Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.
Showing posts with label kabir vani. Show all posts
Showing posts with label kabir vani. Show all posts

Saturday, August 2, 2014

0 कबीराचे दोहे : भाग १२

Kabir doha

मी आणि बाप्या रोज सकाळी फिरायला जातो. दिल्ली निवडणुका चा काळ होता. प्रत्येकाच्या तोंडावर निवडणूक हाच विषय होता. त्यातल्या त्यात अरविंद केजरीवाल  म्हणजे प्रत्येकाचा आवडता विषय.
बाप्या म्हणाला, "३०-४० वातानुकुलीत लावून थंड झालेल्या शीला दीक्षित सरकारला कोणी सत्तेवर बसवण्यास तयार नाही.  मग आता उरले आहेत दोनच पक्ष आप  आणि भाजप."

मी म्हणालो," बाप्या, यात कोणता पर्याय योग्य. भाजप तर तसा जुना पक्ष, अनुभवलेला. अरविंद केजरीवाल  नवीन आणि तडफदार, इमानदार. प्रयत्न करायला हरकत नाही. नाहीतरी आपण आजपर्यंत प्रयत्नच करीत होतो ना ?"
बाप्या म्हणाला," काहीच हरकत नाही परंतु जनता मात्र एखाद्या घडाळ्याच्या लंबाका प्रमाणे भाजप आणि आप या दोन टोकांकडे  हेलकावे घेत आहे."  "बघावे निवडणुका झाल्यावर काय होते ते!"

ठरल्या प्रमाणे निवडणुका झाल्या आणि निकाल लागला. नियमा नुसार घडाळ्याचा लंबक मध्यावर येउन थांबला. कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल नाही.

बाप्या म्हणाला, " आतातर गंमतच झाली. शीला दीक्षित सरकार तर ठरल्याप्रमाणे थंड बस्तानात जाऊन पडली. आप आणि भाजप मध्यावर येउन थाबली." "आता काय होईल ? पुन्हा निवडणुका कि अजूनकाही ----"

मी म्हणालो, " राजकारणात काय घडेल हे देवालाही सांगणे कठीण. कॉंग्रेस आप ला समर्थन देईल आणि पुन्हा  निवडणुकीचा खर्च होऊ नये म्हणून आम्ही असे करतोय,  त्याबद्दल शेखी मिरवतील." "कॉंग्रेस मात्र, ज्या केजरीवालांनी  भ्रष्टाचारी, लुच्चे लफंगे या पदव्या दिल्या, त्यांनाच खांद्यावर बसवून मुख्यमंत्री पदावर बसवतील आणि केजरीवाल  ते मान्य करतील."

पुढे घडले तसेच. केजरीवाल  मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी जादूची छडी फिरवावी आणि सर्व कामे व्हावीत अशा थाटात कामास सुरवात केली. पाण्याचा मुद्दा हातात घेतला, लगेचच वीज पुरवठ्याचा मुद्दा घेतला. त्याच बरोबर लोकपाल विधेयक टेबल वर आणले असे अनेक मुद्दे  एका झटक्यानिशी  हातावेगळी करण्याचा प्रयत्न केला.    मग काय व्हायचे तेंच झाले. एक ना धड भाराभर चिंध्या. सत्ता सोडून जावे लागले. एकही कार्य पूर्ण झाले नाही.

यावर मी बाप्याला म्हणालो मला एक कथा आठवते., " एकदा एका माकडांच्या समूहाने ठरवले कि आपण शेती करायची. मानवाने जंगल तोड केल्यामुळे आपल्याला अन्नाचा तुटवडा होतो. (राजकारण काय फक्त कॉंग्रेस आणि भाजप नेच करायचे?) त्यांनी जमीन मिळवली व  नांगरली. त्यात पेरणी केली. परंतु दुसऱ्याच दिवशी त्यांनी माती उकरून पाहिली कि कोंब फुटले का? पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच. कोंब फुटण्याची इतकी घाई झाली कि रोजरोजच्या उकराण्याने ती बीजे अंकुरित झाली नाहीत आणि नष्ट झाली. " "असेच काहीसे केजरीवाल  यांच्या बाबतीत झाले."

बाप्या म्हणाला, "आमचा कबीर दास जर यांनी वाचला असता तर नक्कीच शहाणपण आलं असतं,"

"कबीरदास म्हणतात,              धीरे धीरे रे मना, धीरे सबकुछ  होय |                          
                                               माली सींचे सौ घड़ा, ऋतु आए फल होय  ||

कबीरदासजी म्हणतात, अरे मना  ( मन खुप चंचल असल्यामुळे मनाला उद्देशून) जरा धीर धर , इतका अधीर नको होउस. माळ्याला शंभर घडे पाणी द्याव लागतं. देखभाल करावी लागते. वाट पहावी लागते तेव्हा कुठे ऋतू (योग्य वेळ ) आल्यावर  त्या वृक्षांना फळ येत.

असा हा कबीर दोहा आमचे केजरीवाल यांनी  आत्मसात  केल्या असत्या तर त्यांच्यावर असा विदारक प्रसंग उद्भवला नसता.
दत्तात्रय पटवर्धन 

Tuesday, July 29, 2014

0 कबीराचे दोहे : भाग ९

मी आणि बाप्या रस्त्याच्या कडेला कोणाची तरी वाट पाहत उभे होतो, बाजूला एक कुत्रा हाड चघळत होता. पुष्कळ वेळ त्याच ते चघळण चालूच होतं. तुम्ही म्हणाल, ह्यात नवल ते काय? अगदी सामान्य दृश्य आहे, नवीन काही नाही. मी बाप्याला म्हणालो, "बाप्या हे श्वान कोरड हाड केव्हाचं चघळत आहे. त्यात त्याला काय मजा येत असेल, देव जाणे! पण पहा न कसा मन लावून चघळत आहे. चघळून चघळून थकला कि परत दूर जातो आणि थोड्यावेळाने हाडाजवळ परत अन तीच क्रिया.  
         यावर बाप्या उत्तरला, " ते हाड तर सुकलेल आहेच त्यात काहीच रस नाही. परंतु तुला माहित आहे  का, ज्यावेळेस कुत्रा हाड चघळतो तेव्हा त्या कडक हाडामुळे त्याच्या तोंडात जखम होते व तेच  रक्त जिभेला लागत. अन हीच रक्ताची चव त्याला हाड चघळण्यात अडकवून ठेवते. हाडाची पर्यायाने रक्ताची आसक्ती, तृष्णा, यातच कुत्रा अडकून रहातो, हाडरूपी मायाचा त्याच्या मनाला अडकवून ठेवते. 

कबीरदास म्हणतात, 
 
माया मुई न मन मुवा , मरी मरी गया सरीर | 
आसा त्रिष्णा ना मुई, यो कही गया कबीर|| 


        काबिरादासाजी म्हणतात, माया कधी मरत नाही, मन कधी मरत नाही मरतं ते फक्त शरीर  तसेच आशा तृष्णा सुध्धा कधी मरत नाही. जातं ते फक्त शरीर. या आसक्ती मुळेच माणसाचे सुद्धा या पृथ्वीतलावर आवागमन चालू असते. या आवगामानातून मुक्ती मिळावयाची असेल तर त्याला आशा, आसक्ती, तृष्णा यातून मुक्त व्हाव लागेल.  

दत्तात्रय पटवर्धन

Tuesday, May 13, 2014

2 कबीराचे दोहे भाग ४



काल बाप्या असाच फिरत फिरत घरी आला. जरा आनंदातच दिसत होता.चहा पिता पिता म्हणाला, “एक कोडं विचारू का?”.  मी म्हणालो, “अरे बाप्या, तू स्वताच एक कोडं आहे रे. मला अजून किती कोड्यात टाकशील. तुझी केमिस्ट्री समजणे अगदी कठीण.” 
मला अनुभवाने माहित होत की हा काही ऐकणार नाही, मलाच ऐकावं लागेल. म्हणून म्हणालो, “सांग” 
बाप्या म्हणाला, " एक मासा दुसऱ्या माशाला काय म्हणाला असेल?" 
मी म्हणालो, " भलतच काय! घेऊन तर नाहीस ना आला.".
हा असा इब्लीस बाप्प्या! दिसायला साधा सरळ पण कधी सरळ चेंडू टाकेल तर कधी क्यारम चेंडू टाकेल याचा नेम नाही. तो घरात असे पर्यंत माझ, “काय विचारेल, काय विचारेल” असं चाचपण सुरु असतं. अन एकदा गेला की, “हुश्श!”. माझा शाळेत दरारा पण, येथे...  नेहमी प्रमाणे, मी काही तरी उत्तर द्यायचं अन त्यान वितभर छाती फुगवून, एखाद्या कसलेल्या टी.व्ही. वरच्या अन्कर सारखा खर्जातील आवाजात, “आणखी एक चान्स” म्हणायचे,. त्यापेक्षा सरळ शरण येणे मी आज पसंद केले, अगदी “विना-अट शरणागती!”       
मला माहित होतं याच्या प्रश्नाचं अपेक्षित उत्तर देता येणार नाही म्हणून मी विचार करण्याचा प्रयत्नच न करता शरणागतीचा मार्ग अनुसरला.
बाप्या.मग विजयी मुद्रेने म्हणाला, “ऐक मीच सांगतो,  अरे एक मासा दुसऱ्या माशाला काय वेगळं सांगणार. तो मासा दुसऱ्याला म्हणाला, “तू जर तोंड वंद ठेवलस तर कधीहि गळाला अडकणार नाहीस.” 
 
एखाद्या तत्ववेत्याच्या शैलीत तो विग्रजीत पुढे बोलता झाला,"If you keep your mouth shut, you will never get caught."  माझ्याकडे मोहरा वळवत तो म्हणाला, “ आपलही असच आहे. माणसाने तोंड उघडल रे उघडल कि काही घोटाळा होण्याची शक्यता निर्माण होते – मग ते बोलण्यासाठी असो की खाण्यासाठी.” बाप्प्याचे हे बोलणे मला जरा जास्तच वाटले. मी त्यला म्हणालो,”काहीतरीच काय बोलतोस! खाण्यासाठी तोंड उघडल्याने काय मोठे आभाळ कोसळणार आहे. असल्या फालतू प्रश्नाला अडखळेल तो बाप्प्या कसला! एखाद्याने Point Blank वरून सरळ खोपडीत गोळी घालावी तश्या पद्दतीने त्याने माझ्या तोंडावर धडधड वाक्ये फेकली, “हे आता कळणार नाही, पण जेव्हा एखादा डॉक्टर तुम्हाला ‘मीठ किवा साखर खाऊ नका’ असे सांगेल, तेव्हा एव्हढासा चेहराकरून घरी याल अन वाहिनीना म्हणाल, ‘बाप्प्याच तेव्हा ऐकलं असत तर बर झालं असत. पण वेळ गेलेली असेल. तेव्हा सावध व्हा. तोंडावर नियंत्रण ठेवायला शिका म्हणजे कधीही अशी विचित्र परिस्थिती निर्माण होणार नाही.”

काही तरी बोलायचं म्हणून मी म्हणालो, “अरे  बाप्या, तोंड अगदी बंद ठेऊन कसे चालेल. खाण्यापिण्यासाठी का.... मला मध्येच थाबवत तो शांतपणे म्हणाला, " कधी कबीर वाचला आहेस का?”  आधीचा अनुभव लक्षात घेऊन मी पुन: चूप रहाणेच पसंद केले. थोड्यावेळाने  उत्तर येत नाही असे पाहून तो स्वत:च उत्तरला, “कबीरदास म्हणतात –


ऐसी वाणी बोलिये, मनका आपा खोल,
औरन को सितल करे, खुदही सितल होय|
 
      मी ह्या प्रश्नोतराने वैतागत बोललो, “बाप्प्या, आज काय माझा पोपट करायचं ठरवून आला आहेस काय? मासा काय, कबीरदास काय! सगळ कसं डोक्यावरून जात, अन तू इकडे अर्थ सांगत बसलायस.” तर हा माझ्या त्राग्याकडे कानाडोळा करीत बोलला,”अरे अशा वाणीचा उपयोग करा ज्यामुळे दुसऱ्याच मन शांत होईल,  ऐकणाऱ्याच्या मनात आनंद येईल - न कि त्याच्या मनात कडवेपणा, द्वेष, क्रोध, भाव जागृत होईल.” एक सुस्कारा सोडून बाप्प्या पुढे म्हणाला, “तुमचा दोष नाही, तुम्हाला कबीरदास, रामदास, इ सारखे संत कळत नाही कारण तुम्हाला हवी असतात पाश्चिमात्य पुस्तके, 'How to win friends',  'How to influence people', How to ---.अरे इथे साक्षात ज्ञानरूपी-काऊ(Cow) उभी असताना तुम्हाला हाऊ(How) कसे सुचते तेच काळात नाही.”  
 
     बाप्प्या खर बोलत होता. आम्ही डेल कार्नेजी वाचतो पण, संतवचने वाचण्यात कमीपणा समजतो. आज वाटायला लागले की बाप्प्या असाच रोज यावा म्हणजे रोज एक दोहा/श्लोक तरी कानावर पडेल. मनोमन मी वाकून बाप्प्याला दंडवत घालता झालो.



आपल्या प्रतिक्रिया नमूद करा.
दत्तात्रय पटवर्धन 

Sunday, May 11, 2014

2 कबीराचे दोहे भाग 2

आपल्या समाजात प्रवाहाच्या विरुध्द जाणाऱ्या प्रत्येक सुधारकाला अनेक संकटाना सामोरे जावे लागले आहे. मग ते ज्ञानेश्वर , तुकाराम, कबीर,मीरा , फरीद, व सोक्रेटीस व ग्यलेलिओ. या मंडळीना रूढीवादी लोकांना आपले म्हणणे /तत्वज्ञान कसे खरे आहे, सत्य आहे हे समजावताना आपला बळी द्यावा लागला आहे.
कबीरदासजी म्हणतात : -   

" साधो देखो जग बौराना,
साची कहे तो मारन धावे झुटे जग पतीयाना".
हे जग किती विचित्र आहे न!! खरं सांगितले कि मारायला धावते आणि खोट्याला जवळ करते. सत्य, वास्तविकता दाखवणाऱ्या वर रोष ओढवते तर खोट्यावर विश्वास ठेवते.जणू खऱ्याला कोणी वालीच नाही. आजच्या युगात सर्वधर्म समभाव थोड्याफार फरकाने कबीरदासजींच्या वरील उक्तीचे समर्थनाच करतो न!!
एकदा एका गुरूने आपल्या दोन शिष्यांना पाय चेपण्यास सांगितले. एकाने डावा  पाय तर दुसऱ्याने उजवा पाय दाबायला सुरवात केली. दोघेही गुरुचे सच्चे भक्त असल्यामुळे गुरुचे पाय मोठ्या आनंदाने व तन्मयतेने चेपत होते. एव्हड्यात गुरूने कूस बदलली व त्यांचा डावा पाय उजव्या पायावर पडला. उजवा पाय दाब्णाऱ्या शिष्यास आता पाय नीट चेपण्यात डाव्या पायाचा अडसर येऊ लागला म्हणून त्याने दुसऱ्या शिष्यास गुरूचा  उजवा पाय हलविण्यास सांगितले.  गुरूच्या सेवेत अडथळा येऊ नये म्हणून उजवा पाय दाबणार्या शिष्याने नकार दिला. आता दोघांमध्ये बाचाबाची सुरु झाली व ती शेगेला पोहोचण्यास वेळ लागला नाही. दोघांनी काठ्या उचलल्या. प्रथम डावा पाय दाबणार्या  शिष्याने गुरूच्या उजव्या पायावर प्रहार  केला. उत्तरादाखल उजवा पाय दाबनार्याने त्याच्या डाव्या पायावर प्रहार केला. मोठा विचित्र प्रकार होता. गुरूची सेवा डोळे झाकून केल्याने रूढीवादी व्यक्ती सारखे आंधळे झाले होते. त्यांच्या डोळ्यावर सेवेचा भ्रामक पडदा होता.
कबीरदासजी पुढे  म्हणतात, 
"हिंदू कहत है राम हमारा, मुसलमान रहेमाना,
                                                आपस मे दोउ लडे मरत है मरम न कोई जाना"
येथे कबीराला हिंदू आणि मुसलमान हे दोन प्रतिक आहेत. ते सर्वच धर्मांना उद्देशून म्हणतात. हिंदूंचा राम अन मुसलमानांचा रहेमान -- अगदी गुरूच्या डाव्या  व उजव्या पायाप्रमाणे! यावरून दोघे वाद घालतात, भांडतात. वेळ आली तर मारतात व मरतात . दोघेही मर्म जाणून घेत नाहीत. अरे मंदिर काय व मस्जिद काय, त्या परमात्म्याचाच घर न? धर्माच मर्म सांगत सांगत सारे संत महंत आले-गेले पण आम्ही एकमेकांच्या धर्माचे वाभाडे काढण्यात धन्यता मानतो. "ढाई आखर प्रेम का पढे सो पंडित होय" ,  "खरा तो  एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे" असा प्रेमाचा महिमा सारेच गाताना दिसतात पण त्याचा खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करीत नाहीत. प्रेमात समर्पण भावना असते. दुसऱ्यासाठी प्राण द्यावे लागतात, प्राण घ्यावे लागत नाहीत.
सद्य परिस्थिती पाहून तर एक उर्दू शायर मोठ्या कष्टाने म्हणतो,
"कितनी नफ़रते है तास्सुब (communal ) कि हमारे दिलो मे,
हमे थोडी समज देता तो अच्छा होता,
परिंदे तो आपस मे बैर नही करते,
खुदा तू इस दुनिया को चिडियाघर बना देता तो अच्छा होता."

नवयुगात माणूस खोल समुद्रात, उंचच उंच आकाशातच नाही तर चंद्रावर घर  करण्याच्या विचारात आहे. विज्ञानाने आम्हाला प्रगतीच्या वेगवेगळ्या स्तरावर नेले असले तरी माणसातील माणुसकी जिवंत ठेऊ शकलेला नाही. दृष्टांताच्या शब्दात सांगायचे तर ---  एक संत भर दिवसाहि हातात मशाल घेऊन फिरत असे. त्याला लोकांनी विचारले कि इतक्या भर दिवसा सूर्यप्रकाशात हातात मशाल घेऊन का फिरत आहात?  संताने उत्तर दिले, 'मी माणसाच्या शोधात आहे. मला कोठेही माणूस आढळत नाही"

घरो पे नाम थे, नामो के साथ ओहदे थे,
बहुत तलाश किया , फिरभी आदमी न मिला. 

 दत्तात्रय पटवर्धन 

1 कबीराचे दोहे भाग 1

एका राजमहालातील एक पाल, मोठ्या आनंदात राजमहालाच्या छतावर विहरत होती. राजमहालाचे   ऐश्वर्य, राजमहालाच सौंदर्य याचा आनंद लुटत होती. दुसरी पाल बाहेरून आली आणि त्या पालीला म्हणाली, “चलतेस का सिनेमाला?” पहिली पाल रागाने म्हणाली, “तुला कळत नाही, मी छत सांभाळून आहे. मी सिनेमाला आली तर हे छत कोण सांभाळणार?”
बरोबर आहे!! बैलगाडीच्या खालून चालणाऱ्या कुत्र्यालाही असेच वाटते कि तोच गाडी चालवत आहे. हा दोष त्याचा नाही त्याच्या अहंकाराचा आहे. अहंकार प्रत्येकाच्या स्वभावात आहे.  गौतम बुद्ध म्हणतात कि तुमच्या पेक्षा सर्वात  मोठा तुमचा मित्र कोणी नाही व तुमच्या पेक्षा तुमचा मोठा शत्रू कोणी नाही. सत्कृत्दर्शनी अत्यंत विरोधाभासी वाटते. तुम्हीच मित्र आणि तुम्हीच तुमचे शत्रू कसे शक्य आहे? अगदी सोपे त्रैराशिक! मी (-) अहंकार = तुम्ही तुमचे मित्र , तर मी (+) अहंकार = तुम्ही तुमचे शत्रू. बघा, जमतंय का. हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे.
तसे पाहिले तर प्रत्येक बाब हि आपल्यावरच अवलंबून असते. आपण या पृथ्वीतलावर जगतो आणि मेल्यानंतर स्वर्गात जाण्याच्या गोष्टी करतो. परंतु जिथे आपण आपले अवघे जीवन व्यतीत करतो त्या पृथ्वीला स्वर्ग बनवण्याचा विचारसुद्धा आपल्या मनात येत नाही. मेल्याशिवाय स्वर्ग नाही पण मरणाची तयारी नाही. मग स्वर्ग कसा मिळणार? ‘सदेह स्वर्गारोहण’? व्वा! व्वा! छान कल्पना! आम्ही "म" च्या ऐवजी "मा" करायला तयार. एक धर्म दुसऱ्या धर्मावर कुरघोडी करत एकमेकांना मारू लागले तरी बेहेत्तर.
कबीरदासजी म्हणतात,
 घुंगट के पट खोल रे तोहे पिया मिलेंगे, 
घट घट मे वो साई रमता कटुक वाचन मत बोल रे, तोहे पिया मिलेंगे.'

       कबीरदासजी वरील दोह्यातून हीच संकल्पना मोठ्या कल्पकतेने आमच्या पुढे सादर करतात.  कबीराच्या प्रत्येक शब्दाचा आनंद लुटता येतो. घुंगट, पदर जेव्हा डोळ्यावर असतो तेव्हा आम्हाला हे भौतिक  जग दिसत नाही. सर्वदूर अंधार दिसतो, भीती निर्माण होते, आत्मविश्वास डळमळतो.  अन अहंकाररूपी पदर जर आंतरिक डोळ्यावर असला तर......  आम्हाला परमात्मा कसा दिसेल? आणि या परमात्म्याचे दर्शन झाले कि तेथे अंधार राहील का? सगळीकडे प्रकाशच प्रकाश, तेजच तेज. जणू स्वर्गच!
येशू ख्रिस्ताला जेव्हा विचारले कि स्वर्गात कोण जाईल? तर क्रीस्ताने एका लहान मुलाला उचलले आणि म्हणाला, 'हा जाईल '  याचाच अर्थ असा कि जो लहानमुलाप्रमाणे निरागस  असेल, ज्याच्यात अहंकार नसेल,  तोच स्वर्गाचा अधिकारी.
कबीरदास पुढे म्हणतात कि, 
घट घट मे वो साई रमता, कटुक वचन मत बोल रे.तोहे पिया मिलेंगे.   
      प्रत्येकात परमात्मा वास करतो. म्हणून शरीराला परमात्म्याचे मंदिर मानले आहे. देह देवाचे मंदिर आहे. एक सुंदर उर्दू शेर आठवतो –
                       " हम तो दिल मे लिए फिरते है तस्वीरे-यार , जरासी गर्दन झुकाई और दिद कर लिए 
      आत्माराम सर्वांच्या हृदयात असतो. मात्र तो सर्वाना दिसत नाही. तस्वीरे-यारच्या/प्रियतमाच्या दर्शनसाठी गर्दन (मान) झुकविण्याची तयारी असावी लागते. परंतु आड येतो तो आमच्यातील  अहंकार.  गम्मत बघा, जर अहंकार त्यागलात तर किती सहजतेने प्रियतमाचे/आत्मारामाचे दर्शन होऊ शकेल. प्रत्येकाच्या हृदयात  परमेश्वर आहे म्हणून कोणासाठी कटू शब्दाचा उपयोग करू नका, अशीच शिकवण कबीरजी देतात. 

दत्तात्रय पटवर्धन