मी आणि बाप्या असाच एकदा अंगणात उभे होतो. आंगण स्वच्छ झाडलेले होते एव्हढ्यात झाडाचे एक पान खाली गळून पडले. बाप्या पळत गेला आणि ते झाडाचे पान उचलून आणले आणि म्हणाला , "घरात फेविकोल आहे का?"
मी म्हणालो बाप्या, "काय विचार आहे? पान परत झाडाला चिटकावण्याचा विचार तर करीत नाहीस ना?
बाप्या म्हणाला; "बिलकुल, तेच तर करायचे आहे."
मी म्हणालो, "अरे हे शक्य आहे का? काय हा वेडपटपणा ?"
त्यावर बाप्या म्हणाला, "ती जाहिरात पाहिली नाहीस का? तो आपल्या नावेतील खुर्च्या पाण्यात ढकलून देतो फक्त तिला आणि तिला बसण्यास जागा व्हावी म्हणून. हे कसे शक्य होते. खुर्च्यांना पाण्यातही काहीच होत नाही. कारण फेविकोल का जोड!"
अरे! दोन हत्ती लावले तरी तो जोड सुटत नाही. मग झाडाचं पान - कीस झाड कि पत्ती - "
आतातर आजूबाजूचे लोकही जमू लागले आणि बाप्याला वेड्यात काढू लागले. परंतु बाप्या असच काहीतरी करणार.
मी गुपचूप जाउन त्याला फेविकोल आणून दिले. त्याने पान झाडाला चिटकावण्याचा प्रयत्न केला. ते काही शक्य नव्हते. प्रयत्न फसला आणि स्वताचे हसे करून घेतले. परंतु शांत बसेल तो बाप्या कसला?
मला म्हणाला, "ती लॉरेल हार्डी ची जाहिरात आठवते का? ती पिटुकली ट्यूब . फेविकोल पेक्षा पक्का जोड. आठवलं ना, फेविक्विक!!
मी काहीही न बोलता घरात पटकन पळालो आणि फेविक्विक चे ट्यूब आणून दिली. बाप्याने पुन्हा झाडाचे पान फेविक्विक्ने जोडण्याचा प्रयत्न केला. पण निष्फळ.
तेव्हढ्यात गर्दीतून एक आजोबा म्हणाले, "बाप्या, प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे म्हणून तू वाळू रगडत बसला तरी त्यातून तेल काही गळणार नाही रे!
यावर सर्वजण हसू लागले.
हि काही बाप्याचीच कथा नाही. हि तर तुमची आमची सर्वांचीच कथा आहे.
कबीर दास जी म्हणतात, दुर्लभ मानुष जन्म है, देह न बारम्बार
कबीरदास जी म्हणतात, वृक्षावर जे पान असतं ते आपलं कार्य पूर्ण करून गळून पडतं. हे तर प्रत्येक जण जाणून आहे. म्हणूनच प्रत्येक जण बाप्याला हसत होतं. कबीर जी तर त्याही पुढे जाऊन म्हणतात, हा मनुष्य देह मिळणं दुर्मिळ आहे. हा जन्म अनमोल आहे. तो पुन्हा पुन्हा मिळत नाही. हा जन्म काहीतरी चांगल, उतुंग असं करण्यात लाव . समाज सेवा कर. अनाथांचा नाथ बनण्याचा प्रयत्न कर.
No comments: