Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Wednesday, July 30, 2014

0 मरावे परी अवयव रुपी राहावे ! : भाग ५


एक आगळा वेगळा अनुभव –

    
अवयव दान
मित्रानो, खरं तर आज अवयव दान या मालिकेत ‘किडनी’ संदर्भात पोस्ट टाकायची होती परंतु माझ्या वाचनात नुकतीच चीनच्या शेंझेन प्रांतात घडलेली एक मनाला भिडणारी सत्यकथा आली अन वाटले कि ह्या सत्यकथेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. असो. अन्य रोग-ग्रास्ताचे जीवन अन्यथा नमनाला.....सारखे .
      शेंझेन प्रांतातील टर्मिनलमेंदूच्या कॅन्सरने ग्रासलेल्या अवघ्या ११ वर्षाच्या लीआंग योयीचे स्वत:चे जगणे अशक्य आहे हे माहित असतानाही आपल्यासारख्या अन्य रोग्यांना जीवन देण्याचे सत्कार्य अगदी मृत्युशय्येवर असतानाही कसे करता येईल, ह्याचा एक प्रामाणिक व मानवीय वस्तुपाठच जगासमोर ठेवला आहे. दोस्तहो, हि उदात्तता, मानावाप्रती असलेली कळकळ आणि निर्भयता मृत्युच्या छायेतही दाखवली, हे विशेष.
      मित्रानो, ह्या चिमुकल्या जीवाने जग सोडताना आपल्या जीवन-संग्रामाच्या अखेरच्या टप्प्यावर, तेथील डॉक्टरापाशी आपली अवयव दानाची इच्छा व्यक्त केली तो म्हणाला, जगात कितीतरी मोठी माणसे आहेत, अन मलाही त्यांच्या सारखे मोठे व्हायचे आहे.
     शुक्रवारी ह्या डॉक्टर होण्याची इच्छा बाळगणारा लीआंग योयी देवाघरी गेला. त्वरित डॉक्टरांनी त्याची किडनी आणि लिवर काढण्याची तयारी केली व त्याचे प्रत्यारोपण दुस-या रोग्यांच्या शरीरात केले. जसे लीआंग योयीचे मृत शरीर स्ट्रेचर वरून ऑपरेशन कक्षातून बाहेर काढण्यात आले तसे सर्व डॉक्टर्स तेथे जमले व त्याला स्तब्ध उभे राहून वाकून मनाचा निरोप दिला.
अवयव दान
अवयव दान

ह्या बातमीने व फोटोने जगात उत्फूर्त अशी प्रतिक्रिया उमटली. लीआंग योयीने अखेरच्या क्षणात दाखविलेल्या हिमतीचे व माणुसकीचे कौतुक झाले व त्याने अनुसरलेल्या मार्ग अनेकांना स्पर्शून गेला.

दोस्तहो, जीवनाची सरगम अल्पायुषी आहे, हे माहित असूनही आपण ह्या मर्त्य शरीराचाच विचार करतो. मात्र लीआंग योयीने हि सरगम दीर्घायुषी कशी करता येईल हेच अवयव दान करून दाखवून दिले आहे. ‘केव्हडे हे औदार्य!’

विनम्र सलाम, मुजरा, नमस्कार!

प्रकाश पटवर्धन 

Tuesday, July 29, 2014

0 कबीराचे दोहे : भाग ९

मी आणि बाप्या रस्त्याच्या कडेला कोणाची तरी वाट पाहत उभे होतो, बाजूला एक कुत्रा हाड चघळत होता. पुष्कळ वेळ त्याच ते चघळण चालूच होतं. तुम्ही म्हणाल, ह्यात नवल ते काय? अगदी सामान्य दृश्य आहे, नवीन काही नाही. मी बाप्याला म्हणालो, "बाप्या हे श्वान कोरड हाड केव्हाचं चघळत आहे. त्यात त्याला काय मजा येत असेल, देव जाणे! पण पहा न कसा मन लावून चघळत आहे. चघळून चघळून थकला कि परत दूर जातो आणि थोड्यावेळाने हाडाजवळ परत अन तीच क्रिया.  
         यावर बाप्या उत्तरला, " ते हाड तर सुकलेल आहेच त्यात काहीच रस नाही. परंतु तुला माहित आहे  का, ज्यावेळेस कुत्रा हाड चघळतो तेव्हा त्या कडक हाडामुळे त्याच्या तोंडात जखम होते व तेच  रक्त जिभेला लागत. अन हीच रक्ताची चव त्याला हाड चघळण्यात अडकवून ठेवते. हाडाची पर्यायाने रक्ताची आसक्ती, तृष्णा, यातच कुत्रा अडकून रहातो, हाडरूपी मायाचा त्याच्या मनाला अडकवून ठेवते. 

कबीरदास म्हणतात, 
 
माया मुई न मन मुवा , मरी मरी गया सरीर | 
आसा त्रिष्णा ना मुई, यो कही गया कबीर|| 


        काबिरादासाजी म्हणतात, माया कधी मरत नाही, मन कधी मरत नाही मरतं ते फक्त शरीर  तसेच आशा तृष्णा सुध्धा कधी मरत नाही. जातं ते फक्त शरीर. या आसक्ती मुळेच माणसाचे सुद्धा या पृथ्वीतलावर आवागमन चालू असते. या आवगामानातून मुक्ती मिळावयाची असेल तर त्याला आशा, आसक्ती, तृष्णा यातून मुक्त व्हाव लागेल.  

दत्तात्रय पटवर्धन

Monday, July 21, 2014

0 शायरीच्या दालनात 2


आता निदा फाजलींच्या हा शेर पाहू. ते म्हणतात –

यहीं है जिंदगी कुछ ख्वाब, चंद उम्मिदें
इन्ही खिलोनोसे तुम भी बहल सको तो चलो I

हे आयुष्य घालवण्यासाठी, विरंगुळयासाठी काही तरी हवेच मग हि स्वप्ने असोत वा आशा-आकांक्षा! लहान मुलाना जशी खेळणी लागतात तशी! सारी स्वप्ने अन आशा-आकाक्षांचा खेळ, ज्याला जमला तो जिंकला, न जमला तो हरला.

‘अज्ञात’ शायर सरळ फिलोसोफिकल होत म्हणतो-

ए आशिक जिंदगी क्या है
जिंदगी तखल्लुस है मुहब्बतका I
( १. टोपण नांव – Nickname)

जीवन सफल करण्यासाठी, आपण कबीरदासजींचा ‘ढाई आखर प्रेमका’ उपदेश पाळला पाहिजे, कारण प्रेम, मुहब्बत म्हणजेच जीवन आहे, प्रेमाने सर्व व्यवहार करा व यशस्वी व्हा.

‘असर’ लखनवी मात्र आपल्यालाच मोठ्या खुबीने असा प्रश्न विचारतात कि आपले उत्तरच आपणास उपदेश असेल. हे कसे ते बघू या -


किसी के काम न आए तो आदमी क्या है,
जो अपनी ही फिक्र में गुजरे वह जिन्दगी क्या है?
-'असर' लखनवी

देवा, खरच अश्या आयुष्याचा, अश्या जीवनाचा उपयोग तो काय जर ते आयुष्य वा जीवन दुसऱ्याच्या कारणी, सत्कारणी लागले नाही. साऱ्या जीवनभर आपलीच चिंता करीत राहिलो, स्वत: बद्दल विचार करीत राहिलो तर उपयोग तो काय? एकीकडे सामाजिक प्राणी म्हणायचे अन दुसरीकडे स्वत:च्या पलीकडे विचार सुद्धा करायचा नाही?

तर ‘अज्ञात’ शायर सरळ सरळ आम्हाला उपदेश करतात –

किजीये बर्दाश्त दोनो सुरतें
जिंदगी नगमा१ भी है, नौहां२ भी है I
(१.गीत, २.शोक)

जर आपल्या हाती, आपल्या काह्यात, जन्मणे नाही वा मरणे नाही; कधी हे जीवन संगीतमय, सुस्वर असते तर कधी ते कर्कश्य वा असह्य होते! मर्त्य मानवाचे त्यावर कोणतेही नियंत्रण नाही. मग ह्या दोन्हीही स्थिती सहन करण्या ऐवजी दुसरा पर्याय तो कोणता! दूरदर्शी, बुद्धिमान माणसे म्हणून ह्या दोन्हीही स्थितीत समाधानी राहतात.

राणा सहरी मात्र त्या परमात्म्याला साकडं घालताना म्हणतात कि तू दिलेलं सारं सारं मी नम्र पणे स्वीकारतो. तू दिलेली सर्व दु:खे, त्रास, प्रश्न, इ मी साहण्यास तयार आहे. तू मला माझं अंतिम गंतव्य नको देऊस, काळोखात पथदर्शक दिवा देऊ नकोस, पण न चुकता जीवनाची लढाई लढण्याची हिम्मत तरी दे, काडीचाच कां होईना आसरा तरी दे, ज्यामुळे लढाईला बळ मिळेल.

मंझील न दें, चराग न दें, हौसला तो दें,
तिनके का ही सही, मुझे आसरा तो दें I 
प्रकाश पटवर्धन 


मागे                                                           पुढे

Sunday, July 20, 2014

2 कला जगत : भाग ६ : हॉटेल रवांडा





 “एकीचे बळ” असा नारा देत माणूस समूहाने राहू लागला. अडचणींचा सामना करत जगणं सोपं व्हावं म्हणून समाजाची निर्मिती झाली. भावनिकदृष्ट्या प्रबळ होऊन जगण्यास तेवढाच हातभार. आपण कुठल्यातरी साच्यात बसायला हवे हा अट्टाहास. जगाच्या नकाशावर मी भारतीय एवढीच काय ती ओळख. मी माझ्या देशात कुठेही गेले कि मी अमुक एका राज्याचं प्रतिनिधित्व करते. देशपातळीवर माझ्या धर्माचा विचार केल्या जातो. धर्माची गणितं अगदी सहज चुटकीसरशी सोडवली जातात. आपण अपना पराया हा भेद उघड करू लागतो. मी माझ्या राज्यात हिंडूफिरू लागले तेंव्हा विभाग, जिल्हा आणि सरतेशेवटी माझ्या मुळ गावापर्यंत येऊन ठेपते. गावाच्या वेशीपासून आत प्रवेश केल्यानंतर माझी जात ही माझी ओळख. आपली ओळख कितीही पुसता यावी म्हणून प्रयत्न केला तरी तो तोकडा ठरतो. आपली ओळख जोपर्यंत कुणास ठेस पोहचवत नाही तोपर्यत सगळे आलबेल असते पण जेंव्हा ह्या भेदाची झळ बसते तेंव्हा आपल्याला ही तकलादू ओळख नकोशी वाटते.

धर्म, जात आपल्या जगण्याचा भाग आहे आपलं जगणं नव्हे. माणसाला किमान माणूस म्हणून जगता यावे ही माफक अपेक्षा. काळे, गोरे हा वर्णभेद जगाला अराजकतेच्या सीमेवर पोह्चोवतोय. आज मी अत्यंत संवेदनशील ‘हॉटेल रवांडा’ हा वास्तववादी सिनेमा पाहिला. हॉटेल रवांडा हा अमेरिकन ऐतिहासिक नाट्यमय सिनेमा आहे. ह्या सिनेमाचे दिग्दर्शक टेरी जॉर्ज आहेत. हा सिनेमा रवांडाला १९९४ साली घडलेल्या वंशहत्येवर आधारित आहे.
रवांडा मधील ‘हुटू’ आणि ‘टूटसी’ ह्या दोन जमातींमधल्या संघर्षाचे पर्यावसन युद्धात होते. राजकारणी हे भ्रष्टाचार करण्यात गुंतून पडतात. ‘पॉल रसेसबगीना’ (डॉन केड्ल) हा ‘मिली कॉलिन्स’ ह्या हॉटेलमध्ये म्यानेजर पदावर काम करतो. तो हुटू आहे परंतु त्याची पत्नी तातियाना (सोफी ओकोनिडो) ही टूटसी आहे. हुटू कट्टरवाद्यांचा जॉर्ज रूटगंडा हा स्थानिक नेता पॉलच्या हॉटेलला धान्याचा पुरवठा करत असतो. तो टूटसी लोकांचा भयंकर द्वेष करतो.
देश अराजकतेच्या गर्तेत सापडतो. पॉलच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना नाहक मारून टाकले जाते. पॉलच्या मुलाचा मित्र मारल्या जातो आणि त्याचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात सापडतो. स्वतःच्या मुलावर जीवापाड प्रेम करणारा पॉल हादरतो. युद्ध संपल्यानंतर आर्मीचे लोक एक दिवस पॉल आणि शेजाऱ्यांना त्रास देतात. आपलं घरटे मोडू नये ह्यासाठी तर आपण जीवावर उदार होतो. माझी माणसे जगायला हवीत ह्या विचाराने तो लाच महागडे मद्य भेट देऊन कुटुंबाचा जीव वाचवतो. तो सगळ्यांचे जीव वाचवून त्यांना हॉटेलमध्ये आश्रय देतो.

संयुक्त राष्ट्रसभेच्या कॅम्पमध्ये जागा अपुरी पडू लागते म्हणून माणसांचा लोंढा हॉटेलकडे वाढतो. आपल्या कुटुंबापुरता विचार करणारा पॉल विलक्षण बदलतो. तो आश्रितांची काळजी घेतो जणू प्रत्येकाला वाचवणे तितकेच महत्वाचे. शांतीसेनेचे प्रमुख कर्नल ऑलिवर हे वाटाघाटी करण्यात अपयशी ठरतात. वंशहत्या थांबवणे कठीण होऊन बसते. छोट्या छोट्या टूटसी मुलांना मारण्यात येते जेणेकरून त्यांचा वंश नष्ट होईल. परकीय गोऱ्या लोकांना सहीसलामत सोडवण्यासाठी सेनेची मदत मिळते. फक्त रवांडीयन लोक उरतात लाचार, अगतिक.

तातियाना पॉलला सोडून जा म्हणून विनवते. तो नकार देतो. जियेंगे तो साथ, मरेंगे तो साथ साथ. एका रात्री हॉटेलच्या गच्चीवर तो पत्नीला घेवून जातो. त्याच्या चुकांची कबुली देतो आणि तिला म्हणतो जर हुटू कट्टरवादी ह्या हॉटेलमध्ये शिरले तर इथून उडी मारून जीव दे. तो भावपूर्ण क्षण आपला ताबा घेतो...... शांतीसेना काही लोकांना रेफ्युजी म्हणून देशाबाहेर जाण्यास मदत करते. गाड्यांमधून रेफ्युजी बाहेर पडल्याची बातमी कट्टरवाद्यांपर्यंत पोहचवली जाते आणि त्या सगळ्याना पुन्हा परतावे लागते. पॉल शेवटच्या प्रयत्नात रवांडा आर्मी जनरल ऑगस्टिन बिझीमुंगुला लाच देवू शकत नसल्यामुळे ब्लाकमेल करतो. त्याला युद्धातील गुन्हेगार म्हणून कारवाईची भीती घालतो. सरतेशेवटी तो त्याच्या कुटुंबाला आणि इतरांना सुरक्षित स्थळी हलवतो. पॉल १२६८ लोकांचे प्राण वाचवतो. सिनेमाला आफ्रिकन शिंडलर लिस्ट नाव देण्यात आले. युद्धसंहारामध्ये लक्षावधी लोक मारल्या गेले.  

सिनेमा पाहताना मी कैक वेळा अश्रूंच्या सरींमध्ये चिंब भिजले. मी पार हादरून गेले. मी माझ्या कातडीच्या रंगाचा विचार करू लागले. दंग्यात हजारो निष्पाप लोकांचे असेच बळी गेले असतील. मी उद्याचा दिवस बघू शकणार नाही हे त्यांच्या ध्यानीमनी नसेल. थोड्या वेळात परत येतो असे सांगून  घराबाहेर पडलेला माणूस पुन्हा कधी माघारी फिरला नाही. त्यांची चिमुकली त्यांच्या वाटेकडे डोळे लाऊन बसतात. आपल्या मनात द्वेषाची बीजे कोण पेरत इतके का कमकुवत आहोत आपण. आपण सगळे मिळून देवाला साकडं घालू, बाबा रं माणूस बनून जगू दे.  बाकी काही नको. 


 विजया यादव 


Friday, July 18, 2014

0 कबीराचे दोहे : भाग १०

माझ् लहानपण कुंभारवाड्यात गेले. तेथे कुम्भारांकडे गाढवे असायची जी प्रामुख्याने नदीवरून माती आणत. रात्री कुंभार दोन गाढवांना एकमेकांना बांधून ठेवत अन आश्चर्य असे की सकाळी गाढवे खुंटीला बांधली नसतांही गाढवं तेथेच दिसत, ती कुठेही जात नसत.. आम्हाला खूपच आश्चर्य वाटायचे. एक दिवस तर बाप्याने कुंभार काकाला विचारलेच. गाढवांना खुंटीला  न बांधता एकमेकांना बांधतात. आणि गाढवे रात्रभरात कुठेही जात नाहीत, हे कसे. कुंभार काका बाप्याला म्हणाला, बाप्या, ती गाढवं आहेत. खुंटीला बांधलीत  तर खुंटी सुद्धा तोडून पळतील परंतु एकमेकांना बांधलीत तर  कुठेही जाणार नाहीत. कारण एकाने  उजवीकडे ओढले  तर दुसरा डावीकडे ओढेल अन दोघेही कुठेही न जाता तेथेच राहतील.
आपलीही अशीच स्थिती आहे. आयुष्यभर एकमेकांशी बांधलेलो असतो, एकत्र राहण्याशिवाय तरुणोपाय नाही हे माहित असूनही दोघेही कोणत्याही प्रश्नावर सहमत होत नाही, वादविवाद करण्यात धन्यता मानतो. थांबण्याची तयारी नसते, माझे तेच खरे, म्हणत भांडणात रस घेतो, प्रसंगी एकमेकांवर चिखलफेक करू लागतो. कबीरदास म्हणतात,

पखा पखी  के पेखने, सब जगत भुलाना  
निरपख होई हरि भजे, सो साध सयाना.


आम्ही पक्ष विपक्ष करत बसतो, - कोणी हिंदूचा पक्षधर तर कोणी मुसलमानांचा, कोणी जैनांचा तर कोणी अन्य कोणाचा! आम्ही विसरतो कि निरपेक्षपणे सत्कर्म केल्यास उशिरा का होईना फळ-प्राप्ती होते.  
 एकदा एक युरोपियन विचारक महात्मा गांधीना भेटण्यास आला. तो महात्मा गांधीना म्हणाला, मी तर क्रिश्चन. मी बायबल वाचलंय, मला बायबल पूर्णपणे समजलंय मध्यंतरी मी गीतेचा अभ्यास केला व गीता मला खूप आवडली. मी गीता वाचून इतका प्रभावित झालो कि मला वाटते मी हिंदू धर्म स्वीकारावा. महात्मा गांधी त्यास म्हणाले, " तु परत  जा आणि बायबल चा अभ्यास अजूनही कर. तुला न बायबल समजले आहे न गीता".  ज्याला खरोखरच बायबल वा गीतेचा अर्थ समजेल तो  कबीरदासजीच्या  म्हणण्यानुसार निरपेक्ष होईल, त्याच्या लेखी एकाच परमात्मा असेल, तो सच्चा साधू म्हणून ओळखला जाईल.  
कबीरदास जी म्हणतात कि  पक्षविरहित सत्य काय आहे ते समजलो व सत्याची कांस निरपेक्ष राहून हरीभक्तीच्या स्वरूपात धरली तर ऱ्या अर्थाने ‘सयाना म्हणजेच समजूतदार होऊ. हरिभक्ती तेव्हाच होते जेव्हा तुम्ही हिंदू, मुसलमान, आस्तिक, नास्तिक. इ च्या पल्याड जाता. याच पक्ष विपक्षाच्या विवादाला कंटाळून एक उर्दू शायर म्हणतो,
कोई मंदिर मे जा बैठे ,  कोई मस्जिद मे जा बैठे,
 कोई गिरीजा घर मे जा बैठे.   
अरे हम इंसानो से अच्छे तो परिंदे है 
कभी मंदिर पे जा बैठे तो कभी मस्जिद पे जा बैठे.

 दत्तात्रय पटवर्धन

Thursday, July 17, 2014

0 मरावे परी अवयव रुपी राहावे : भाग ४


लिवर प्रत्यारोपण –

मला वाटते कि अवयव दानासंबंधी आवश्यक माहिती आपण मागील दोन भागात जाणून घेतली आहे. आज आपल्या शरीरातील सर्वात मोठ्या अन महत्वाच्या अवयवाची – लीवरची व त्यासंबंधित रोग व लिवर प्रत्यारोपणाची माहिती घेणार आहोत.

तसे पहिले तर लिवर (3 lbs) मानवी शरीराचा सर्वात मोठा अंतर्गत अवयव असुन पचन संस्थेचा प्रमुख भाग आहे. खाल्लेल्या अन्नाचे पाचनक्रियेपेक्षा कितीतरी जास्त क्रिया लिवर करते. लिवर हे रक्तवाहिन्या (blood vessels), कोशिका (capillaries) आणि चयापाचायी प्रकोष्ठाची (Metabolic Cells) गुंतागुंतीची रचना असून ते शरीरातील पिष्टमय पदार्थ (fats) व लीपिडसचे विभाजन/विघटन करून पचनास मदत करते. कोलेस्टेरॉलची निर्मिती व शरीरात घुसलेल्या हानिकारक द्रव्यांचे शुद्धीकरण आणि शरीरासाठी अनावश्यक असलेल्या गोष्टींची विल्हेवाट लावण्याचे कार्यही लीवर करते.. लीवारला दोन महत्वाच्या रक्तवाहिन्या जोडलेल्या असतात – हेपटीक आर्टरी व पोर्टल वेन – ज्याद्वारे लीवारला रक्त पुरवठा होतो. हेपटीक आर्टरी लीवरला त्याचे कार्य करण्यासाठी व ते स्वस्थ ठेवण्यासाठी आवश्यक असा प्राणवायुमिश्रीत रक्ताचा पुरवठा करते तर पोर्टल वेनद्वारे पचलेले अन्नकण असलेल्या रक्ताचा पुरवठा करते व लिवर पचलेल्या अन्नकणावर प्रक्रिया करून शरीराला आवश्यक अशी कर्बोदके, अमिनो आम्ले व विष्टा वेगळी करते. वेगवेगळ्या आवश्यक रसायनांची (chemicals) निर्मिती चायापाचायी प्रकोष्ठात होत असते. हि सारी द्रव्ये ज्या ठिकाणी जमा केली जातात त्यांना लोबुल्स म्हणतात व असे हजारो लोबुल्स लिवर मध्ये वेगवेगळ्या द्रव्यांचे उत्पादन व फिल्टरेशनच्या कार्यात व्यस्त असतात. अशी अनेकानेक वेगवेगळी कार्ये करणारे लिवर रोगिष्ठ झाले वा निकामी झाले तर..........

लिवरचे त्रास/दुखणी – काही ठळक खुणा व लक्षणे:

o काविळीची लक्षणे;

o अशक्तता वा थकल्यासारखे वाटणे;
o भूक न लागणे;

o खाजणे वा सि-होसीस;

o वजन घटणे;

o खरचटणे व रक्तस्राव सहज होणे;

o पोटात रक्तस्राव होणे;

o काळ्या रंगाची परसाकडेस होणे;

o पोटास सूज येणे.

सिर्होसीस हे प्रौढ व्यक्तीमध्ये लिवर प्रत्यारोपणाचे सर्वसाधारण कारण आहे. रोगांचा प्रादुर्भाव, सिर्होसीसचा त्रास चांगल्या स्वस्थ लिवरला नष्ट करण्यास प्रवृत्त करतात. उदाहरणार्थ,

Ø हेपेटाइटिस बी चे दीर्घकालीन संक्रमण;

Ø अल्कोहोलचे दीर्घ सेवन;

Ø ऑटोइम्यून लिवर रोग;

Ø हेपेटाइटिस सी चे दीर्घकालीन संक्रमण;

Ø लीवरमध्ये चरबीची वाढ;

Ø लीवरचे अनुवांशिक रोग.

तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती नेहेमी स्वास्थ्याला हानिकारक बेक्टेरिया, व्हायरस सारख्या विषाणूशी लढा देत असतात. लीवरचे ऑटोइम्यून रोग म्हणजे ह्या प्रतिकारशक्तीने लिवरला शरीराचा भाग न मानता बाह्य अंग मानून त्याचा प्रतिकार करणे – त्यावर हल्ला करणे, होय तर अनुवांशिक रोग हे मात्या-पित्याकडून मुलांत आलेले आजार होत.

प्रत्यारोपण म्हणजे शस्त्रक्रियेने खराब झालेले लिवर काढून त्याजागी दुस-या व्यक्तीचे लिवर स्थापित करणे होय.

प्रत्येक प्रत्यारोपण केंद्राचे आपले नियम असतात व त्याप्रमाणे लिवर प्रत्यारोपण होते. परंतु जर आपण खालील पैकी कोणत्याही एका गटात मोडत असाल तर प्रत्यारोपणाची शक्यता कमी कमी होत जाते –

· लीवेरच्या बाहेर पसरलेला कॅन्सर;

· सिरिअस हृदय व लंग्स चे आजार;

· अल्कोहोल किवा ड्रग्स च्या सवयीचे दुष्परिणाम;

· कोणतेही सिरिअस इन्फेक्शन;

· एड्स;

प्रत्यारोपण आवश्यक असलेल्या रोग्याचे नाव राष्ट्रीय वेटिंग लिस्टवर ठेवताना ब्लड ग्रुप, बॉडी आकार आणि लिवर प्रत्यारोपणाची निकड, इ. विवरण दिले जाते. त्यात मृत्यूच्या समीप असणाऱ्या व प्रत्यारोपणाची गरज असणाऱ्याची नावे सर्वात वर असतात.

लिवर शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असून ती जवळपास १२ तास घेते व सामान्य (general) अनेस्तीया देऊन केली जाते. रोग्याला अश्या शस्त्रक्रियेनंतर एक ते दोन आठवडे तर आपली लिवर देणाऱ्या व्यक्तीला/डोनरला एक आठवडा हॉस्पिटलमध्ये राहावे लागते.


The details given in these articles are purely to provide basic information to the people and to support the movement of organ donation. The concerned may, therefore, get in touch with experts in the field.


प्रकाश पटवर्धन

मरावे परी अवयव रुपी राहावे : भाग ३
मरावे परी अवयव रुपी राहावे : भाग 2
मरावे परी अवयव रुपी रहावे : भाग १

Tuesday, July 15, 2014

0 कला जगत : भाग ४ : व्हेअर इगल्स डेअर

मित्रांनो,

मागच्या आठवड्यात मी कामांच्या घाईगडबडीत पुस्तकांविषयी लिहायचे राहून गेले. एवढ्या मोठ्या चुकीला शिक्षा मिळाली पाहिजे असे एका जाडजुड पुस्तकाने निषेधपर पत्रके वाटून आवाहन केले. काहींनी ह्यात हो चा सूर आळवून माफीनामा मागितला. काहींनी कट्टी करण्याची भीती दाखवली, काहींनी शेल्फमधून धपाधप खाली उड्या मारल्या, मला नेमके काय करावे ते सुचेना. म्हणून प्रथम माझ्या प्रिय पुस्तकमित्रांची माफी मागते हवं तर माफीनामा प्रसिद्ध करते पण बाबांनो असे रागावू नका. कान पकडून सॉरी.......

प्रत्येक माणूस वेगळा म्हणून माणसाच्या वाचनातील आवडीनिवडी भिन्न असणार हे मला ठाऊक आहे. रहस्यमय कादंबऱ्यांचा एक विशिष्ट चाहतावर्ग असतो. सुरुवातीपासून शेवटापर्यंत उत्कंठा ताणून धरलेली असते. आपण पुस्तक वाचताना बांधलेला अंदाज खरा ठरला तर त्यात काही मजा उरत नाही. रहस्य हे सहजासहजी उलगडता येणार नाही अश्या पद्धतीने कथा गुंफलेली असते. अलीस्टेर म्याक्लीन ह्या स्कॉटिश लेखकाचे ‘व्हेअर इगल्स डेअर’ पुस्तक नुकतेच वाचण्यात आले. पुस्तक हातात घेतले आणि समोर काहीच दिसेना. वेगवान घडामोडी, रहस्य आणि उत्कृष्ट कथानक ह्या जमेच्या बाजू. वाचकांच्या मनावर जबरदस्त पकड निर्माण करण्यात लेखक कमालीचा यशस्वी ठरला आहे.

दुसरे महायुद्ध सुरु असते, थंडीच्या मौसमात एका रात्री ब्रिटीश स्पेशल फोर्सकडून सात माणसे आणि एक महिला ह्या सर्वांची एक एक टीम शिखरावर जर्मनीजवळ उतरवण्यात येते. ह्या मोहिमेचा एक गुप्त हेतू असतो कि सहजासहजी पोहचू न शकणाऱ्या “कॅसल ऑफ द इगल” ह्या जागी आणि जर्मनीच्या गुप्त हेडक्वार्टरमध्ये जाऊन अमेरिकन जनरलची सुटका करायची असते. अमेरिकन जनरल हा जर्मनीच्या ताब्यात असतो आणि त्याची उलटतपासणी घेतली तर त्याने ‘डी – डे’ चा प्लान सांगू नये म्हणून मोहीम आखली जाते. सार्जंट हर्रोड, लेफ्टनंट स्क्याफेर, कर्रकिओला, स्मिथ, क्रिस्तीयांसन, टोरेंस, स्मिथी आणि एलीसोन प्याराशुटने शिखरावर उतरतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत ही टीम मोहिमेस सज्ज होते. मोहिमेविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात येते.

प्याराशूटने उतरले कि कुणीतरी हर्रोडचा खून करतो. त्या पाठोपाठ आणखी दोन जणांचे खून होतात. मोहीम मोडून काढण्यासाठी शत्रुपक्ष जबाबदार आहे कि कुणी घरचा भेदी आहे जो नकळत शत्रूशी मिळालाय?.धाडशी मोहीम सहजासहजी पार पडणार नाही. प्रत्येक जण प्रचंड तणावाखाली वावरतो आणि खरी मोहीम अत्यंत गुंतागुंताची होऊन बसते. विश्वास कुणावर ठेवावा कि नाही हेच प्रत्येकाच्या डोळ्यात दिसू लागते. मोहीम यशस्वी होते कि नाही जनरलची सुटका होते का? आणि कटकारस्थाना मागचा खरा सूत्रधार कोण असतो हे जाणून घेण्यासाठी आवर्जून वाचा ‘व्हेअर इगल्स डेअर’.

पुढच्या आठवड्यात पुन्हा मी नवीन पुस्तकासोबत तुमच्या भेटीला येईन तोपर्यंत वाचा खा, प्या, आणि मस्त मजा करा.

तुमची सखी

 विजया यादव. 

Sunday, July 13, 2014

0 वळून पाहताना :भाग १२




पाकिस्तानच्या आय.एस.आय. ने लष्कर आणि जैसे मोहम्मद या अतिरेकी संगठनाना हाताशी धरून आयोजिलेला भारतीय संसदेवरील  डिसेंबर १३, २००१ ला केलेल्या हल्ल्यात पांच अतिरेकी पांढऱ्या अम्बेसेडर गाडीतून संसदेच्या परिसरात घुसले व गोळीबार सुरु केला. ह्यावेळी संसदेचे कार्य ४० मी करिता तहकूब करण्यात आलेले होते. तत्कालीन गृह मंत्री व काही अधिकारी सदनात उपस्थित होते. त्यानंतर सुरु झालेल्या गोळीबारात एकूण   - पांच आतंकवादी, ५ पोलीस, एक संसदेचा गार्ड व माळी मृत्युमुखी पडले तर १८ जण जखमी झाले.

       अतिरेक्यांच्या पाशी मिळालेल्या मोबाईल, पत्रके, इ वरून त्यांच्या सहकाऱ्याचा शोध घेण्यात आला व ते डिसेंबर १५ ला  काश्मीर मध्ये पोलीसाकरर्वी जेरबंद केले गेले. ह्या तपासात सहकाऱ्याची नावे पुढे आली – अफजल गुरु, शौकत हुसेन, एस.ए.आर. गिलानी, आणि नवजोत संधू ए.के.ए.अफसान.
       में २००२ मध्ये सी.पी.सी.च्या कलम १७३ अन्वये रिपोर्ट दाखल करण्यात आला. ही ९० साक्षीदार( ८० फिर्यादी तर १० बचाव पक्षाकडून) व जवळ जवळ ३०० वेगवेगळ्या कागदपत्रे असलेली केस विविध कायद्याच्या अनेक कलमानुसार ट्रायल कोर्टात चालली व सहा महिन्याच्या कालावधीत केस निकाली निघाली. नवजोत संधू ए.के.ए.अफसानला एका आरोपाखाली पांच वर्षाची सक्तमजुरी व दंड ठोठावण्यात आला तर उरलेल्या सर्वांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. तसेच त्यांच्या कडे मिळालेले सुमारे १० लाख रुपये ‘पोटा’ च्या कलम ६ खाली सरकार खाती जमा करण्यात आले.

उच्च न्यायालयात अपिलात गीलानीला निर्दोष ठरविण्यात आले तर अफजल गुरु व शौकत हुसेनचा खालच्या कोर्टाचा निर्णय ग्राह्य धरण्यात आला. उच्चतम न्यायालयाने अपिलावर शौकत हुसेनच्या शिक्षेत बदल करून ती १० वर्षाच्या सक्तमजुरीत बदलली तर अफजल गुरुची मृत्युदंडाची शिक्षा कायम केली गेली. गीलानीला १० वर्षाची शिक्षा पूर्ण होण्याआधी ९ महिने आधी चांगल्या वर्तणुकी साठी सोडण्यात आले.

अफजल गुरु ने त्यानंतर मा.राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज केला होता व तो फेटाळला गेल्यावर फेब्रुवारी ९, २०१३ ला तिहार जेलमध्ये त्याला फासावर लटकाविण्यात आले व नंतर पूर्ण धर्मिक इतमामाने दफनाविण्यात आले.    

       आदल्या रात्री सर्व तयारी केलेली होती जेव्हा त्यांना एक लेपटोप (जो परतल्यावर गाझी बाबाला द्यायचा होता – हाच गाझी बाबा काही दिवसापूर्वी नेपाळच्या सीमेवर दिल्ली पोलिसांनी जेरबंद केल्याचे आठवत असेलच) व १० लाख रुपये देण्यात आले. त्यांच्या जप्त केलेल्या मोबाईलवरून स्पष्ट झाले होते कि ते अफजल गुरूच्या सतत संपर्कात होते. हा संसदेवरील हल्ला अमेरिकेच्या ९/११ च्या हल्ल्य सारखाच गंभीर होता. नशिबाने थोडक्यात निभावले!

       आमच्या इंटेलिजन्सची अकार्यक्षमता तसेच असफलता व टेक्नोलोजिकल विकासाची आवश्यकता वेळोवेळी स्पष्ट झाली आहे. नजीकच्या काळातील हा सर्वात धाडसी आतंकी हल्ला मानला जातो ज्यामुळे भारत व पाकीस्थान हे दोन्ही देश युद्धाच्या तयारीने समोरा समोर उभे ठाकते होते.

       हा सूडाचा प्रवास येथेच संपत नाही तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर हल्ला करण्याचा कुटील डावही पाकने आखला होता. तो पुढच्या वेळी बघू. 

प्रकाश पटवर्धन 



0 वळून पाहताना : भाग ११




आज आपण गुजराथच्या कच्छ प्रांतातील एका ९० कि.मी. म्हणजेच ६० मैलाच्या दलदलीच्या (marshland) तुकड्याचा इतिहास पहाणार आहोत. हा प्रश्न भूमापन प्रकारात मोडतो व त्यामुळे टेक्निकल बाबीचा असल्याने साध्या-सरळ सर्वांना कळेल अशा शब्दात, टेक्निकल संदर्भ वगळून सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. हा विवाद सन १९०८ च्या सुमारास प्रथम: मुंबई इलाख्यातील कच्छ आणि सिंध प्रांतांच्या राजांत उद्भवला व मुंबई इलाखायाच्या सरकारने सन १९१४ला दिलेला निर्णय दोन्ही राजांनी मान्य केला.

     सन १९६५ च्या युद्धानंतर हा प्रश्न पाकीस्थानाने पुन्हा उकरून काढला व दोन्ही देशानी आपापले मुद्दे मांडले. अंती हा प्रश्न आंतरराष्ट्रीय लवादाकडे वर्ग करण्यात आला व तत्कालीन ब्रिटीश प्रधानमंत्री, हेराल्ड विल्सन याच्या पुढाकाराने सन १९६८ मध्ये लवादाचा निर्णय झाला ज्यात पाकीस्थानला विवादित भूमीच्या(९००० स्क्वे.कि.मी.) १०% भूमी ( ५,५०० स्क्वे.कि.मी.) देण्यात आली.

     सन १९६९ पासून १२ वेळा द्विपक्षीय चर्चाच्या फेऱ्या झाल्या असल्या तरी हा प्रश्न अनिर्णयीत आहे. अजूनही दोन्ही देशांच्या ह्या प्रांतातील सीमा निश्चित केल्या नसल्यामुळे मासेमारी नौका व मच्छीमार एकमेकांच्या हद्दीत अनधिकृतपणे प्रवेश केल्यामुळे पकडले जात आहेत. तसेच समुद्र किनाऱ्यापासून २०० नोटीकल मैलाच्या (३७० कि.मी) क्षेत्राचा व्यावसायिक/व्यापारी उपयोग (EEZs) करता येत नाही.  सन १९९९ ला कारगिल युद्धाच्या एखाद महिन्यानंतर, भारतीय वायुसेनेने पाकिस्थानी १६ कर्मी असलेल्या टेहेळणी विमानाने भारतीय हवाई हद्दीचा भंग केल्यामुळे, पाडले होते तेव्हा बरीच तणावाची स्तिती उत्पन्न झाली होती.

      सियाचेन व सर क्रीक ह्या दोन प्रांतांच्या संबंधात काही बाबी समान आहेत उदा., दोन्ही प्रांत निर्मनुष्य आहे. दोन्ही प्रांतात नैसर्गिक तेल व वायू साठे असल्याची संभावना असल्याने दोन्ही देश इंच इंच भूमी लढवत आहेत. असो. 

प्रकाश पटवर्धन