारास  हा हल्ला करण्यात आला. निष्पाप विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या करण्याचे पापकृत्य घडवून आणले.
असे म्हणतात, Everything is fair in love and war . परंतु अशा युद्धाचेही काही नियम असतात उदा. नागरिक वस्तीत बॉम्ब हल्ला करू नये, दवाखान्यावर बॉम्ब हल्ला करू नये, जखमी सैनिकांना घेऊन जाणाऱ्या अम्बुलन्स वर बॉम्ब  हल्ला करू नये इ. युद्धाचेही  असे नियम असताना  आपण निष्पाप विद्यार्थ्याची हत्या करण्यापर्यंत मजल मारली.
पाकिस्तान मधील घटना ऐकल्यावर फैज अहमद "फैज" यांचा एक शेर आठवला. पाक हुकुमशाहीच वर्णन करताना त्यांनी म्हटले होते,

है लबरेज आहोँसे ठंडी हवाएँ,
उदासी में डूबी हुई है घटाए
मुहब्बत की दुनिया में शाम आ चुकी है,
सिह्यपोश है जिंदगी की फ़िज़ाए |

"हे असह्य गारठ्याच वातावरण दु:क्ख पूर्ण निश्वासांनी  कसं ओतप्रोत भरून गेलाय... कृष्ण घनमेघ कालोखांमुळे आणखीनच उदासवाणे भासताहेत .... प्रेमाच्या साम्राज्यात जणू सायंकाळ अंधारून आल्यागत झालंय .... सारं कसं आयुष्यच काळोखामुळे झाकोळून (सियहपोश)   टाकल्यागत झालंय ---- स्वातंत्र्याचा प्रकाशाच जणू नाहीसा झालाय  आणि सगळीकडे अंधारून आलाय"  आजही हे शब्द  पाकिस्तान च्या बाबतीत तंतोतंत लागू होतात.

परंतु याच वेळेस मरहूम साहीर लुधियानवी यांच्या 'जंग टलती रहे तो बेहतर है" या काव्याची  आठवण झाली, ते म्हणतात,

खून अपना हो या पराया हो ,
नस्ले आदम का खून है आखिर
जंग मश्रिक़ में हो के मगरिब में
आमने-आलम का खून है आखिर ||

बम घरोंपर गिरे के सरहद पर
रूहें-तामीर जख्म खाती है
खेत अपने जले की औरोंके
जीस्त फाको से तिलमिलाती है ||

टैंक आगे बढे की पीछे हटे
कोख धरती की बाँझ होती है
फतह का जश्न हो के हार का सोग
जिंदगी मय्यतो पे रोती  है ||

जंग तो खुदही इक मसअला है
जंग क्या मसलो का हल देगी
आग और खून आज बख्शेगी
भूख और एहतियाज कल देगी ||

इसलिए ए शरीफ इंसानो !
जंग टलती रहे तो बेहतर है,
आप और हम सभी के आँगन में
शम्मा जलती रहे तो बेहतर है||

आपण यातुन केव्हा शिकवण घेणार कोणास ठाऊक?

Sunday, December 14, 2014

0 कबीराचे दोहे : भाग १५


मी आणि बाप्या एकदा कॉफी हाउस मध्ये गेलो. महागड कॉफी हाउस असल्यामुळे कॉफी यायला  उशीर होता. आमच्या इकडच्या तिकडच्या गोष्टी सुरु झाल्या. गोष्टी रंगात आल्या होत्या आणि माझ्या डोक्यात एकदम विचार आला कि आज बाप्याला विचारू त्याच्या लग्न न करण्याचे कारण. मी मौका पाहिला आणि त्याला सरळ सरळ विचारलेच.त्यावर आढावे घेत तो टाळण्याचा प्रयत्न करू लागला. "काय आपल्या नशिबातच नाही रे ? " परंतु मी हि त्याचा पिच्छा पुरवला, त्यावर जरासा चिडूनच म्हणाला , " अरे प्रत्येक गोष्टीला नशीब लागत. "कभी किसीको मुकम्मल जहां नही मिलता, कही जमीन तो कही आसमां नही मिलता ." अरे आम्हाला तर ना जमिन ना आसमान !

त्यावर मी त्याला म्हणालो ,"अरे तू तर पुष्कळ मुली पाहिल्यास ना ? मग एकही पसंत आली नाही?
बाप्या म्हणाला, " जाऊदे रे असतात एकेकाचे नशिबाचे भोग"

मी म्हणालो, " बाप्या, नशिबाच्या काय गोष्टी करतो, तूच तर सगळ्यांना नाकारलं. एकही धड वाटली नाही तुला?"

आता बाप्या मात्र चिडला म्हणाला ," नशीब नाही तर काय रे?,  " I was in search of perfect wife !"

मी म्हणालो, " मग तुला कुठेच मिळाली नाही".

बाप्या, " तेच तर म्हणतोय, नशिबाचे भोग. एकही मिळाली नाही जिला मी परफेक्ट म्हणू "

मी, " एकही नाही ?" अरे तुझी एव्हढी भ्रमंती चालू असते कुठेच दिसली नाही.?

 बाप्या, " अरे एकदा मिळाली होती" 

"मग कुठे माशी शिंकली"

अरे, इटलीची होती ( याला इटलीचीच सापडली, भारतात कोणी नव्हतीच वाटत ) मी तिला मागणी हि घातली. तीही माझाशी पुष्कळ वेळ बोलली. व काय म्हणाली ठाऊक आहे का तुला?

मी म्हणालो, " मला कसं माहित असेल?"

अरे, तीने नकार दिला आणि  म्हणाली कि I am in search of perfect husband .

मी म्हणालो  बाप्या," तू आम्हाला नेहमी कबीरदास जिचा  दोहा सांगतोस. आज मलाच तुला सांगावा लागतोय.

कबीरदास म्हणतात,  बुरा जो देखन मै चला बुरा ना मिलिया कोय,
                                 जो मन खोजा आपणा मुझसे बुरा ना कोय ||

बाप्या perfect  च्या शोधात होता. तो तरी perfect  होता का? असच प्रत्येकाच असतं. आपण दुसऱ्याचे दोष शोधत असतो त्यावर चर्चा करत असतो परंतु त्याच वेळेला आपल्याकडेही चार बोटे वळलेली असतात याकडे दुर्लक्षच केलं जातं.
यातही आपला अहंकारच  दुसऱ्याला दोष देण्यास तत्पर असतो. अस म्हणतात कि फोर्डने ज्यावेळेस नवीन गाडी काढली होती तेव्हा त्याला रिव्हर्स  गेअर नव्हता. गाडी मागे वळवण्यास खूपच त्रास जायचा. मग रिव्हर्स गेअर्स आलेत. आपणही या रिव्हर्स गेअर चा उपयोग करा आणि आतला प्रवास सुरु करा. आपल्या मनाला टटोला, लक्षात येईल कि आपल्या इतक या जगात वाईट कोणीच नाही.

गालिब सुद्धा म्हणतोच ना,
उम्रभर 'गालिब'  यही भूल करता रहा,
धूल चहरे पे थी और आइना साफ करता रहा |

असच होत असतं ना? आपल्याच चेहऱ्यावर धुळ असते आणि आपण आरसा साफ करत बसतो. आरसा साफ करता करता आयुष्य निघून जातं. कोणाच्या हे पटकन लक्षात  येत तर कोणाच्या उशिराने. एखाद्याच्या तर लक्षातच  येत नाही अगदी आयुष्य संपेपर्यंत. ज्याच्या लक्षात येत तो गालिब होतो नाहीतर कबीर.

Friday, November 28, 2014

0 बुद्धिबळाचा इतिहास : 2


बुद्धिबळ  या खेळाच्या इतिहासाची पाच कालखंडात  विभागणी होते. 
संस्कृत  काळ ( ए. डी.. ७०० पर्यंत चा काळ);
पर्शियन काळ ( ए. डी. ७०० ते ८०० );
अरेबिक काळ ( ए. डी. ८०० ते १००० );
मध्ययुगीन  काळ ( ए. डी. १००० ते १६०० );
आधुनिक काळ ( १६०० पासून आतापर्यंत.).
     संस्कृत काळात या खेळला चतुरंग म्हणून संबोधले जायचे. या खेळात चार खेळाडू चार रंगाच्या सोंगट्या घेऊन खेळत. या सोंगट्याचा रंग काळा, हिरवा, तांबडा, व पिवळा असे. प्रत्येक खेळाडूकडे राजा, हत्ती, घोडा, नौका तसेच चार प्यादी असायची. चार खेळाडूंपैकी एकमेकांसामोरील कर्नाट असलेले खेळाडू भागीदार/भिडू असायचे. या खेळाचा उल्लेख संस्कृत, पाली, आणि इतर बौद्ध साहित्यातही आढळतो. या सोंगट्याची पटावरील स्थिती हि आजच्या पेक्षा थोडी वेगळी  होती. नौका किवा रथ अगदी कडेला(flank), राजा तसेच मंत्री  मध्ये, घोडा मंत्र्याच्या  जवळ. उद्देश लवकरात लवकर वेगाने बाहेर येता याव म्हणून.
      हा खेळ फासा वापरून खेळला जात होता. परंतु नंतर या खेळाला जुगाराचे रूप प्राप्त झाले. लोक खेळताना आपली बोटे, हात, पाय असे अवयवही डावावर लावू लागले. ह्या जुगाराच टोकाचं सर्वश्रुत उदाहरण म्हणजे महाभारतातील पांडव, कौरव, आणि शकुनी यांनी द्यूतात केलेला  अतिरेक. पुढे कडक, राजकीय निर्बंधा मुळे चतुरंग मधून फाशाचे उच्चाटन झाले चौघा ऐवजी हा खेळ दोघांमध्ये खेळला  जाऊ लागला. दुसऱ्या बाजीरावाच्या पदरी असणाऱ्या त्रीवेन्गादाचार्यानी बुद्धिबळावर संस्कृत मध्ये 'विलासमणिमंजरी' हा ग्रंथ लिहिला.   या खेळाबद्दल एक कथा नेहमी सांगितली जाते ती –
     राजा कैद याने अनेक युद्धे केली आणि अनेक प्रांत आपल्या राज्याला जोडून घेतले. इच्छेनुसार त्याला पैसा, संपत्ती, नाव, ऐश्वर्य सर्व काही मिळाल. कोणीही शत्रू म्हणून राहिला नाही. त्यामुळे युद्ध नाही. जीवन निरस कंटाळवाणे जाऊ लागले. शेवटी त्याने फर्मान काढले कि मला जो या कंटाळवाण्या  जीवनातून बाहेर काढेल त्याला योग्य ते बक्षी दिले जाईल. अनेकांनी अनेक प्रयत्न  केले पण सर्व विफल झाले. सरते शेवटी त्याच्या मंत्र्याने विचारांती एका खेळाची मांडणी केली, राजाला तो खेळ व त्याचे नियम समजावले व स्वत: राजाशी खेळू लागला. राजाला हा युद्ध सदृश खेळ खूप आवडला.
     आता राजाची वेळ होती शब्द पाळण्याची. राजा त्या म्हणाला, " सांग तुला काय हवे? तू जे मागशील ते तुला बक्षीस रुपात दिले जाईल. मग सोन, हिरे, पैसा जे हव ते माग.  मंत्री म्हणाला, मला जास्त काही नको. एक करा, या पटावर ६४ घर आहेत, पहिल्या घरात एक गव्हाचा दाणा, दुसऱ्या घरात दोन, तिसऱ्या घरात चार, चौथ्या घरात आठ असे दाणे ठेवत  जा. अंती सर्व मिळून जेवढे दाणे होतील तेव्हडे मला द्या. दरबारातील प्रत्येक जण या मागणीमुळे  मंत्र्यावर  हसू लागले. मंत्र्याला मुर्खात काढू लागले. राजाही आश्चर्यचकित झाला व म्हणाला बस एव्हडच!!! त्याने नोकरांना मंत्र्याची इच्छा लगेच पूर्ण करण्याचे आदेश दिले. सारे नोकर कामाला लागले.
     मंत्री मूर्ख ठरला कि राजा मंत्र्याची इच्छा पूर्ण करू शकलाआपणही वही आणि पेन घेऊन पहा गव्हाचे किती दाणे मंत्र्याने राजाकडे मागितले होते? आकडा मोठा होता तर किती मोठा! आकडा लहान होता तर इतकी शुल्लक मागणी करणारा मंत्री मूर्ख होता कि महामूर्ख?  बघा,६४ पैकी किती घरातील गव्हाचे दाणे मोजता येतात ते.
      हा आलोच पुढील लेखात गव्हाच्या दाण्यांचा हिशोब घेऊन!  

Thursday, November 27, 2014

0 बुद्धिबळाचा इतिहास : 1बुद्धिबळ म्हटले कि आपल्याला महाभारतातील शकुनी, दुर्योधन आणि पांडव यांच्या द्यूताच्या खेळाची आठवण झाल्याशिवाय होत नाही. शकुनीचा तो कपटीपणा, त्याचं महाभारत या टीव्ही धारावाहिक मधील मिश्किल हास्य डोळ्यासमोरून तरळून जातं. द्तुताचा खेळ जो महाभारतात येतो तोच तो चतुरंगचा खेळ. हाच खेळ नंतर  भारत ते पर्शिया आणि पुढे युरोप असा प्रवास करता करता शेवटी आजचा बुद्धिबळ कसा झाला हा इतिहास अगदी रमणीय आहे. भारतातून पर्शियात गेल्यावर त्याच्या सोंगट्या मध्ये कसा बदल झाला. सोंगट्या चे कसे नवीन नामकरण झाले? राणी हि पटावर केव्हा आली व युध्धामैन्दानावर धुडगूस घातला. हे वाचताना मन अगदी रमून जात.

राजकुमारी अना कॉमनेना  ( Anna Comnena ) हिने आपल्या वडिलांचं  चरित्र लिहिलं. त्यात तिने वर्णन केलं कि बुद्धिबळ हा खेळ ग्रीस मध्ये अरब्स देशातून आला. ग्रीस देशात या खेळला Zatrikion म्हटले जात होते. अरेबियांस नि हा खेळ पर्शियनकडून  घेतला  व पर्शियात हा खेळ भारतातून आला. पर्शिया मध्ये हा खेळ राजा खुसरो ने आणला ज्याने पर्शियावर ४८ वर्ष्ये राज्य केले.

याचा विचार करून जर भारतात या खेळाची मुळं तपासली तर  लक्षात येते कि हा खेळ इ.सनाच्या ३००० वर्षे पूर्वीचा आहे., भविष्य पुराणात उल्लेख आहे कि राजा युधिष्ठीर व्यासांना विचारतो कि हा खेळ कसा खेळायचा, याच्या चाली कशा आहेत?
त्यावर व्यास , सोंगट्यानची   रचना कशी करायची हे सांगतात.. नंतर राजा हा कसा महत्वाचा आणि त्याची रक्षा कशी जरुरीची हे सांगतात. फासा  फेकल्यावर जर ५ आकडा आला तर राजा किव्वा एक प्यादे सरकवायचे, जर चार आकडा आला तर हत्ती, आणि तीन आकडा आला तर घोडा तसेच दोन आकडा आल्यावर शिप (उंट) सरकवायचा." पुढे व्यास प्रत्येक सोंगट्यानची चाल समजावतात. राजा एक घर कोणत्याही दिशेला चालतो. प्यादे एक घर पुढे आणि मारताना एक घर तिरकस, पुढील घरात. हत्ती त्याच्या इच्छेनुसार आडवा/ उभा कितीही घरं चालू शकतो ( फक्त रस्ता मोकळा असणे आवश्यक आहे).
शिप (बिशप ) फक्त दोन खरं तिरकस कोणत्याची दिशेला सरकू शकतो.  आणि घोडा हा अडीच घरं चालतो. राजा हा एक घर कोणत्याही दिशेने सरकतो."
अर्थात सध्याच्या खेळात कही सोंगट्याच्या  चाली  बदलल्या  आहेत.
चतुरंग म्हणंजे सैन्याचे चार भाग. 'चतुर' म्हणजे 'चार' आणि 'अंग' म्हणजे 'भाग'.  पायदळ, घोडदल, हत्ती आणि शिप ( chariots ) , एक राजा आणि त्याचा general  यांचा मिळून हा खेळ. हिंदू पुरातन युद्धपद्धतीच  हे एक चित्र.
व्यासांच्या वरील वर्णावरून लक्षात येत कि त्याकाळी राणी हि पटावर नव्हती. त्यामुळे राणीची पटावरील धमाल नव्हती. खेळ कसा निरस असेल ना?  बिशप ची चाल हि लिमिटेड होती. फक्त हत्ती हेच एक दूर पल्ल्याचं मिसाइल होतं. याच हत्तीला  'highway lover ' असेही संबोधतात. त्यामुळे हत्ती सोडला तर बाकीच्या सोंगट्यानची चाल मर्यादितच होती म्हणून  खेळात एकप्रकारचा रटाळपणा असावा. त्या काळी भारतात इतिहास लिहिण्याचा शिरस्ता नव्हता त्यामुळे याची पाळेमुळ शोधन कठीण  जातं. परंतु सहाव्या शतकात जेव्हा हा खेळ पर्शियात गेला तेव्हा या खेळाची माहिती इतिहासात मिळते. त्याकाळी सोंगट्या चित्रात दाखवल्याप्रमाणे मांडतात.