Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Friday, October 31, 2014

0 शायरीचा गुलदस्ता.भाग ९


"शमा आणि परवाना या जोडगोळीने उर्दू शायरीत धुमाकूळ घातला आहे. "शमा" हे स्त्री सौंदर्याचे प्रतिक, जितके मोहक तितकेच दाहक! शम्मच्या ठाई सौंदर्याने निर्माण झालेला अभिमान तर परवाना तितकाच दिलदार, जीव देण्यासही तयार असलेला.

पूर्वीच्या काळी शायरासमोर प्रज्वलित शमा ठेवली कि तो शायर काव्य गायनास सुरवात करीत असे अशी प्रथा होती. शमा म्हणजे ज्योत तर परवाना म्हणजे पतंग! त्यांचं अतूट असं नातं; जेथे शमा तेथे  परवाना! आता नातिक लखनवीचा हा शेर बघा –

मुहब्बत-आश्ना दिल मजहबो-मिल्लत को क्या जाने,
हुई रौशन जहाँ शम्अ परवाना वहीं आया।

-नातिक लखनवी
1.मुहब्बत-आश्ना – प्रेमी, प्रेम करणारे
2. मजहबो-मिल्लत - धर्म आणि संप्रदाय
     परवाना आणि जुगुनू दोन्हीही पतंगाचीच रूपं! पण दोघांमधील वैचारिक भिन्नता शायराने मोठ्या ताकदीनं वर्णिली आहे. परवान्याची  प्रकाशाकडे झेप. तालिब म्हणजे याचक, इच्छुक, मागणारा.  तर दुसरा म्हणजे जुगुनु स्वयंप्रकाशी. सरापा  म्हणजे नखशीकांत, आपादमस्तक, नितांत असा हा जुगुनु. आता प्रश्न पडतो कि प्रेमात स्वताला झोकून समर्पण कराव कि जुगुनु प्रमाणे स्वयंप्रकाशी राहावं. एखाद्या नवाबा प्रमाणे! इक्बालच्या ह्या पश्नच उत्तर आपणही शोधत असाल – पतंगाप्रमाणे मागेपुढे न पाहता प्रकाशाकडे झेप घेणे वा स्वयंप्रकाशी होऊन प्रकाशाची नेहमीसाठी प्राप्ती श्रेयस्कर?

परवाना इक पतंगा, जुगुनु भी इक पतंगा 
वो रोशनी का तालिब ये रोशनी सरापा  ||

'शाद' ही इक्बाल प्रमाणे विचार करताना जाणवतात. त्यांना वाटते कि जर परवाने दुसऱ्याच्या प्रकाशाकडे (कीर्ती, प्रगती, ऐश्वर्य इ.) कडे आकर्षित न होता  स्वतःच स्वयंप्रकाशित झाले तर ते स्वत: आणि शम्म अल्पायुषी होणार नाहीत. येव्हडेच नव्हे तर ते आपल्या आयुष्यात निखार आणू शकतील. 

पराई आग मे जलते न कभी परवाने 
जो अपनी आग मे जलकर निखर गये होते || 

     हा पतंगा ज्योतीच्या प्रेमात पडतो आणि प्राणार्पण करतो त्यामुळे त्याचं प्रेम, त्याग सर्वाना दिसून येतं त्यामुळे सर्वजण म्हणतात

इश्क क्या चीज है पूछिए परवाने से 
जिंदगी जिसको मयस्सर हुई जल जाने से || 

मयस्सर : मिळाली 

 प्रेमात वास्तविक दोघेही जळतात, मिलनाच्या वाटेवर आनंदाने नष्ट होणे पसंद करतात. परंतु ह्या अमूर्त प्रेमाची कदर ती कोणाला? काहीनां परवाना प्रकाशाकडे आकर्षित  होऊन शहीद होतो दिसतो म्हणून ते परवान्याला खरा प्रेमी मानातात, तर काहीना निरंतर शम्म जळताना दिसते. काही परवान्याची बाजू घेताना दिसतात तर काही शम्मची! हि शायराना-जुगलबंदी मोठी लाघवी आहे.  

'जौक' सारख्या शायराच लक्ष जातं ते शम्मच्या निरंतर जळण्याकडे व तो म्हणतो 
शमा भी  कम नहीं कुछ इश्क में परवानेसे, 
जान  देता है अगर वो तो ये सर देती है.||

      परवाना तर एका क्षणात शहीद होतो परंतु शम्मा तर त्याला आकृष्ट करण्यासाठी आधी जळते आणि परवाना  प्रेमाग्नित जळल्यावर त्याच्या विरहात रात्रभर जळत राहते.

     फातमा बेगम म्हणते

शमा ने जलकर  कहा ये परवाने से 
रातभर मै  भी जली हु, तेरे जल जाने से ||
                                                 
‘आर्जू’ लखनवी समोर मोठा गहन प्रश्न उभा थकलेला दिसतो आहे. हे प्रेम म्हणजे अफलातून रसायन आहे कि जेथे रोग आणि औषध एकच आहे. असं नसत तर जळणारा परवाना पाण्यात जाऊन नसता का पडला? -

उल्फत भी अजब शै है, जो दर्द वही दरमां,
पानी में नहीं गिरता जलता हुआ परवाना।

-'आर्जू' लखनवी

1.दरमां - दवा, इलाज, उपचार 

साकिब लखनवीच्या समोर वेगळीच समस्या आहे. हुस्न आणि इश्क़ाची हि जादू वा माया विचित्र अशी आहे, ज्यात इकडे दीप म्हणजे हुस्न परेशान तर तिकडे परवाना म्हणजे इश्क़ परेशान! दोघेही प्रेमाग्नित जळत आहेत -

हुस्न और इश्क का नैरंग खुदा ही जाने,
शम्अ जलती है कि दिल जलता है परवाने का।

-साकिब लखनवी

1.नैरंग -  माया, जादू 

वरील सगळ्या प्रश्नांना अवघ्या चार ओळीत देतानां अकबर इलाहाबादी म्हणतात
इस अंजुमन में आकर राहत नसीब किसको,
परवाना भी जलेगा और
शम्म भी जलेगी,
जन्नत बना सकेगा हरगिज न कोई इसको,
दुनिया यूँ ही चली है 'अकबर' यूँ ही चलेगी।
-अकबर इलाहाबादी

1.अंजुमन - महफिल, बज्म

     ह्या जगात येणारा प्रत्येक जण ‘राहत’ शोधतोय. शम्म काय अन परवाना काय, सारे ह्याच मार्गावरून आले अन ह्याच मार्गाने जाणार! अगदी स्वर्ग बनवण्याचे प्रयत्नही असेच सुरु राहणार. शेवटी हि दुनिया आजपर्यंत अशीच होती अन अशीच पुढेही राहणार.

दत्तात्रय पटवर्धन 
विजया यादव 

शायरीचा गुलदस्ता : भाग ६
 शायरीचा गुलदस्ता भाग ५
 शायरीचा गुलदस्ता भाग ४
 शायरीचा गुलदस्ता भाग ३
 शायरीचा गुलदस्ता. भाग २
 शायरीचा गुलदस्ता. भाग १
 

Thursday, October 23, 2014

4 कबीराचे दोहे : भाग ११

कबीरदासजीच्या काळात समाजावर रुढींचा जबरदस्त पगडा होता. यज्ञामध्ये हजारो प्राणी बळी दिले जात होते. विविध सुखांच्या अपेक्षेने, त्याच्या इच्छापुर्तीसाठी तसेच परमेश्वर प्राप्तीसाठी अनेक विधींचे पालन केले जात होते. या विधी अत्यंत कठोरतेने पाळल्या जात होत्या. काही तात्विकदृष्ट्या मनाला न पटणाऱ्या प्रथाहि पिढी दर पिढी स्वीकारल्या व पाळल्या जात होत्या. अशा प्रथांचा कुठून व कशा आल्या हा सुध्धा एक अध्ययनाचा विषय आहे. सर्व प्राणी जगताला  एकाच परमपित्याने निर्मिले असता त्यातील कोणा एकाचा बळी म्हणजे मारणे देवाला कसे रुचावे, तो प्रसन्न कसा होणार?.  कबीरदासजीनी ह्या प्रथांचा फोलपणा स्पष्ट करण्यासाठी म्हणून या प्रथांवर अत्यंत कडक शब्दात टीका केलेली आहे. या समाजाला कडक टीकेच्या चाबकाच्या फटकाऱ्यानी शुद्धीवर आणणारे कबीरदास हे एक क्रांतिकारी संतच होते. 

कबीरदास म्हणतात,             मोको कहा धुंडे रे बंदे , मै तो तेरे पास मे | 
                                  ना मै बकरी, ना मै भेडी, ना मै झुरि गंडास  मे|| 
                                   नही खाल मे , नही पोछ मे , ना हड्डी ना मास मे | 
                                    ना मै देवल, ना मै मस्जिद , ना  काबे- कैलाश मे || 
                                     ना तो कौनो क्रिया कर्म मे, नाही जोग बैराग मे | 
                                   खोजी होय तो तुरातही मिलीये पल भर कि तालाश मे. 
                                     मै तो सहर के भाहर , मेरी पुरी नवस मे | 
                                  कहे कबीर सुनो भाई साधो, सब सासो कि सास मे || 

       एक शेतकरी आनंदी जीवन जगात होता कारण तो समाधानी होता. एकदा एक साधू त्या शेतकऱ्याच्या घरी उतरला. गप्पा गप्पात तो साधू म्हणाला, " अरे तू एव्हडी मेहनत करतो आणि तरीही गरीबच, या जगात हिऱ्याच्या खाणी आहेत. तू जर का याचा शोध घेतला तर श्रीमंत होशील, अगदी सम्राटच.  पहाट  होताच  साधू आपल्या मार्गाने निघून  गेला. दिवसभर शेतकऱ्याला चैन नाही. त्याला फक्त हिऱ्याच्या  खाणीच दिसत होत्या. या हिऱ्याच्या खाणीनी त्याचे समाधान हिरावून घेतलं. तो अत्यंत दुख्खी झाला. एक दिवस हिऱ्याच्या खाणीच्या शोधात त्याने घर सोडले. हिऱ्यासाठी एखाद्या  भिकाऱ्यासारखा तो वणवण भटकत राहिला व अंत: राजपथावर मृतावस्तेत आढळला पण त्याला हिऱ्याची खाण काही सापडली नाही.
पुढे काही वर्षांनी तोच साधू त्या गावातून जात असताना त्या शेतकऱ्याच्या री गेला. पहातो तो तेथे दुसरेच नवे कोणी. चौकशी अंती सर्व कथा कळली. घरासमोरच्या पटांगणात काही मुले चकाकणाऱ्या दगडांशी खेळताना साधूने पहिले. मुलांकडे विचारणा केली तेव्हा कळले कि ते दगड शेताजवळून जाणाऱ्या ओढ्यातील आहेत. साधू म्हणाला, अरे हे तर हिरे आहेत. 

       परमात्मा रुपी हिरासुद्धा असाच जवळ असतो परंतु आपण त्याचा शोध बाहेरच्या विश्वात घेत भटकत (कि भरकटत) असतो. कबीरदासजी म्हणतातपरमात्मा काही  बकरी, मेंढी, देवळात, मशिदीत, चर्च, व गुरुद्वारात नसून तो आपाल्यातच आहे. तो कर्मकांडात नाही, तो जोग बैराग्यात नाही तर तो प्रत्येकाच्या श्वासात आहे. फक्त सच्या दिलाने शोधाल तर हा हिरा एका क्षणात मिळू शकतो. फक्त जरुरी आहे मान झुकविण्याची ..........  अहंकाराचा लोप होऊन विनयाचा उगम म्हणजेच परमात्म्याच्या सानिध्यात जाण्याचा मार्ग.  ध्यानात घ्या, भांड्यात पाणी तेव्हाच येते जेव्हा भांडे आपला सारा अहंकार त्यजून पाण्याकडे वाकून  विनंती करते.  मागणाऱ्या व देणाऱ्यातील हे नाते लक्षात आले कि सर्व सोपे होते. पण लक्षात कोण घेतो.,

दत्तात्रय पटवर्धन  

Sunday, October 19, 2014

0 कबीराचे दोहे : भाग १०

एकदा मी बाप्याच्या घरी  गेलो. आश्चर्य वाटतंय का? होत काहीतरी काम. पण मनात पक्क होत काहीतरी ऐकावं लागणार तेव्हांच माझ काम होणार.
मी घरी गेलो. घरातल्या सगळ्यांशी गप्पा मारल्या परंतु बाप्या काहीतरी विचारात गढलेला दिसला. मी त्याला विचारलं, "बाप्या काय विचार करतोय रे?"
बस, लगेच सुरु झाला. म्हणाला, "काल मला एक स्वप्न पडलं."
मी थोडा हादरलोच. बाप्याच स्वप्न!!!
तर बाप्या पुढे सुरु, " अरे काल माझ्या स्वप्नात, एक कुत्रा आणि मांजर आलं". आता तर मला ४४० व्होल्ट चा झटकाच लागला.
बाप्या म्हणाला, " तो कुत्रा आणि मांजर बोलत होते". बोंबला आता कुत्रा आणि मांजर बोलत होते,
मनात विचार आला आता बाप्याला ठाण्याला नाहीतर सरळ बंगलोर "निमांस" लाच न्यावे लागणार.
परंतु ऐकण तर भागच आहे. मीच  विचारलं, काय बोलत hote?"

तर बाप्या म्हणाला, " कुत्रा म्हणत होता, माझा घराचा मालक मला सर्व सेवा देतो. घरातील मंडळी मला प्रेम करतात, खायला देतात.
मला वाटते तो देव आहे.
मी म्हणालो "मग मांजर काय काय म्हणाली,"
बाप्या म्हणाला, " अरे मांजर म्हणाली, माझ्याही घराचा मालक मला सर्व सेवा देतो. घरातील मंडळी मला प्रेम करतात, घरातील मुले माझ्याशी खेळतात.
मला तर वाटते मीच देव आहे."

मी विचार करत आहे यातील बरोबर कोण? या बाप्याच्या परीक्षेत एक कठीण प्रश्न असणारच.
या एकाच प्रश्नात चारही 'life lines ' जाणार.
मी म्हणालो "बाप्या मांजरच बरोबर न!! बघ आसाराम बापू , किती सेवा मिळते, तीही लाखो लोकांकडून. किती प्रेम मिळते, अगदी सर्व कसे जीव द्यायला तयार होतात.
मग आसाराम बापू सारख्यांना मांजरीसाराखेच वाटते न!! ते चुकणे शक्य आहे का रे?"

त्यावर बाप्या चिडला व म्हणाला, अरे मांजरीला गर्व आहे. आणि कुत्रा विनम्र आहे. आपल्याच मालकाकडून (गुरुकडून) मान साम्मानाची अपेक्षा योग्य  नाही.

काबिर्दसाजी म्हणतात,  अहं अगीन हिरदै जरै, गुरु सो चाहै मान
                                     तिनको जम न्योता दिया, हो हमारे महेमान.

हृदयात अहंकाराचा अग्नी एव्हडा तीव्र आहे कि आपण जो आपल्यला सेवा देतो त्याच्याच कडून मान साम्मानाची अपेक्षा करतो. आपल्या गुरु कडूनच स्नामानाची अपेक्षा
केली जाते. अशा अहंकारी ना यमराजाचे  निमंत्रण असते कि या तुम्ही आमचे पाहुणे व्हा. तुम्ही गुरुभक्त होण्याच्या लायकीचे नाहीत. अहंकार हि दुखाची खान आहे. 


दत्तात्रय पटवर्धन 


आजचा सुविचार
आजचा सुविचार
Send Feedback

Monday, October 13, 2014

0 आम्ही खवळुनिया उठतो.            आम्ही खवळुनिया उठतो
            पाहुनी हे जग इलेक्शनचे
            गवसता नोटा करोडोच्या
            साठा टनावारी मदिरेचा II

            अभागी जीव खपती ह्या इथे
            शेतामधी पिकवायला सोने
            परि नशिबी असे यांच्या
             सदा कवडीमोल हो जीणे II

            नसे खळगी भराया शेवटी अन्न
            फिरे हा सावकारा घरी अन्नान्न
            फायदाही नसे सरकारी योजनांचा
           फस्त सारे कराया आहे बडे मत्स्य II

           ना 'जाणता राजा', 'अहिल्याबाई' थोर
           म्हणाया कागदोपत्री असे 'सुराज्य'
           कृषीमंत्री आम्ही केंद्रात असता कसे
           गळां फाशी इथे घेती दररोज कृषक II

           जनांमनाची सोडलेली असे त्यांनी
           म्हणे भार तुमचा आमुच्या खांद्यावरी
           'काय द्याचे' राज्य अमुचे स्वप्न आहे
           'फायद्याचे बोल' अमुचे लक्ष आहे II

           पक्षी-विपक्षी आजी आम्हां मोल आहे
           आमच्या शब्दास येथे तोल आहे
           (पर)राष्ट्रवादीच्या नशिबी घोर आहे
           सोनियाच्या घरी प्रवेश बंद आहे II

           कधी 'हात' हाती घ्या
           कधी स्वहस्ते घडाळ्या ल्या
           कधी 'कमल'दले गा लक्ष्मीस्तोत्र
           मुखी  सदैव 'समाजवादी' मंत्र II

           हे कोण म्हणता, मतदार जनता?
           आमुच्या पुढे यांची काय महता?
           देऊनी आश्वासनें, मिळवितो मत्ता
           घेउनी यांची मतें, पळवितो सत्ता II

           प्रकाश पटवर्धनआजचा सुविचार
आजचा सुविचार


Send Feedback

Sunday, October 12, 2014

0 वॉरेन हेस्टिंग्ज : झुंजार राज्यकर्ता आणि कुशल प्रशासक.


waren hastings
अरविंद जोग यांनी वॉरेन हेस्टिंग्स चा जीवनपट उघडून पाहिला आणि त्यांच्या लक्षात आले कि ज्याची प्रतिमा जनमानसात एखाद्या खलनायकाची बनून राहिली आहे ती तशी नाही. तो एक कुशल नायक होता हे त्यांना जाणवले आणि म्हणून त्यांनी वॉरेन हेस्टिंग्ज  च्या जीवनाचा चरित्रपट साध्या सोप्या गोष्टीरूप शैलीत वाचकांच्या समोर ठेवण्याचा घाट बांधला.
वॉरेन हेस्टिंग्ज अगदी बालपणी पोरका झाला. वयाच्या १५ व्या वर्षीच त्याच्या शैक्षणिक घोडदौडीला खीळ बसली. त्याच्या सांभाळ करणाऱ्या पालकांनी त्याला इस्ट इंडिया कंपनीत लेखनिक म्हणून नोकरीला लावले. व तो १७५० मध्ये "लंडन" या जहाजातून भारतात आला. हा लेखनिक भारताच्या गवर्नर जनरल या पदापर्यंत कसा पोहचला, या मार्गात आलेल्या अनेक अडचणींना त्याने कसे धीराने तोंड दिले? हा इतिहास जोगांनी अत्यंत सोप्या भाषेत मांडलेला आहे.
वॉरेन हेस्टिंग्ज ने सर्व प्रथम उर्दू व् पर्शियन भाषा शिकून घेतली. पुढे त्याने भगवतगीतेचे इंग्रजीत भाषांतर करून त्याला छान प्रस्तावना लिहिली. वयाच्या २५ व्या वर्षी त्याला मुर्शिदाबादच्या दरबारात ब्रिटीश रेसिडेंट म्हणून जावे लागले. तेथे त्याला कलकत्ता कौन्सिलचे काम जवळून बघता आले. त्याच्या लक्षात आले कि कंपनीतील अनेक पदांवरील पदाधिकारी हे आपले खिसे भरण्यात मग्न आहेत.. भ्रष्टाचार इतका बोकाळला आहे कि कोणालाही इस्ट इंडिया कंपनीची काळजी नाही. हे चित्र बघून त्याला मनोमनी अत्यंत वाईट वाटत असे. पुढे तो १७७२ मध्ये हिंदुस्तानचा पहिला गवर्नर जनरल झाला. परंतु हे पदही एखाद्या सह्याजीराव सारखे होते त्याला खास अधिकार नव्हते. कौन्सिल सदस्यांना विशेष अधिकार होते व हे सर्व स्वतःचे खिसे भरून गब्बर होण्याच्याच प्रवृतीचे होते. त्यामुळे ते वॉरेन हास्टिंग्जला प्रत्येक चांगल्या निर्णयात विरोध करीत असत. ते त्याची निर्भत्सना करण्याचा एकही क्षण सोडत नसत. नंद्कुमाराचे प्रकरण, अवधच्या बेगामांवरील अत्याचार, चैतसिंग प्रकरण  अशा  अनेक प्रकरणात हेस्टिंग्जवर आरोप ठेवून कशाप्रकारे बदनाम करून कावेबाज पणे त्याला अडकवण्याचे प्रयत्न झाले ते कळते. वॉरेन हेस्टिंग्ज चे प्रयत्न असायचे कि कशा प्रकारे कंपनीची प्रतिष्ठा जनमानसात वाढेल. मेकौले म्हणतो कि , हेस्टिंग्जहून  अधिक चांगले, अधिक कार्यक्षम गवर्नर जनरल भारताला लाभले असतील, पण हिंदुस्तानी जनतेत इतका लोकप्रिय असलेला गवर्नर जनरल झाला नाही.
जर क्लाइव ने बंगालमध्ये इंग्रजी सत्तेचा पाया घातला तर वारेन ने तो अधिक मजबूत केला. क्लाइवने  आपल्या दुसर्या आमदानीत कायदे करून भ्रष्टाचार , लाचलुचपत तसेच इंग्रज अधिकाऱ्यांच्या खाजगी व्यापार थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु निव्वळ कायदे करून जनता सुधारत नाही. कायद्याप्रमाणे वागायची जनतेला सवय लागावी लागते आणि यासाठी राज्यकर्त्यांनी आपल्या वागणुकीतून जनतेला आदर्श घालून द्यावा लागतो. या गोष्टीसाठी  हेस्टिंग्ज इतका दूसरा योग्य माणूस सापडला नसता.
वॉरेन हेस्टिंग्ज ने बंगालमध्ये अनेक सुधारणा केल्या, त्याने व्यवस्थित अभ्यास करून शेतसाऱ्याचे  दर निश्चित केले. शेतकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बरीच पावले उचलली. डक सेवा सुरु केली. राज्यकारभाराचा खर्च कमी करण्यासाठी आर्थिक सुधारणा केल्या.

१७८५ मध्ये वॉरेन हेस्टिंग्ज  इंग्लंडला परतला. त्यानंतर त्याच्या विरोधकांनी त्याच्यावर कारवाया केल्या, त्याच्यावर पार्लमेंट मध्ये आरोप केले. त्यावर चौकशी आयोग नेमला गेला. पुढे तो दोषमुक्त झाला.
एकंदरीत वॉरेन हेस्टिंग्ज च्या जीवनाचा वादळी पट लेखकाने शिस्तबद्ध रीतीने लहान लहान प्रकरणातून उलगडून दाखवला आहे.

  मॅजेस्टिक पब्लिशिंग हाउस,
लेखक : अरविंद वामन जोग,
मूल्य : ३०० रुपये
पृष्ठे : ३२०.

दत्तात्रय पटवर्धन
 

Tuesday, October 7, 2014

2 असे हे इंग्रजी शब्द : भाग ६

मेलेल्या सिंहावर संजीवनी मंत्राचा उपयोग करून त्याला जिवंत करणारा शेवटी त्या सिंहाचे भक्ष बनतो, हि कथा आपण लहानपणापासून वाचत व ऐकत आलो आहोत. मिळविलेल्या ज्ञानाचा तारतम्याने वापर केला नाही तर कसा विनाश होतो याचे हे जिवंत उदाहरण.  

मेरी शेली ह्या लेखिकेच्या Frankenstein या पुस्तकातील Dr . Frankenstein ची कथा हि अशीच. विक्टर फ्रैंकेस्टाइन हा तरुण तब्बल चार वर्षे अविरत मेहनत करून निर्जीव वस्तूंमध्ये प्राण फुंकता येतील का, प्राण प्राण फुंकून त्याला जिवंत करता येईल का, म्हणून संशोधन करीत असतो. शेवटी त्याला त्यात सफलता मिळते. मग तो दवाखाने, कबरी यातून मेलेल्या माणसांचे येनकेन प्रकारेण अवयव गोळा करतो, त्यांना जोडतो व त्यात प्राण फुंकतो आणि काय चमत्कार! कलाकृती जीवित होते. परंतु त्याचा गगनात न मावणारा आनंद क्षणभरच राहतो. थोड्याच वेळात त्याची घडवलेली मूर्ती महाकाय राक्षसाचे रूप धारण करते आणि त्याच्या वरच हल्ला करते. तो तेथून कसाबसा पळ काढतो आणि मग एक विनाशाची शृंखला सुरु होते. एकूण १८ भागात असलील्या ह्या कादंबरीचे लिखाण वयाच्या १८व्या वर्षी पहिल्या भागाने १८१८ मध्ये सुरु झाले व तो ‘अनामिक’ म्हणून १८२० मध्ये प्रकाशित झाला. तर दुसरा भाग १८२३ मध्ये स्वत:च्या नावे प्रसिद्द झाला. आज आपण Frankenstein लाच विनाशकारी राक्षस म्हणू लागलो. इंग्रजी भाषेला एक अमूल्य शब्द देऊन हा लेखिका गेली.  ह्या शब्दाचा उपयोग १८३०-४० (१८३८?) मध्ये झाला असावा –

Frankenstein  : A creation that gets out of control and bring harm to its creator; : One who creates something that brings ruins to himself. (एखादी निर्मितीच आपल्या निर्मात्याच्या घातास कारणीभूत ठरते).

     विनाशाचे तांडव बघायला व सहन करायला लावणारे असे अनेक मानवाच्या निर्बुध्दतेने घडलेले इतिहासात दिसतात पण मानव त्या पासून शिकलेला दिसत नाही. अगदी अलीकडील उदाहरणे पहावयाची झाल्यास –
असे म्हणतात कि इराक़ मधील तेलाच्या हव्यासापोटी सद्दाम हुसैन नावाच्या Frakenstein ला अमेरिकेनेच घडवले आणि तोच त्याच्या जन्मदात्याच्या मानगुटीवर बसून आव्हाने देऊ लागला, त्याच्या विनाशाची स्वप्ने पाहू लागला. सद्दाम हुसैन अमेरिकेचा फ्रैंकेस्टाइन म्हणून नंतर प्रसिद्द झाला..

     ८ जुलै २०१२ च्या 'Mail  Today ' च्या अंकात कुलदीप नायर
कुलदीप नायर
यांनी एक लेख लिहिला होता "
How congress invented a 'Sant'? त्यात त्यांनी म्हटले होते कि १९७७ मध्ये अकाली दल कॉंग्रेसला हरवून सत्तेत आली. ज्ञानी झैलसिंग यांना मुख्यमंत्री पदावरून खाली उतरावे लागले. त्यावेळी संजय गांधी
संजय गांधी
यांनी असा विचार मांडला कि आपण एखाद्या संताचा उपयोग अकाली दल ला आव्हान करण्यास करू. त्यासाठी संत भिंद्रनवाले यांची निवड झाली. पुढे काय झाले आपण सर्वाना माहीतच आहे. कुलदीप नायर
सारख्या प्रथितयश साहित्यिकाने ह्या शब्दाची मोठ्या मार्मिकतेने योजना करून कॉंग्रेसच्या ह्या अवघड जागेच्या दुखण्याचे वर्णन केले आहे -
"little did they realize at that time that they were creating a Frankenstein."

     पाकिस्तान नेहमीच दहशतवादाला खतपाणी घालत असतं. आता तोच दहशतवाद त्यांना गिळू पाहत आहे. Indian Express च्या २७ जानेवारी २०११ च्या लेखाचा मथळा होता -         "Terrorism : Pak has created 'Frankenstein's monster', says India." खरच दहशतवाद हा पाकिस्तानने जन्माला घातलेला फ्रैंकेस्टाइनचा राक्षस आहे आणि आज तो त्याच्याच जीवावर उठलेला जाणवतो आहे.

     एखादा लेखक कसा कळत नकळत एखाद्या शब्दाला जन्माला घालतो आणि जगात अजरामर होतो याचे "फ्रैंकेस्टाइन"  हे उत्तम उदाहरण आहे. 


दत्तात्रय पटवर्धन 

आजचा सुविचार
आजचा सुविचार


Send Feedback

Thursday, October 2, 2014

0 सबका साथ, सबका विकास          सबका साथ, सबका विकास
          नारा तो है खासम खास
          सुनकर हम तो हुए खलास
          रहते उनके पासम पास II

          बन गए पहले प्रधान सेवक
          जापान जाकर बजाया ढोलक
          राग वहीँ आलापते रहे गायक
          जन, गण, मन अधिनायक II

          जापान से वो लाये बुलेट
          सजाके हम को दे दी प्लेट
          कहांसे लायें पावर-क्रेट?
          बनाना है जो इंडिया ग्रेट II

          जापान से जो हाथ मिलाया
          चीन को कड़वा घूंट पिलाया
          झी जिआंग ने भारत आकर
          अपनाभी सौहार्द जताया II

          अबकी बारी अमरीका की
          न्यूयार्क के मेडिसन गार्डन की
          राजदीप की पालित मिटटी
          ‘मोदी’ नारों ने कर दी छुट्टी II

          चुनावी हार भी झेल रहे थे
          पेट्रोल, डीजल उतर रहे थे
          मूल्य रुपये का सम्हाल रहे थे
          कोंग्रेसी न कुछ बोल पा रहे थे II

          पहले अपना आंगन गूंजा
          अमरीका भी खूब गूंजी
          आँख का तारा सारे जग का
          लाल हमारे तू ही बन जा II

          सदभावनाएँ है साथ तुम्हारे
          तन, मन, और धन भी प्यारे
          बढे चला जा, बढे चला जा
          देशोध्दार के पथ पर प्यारे II


प्रकाश पटवर्धन

आजचा सुविचार
आजचा सुविचार
Send Feedback