Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Friday, November 28, 2014

0 बुद्धिबळाचा इतिहास : 2


बुद्धिबळ  या खेळाच्या इतिहासाची पाच कालखंडात  विभागणी होते. 
संस्कृत  काळ ( ए. डी.. ७०० पर्यंत चा काळ);
पर्शियन काळ ( ए. डी. ७०० ते ८०० );
अरेबिक काळ ( ए. डी. ८०० ते १००० );
मध्ययुगीन  काळ ( ए. डी. १००० ते १६०० );
आधुनिक काळ ( १६०० पासून आतापर्यंत.).
     संस्कृत काळात या खेळला चतुरंग म्हणून संबोधले जायचे. या खेळात चार खेळाडू चार रंगाच्या सोंगट्या घेऊन खेळत. या सोंगट्याचा रंग काळा, हिरवा, तांबडा, व पिवळा असे. प्रत्येक खेळाडूकडे राजा, हत्ती, घोडा, नौका तसेच चार प्यादी असायची. चार खेळाडूंपैकी एकमेकांसामोरील कर्नाट असलेले खेळाडू भागीदार/भिडू असायचे. या खेळाचा उल्लेख संस्कृत, पाली, आणि इतर बौद्ध साहित्यातही आढळतो. या सोंगट्याची पटावरील स्थिती हि आजच्या पेक्षा थोडी वेगळी  होती. नौका किवा रथ अगदी कडेला(flank), राजा तसेच मंत्री  मध्ये, घोडा मंत्र्याच्या  जवळ. उद्देश लवकरात लवकर वेगाने बाहेर येता याव म्हणून.
      हा खेळ फासा वापरून खेळला जात होता. परंतु नंतर या खेळाला जुगाराचे रूप प्राप्त झाले. लोक खेळताना आपली बोटे, हात, पाय असे अवयवही डावावर लावू लागले. ह्या जुगाराच टोकाचं सर्वश्रुत उदाहरण म्हणजे महाभारतातील पांडव, कौरव, आणि शकुनी यांनी द्यूतात केलेला  अतिरेक. पुढे कडक, राजकीय निर्बंधा मुळे चतुरंग मधून फाशाचे उच्चाटन झाले चौघा ऐवजी हा खेळ दोघांमध्ये खेळला  जाऊ लागला. दुसऱ्या बाजीरावाच्या पदरी असणाऱ्या त्रीवेन्गादाचार्यानी बुद्धिबळावर संस्कृत मध्ये 'विलासमणिमंजरी' हा ग्रंथ लिहिला.   या खेळाबद्दल एक कथा नेहमी सांगितली जाते ती –
     राजा कैद याने अनेक युद्धे केली आणि अनेक प्रांत आपल्या राज्याला जोडून घेतले. इच्छेनुसार त्याला पैसा, संपत्ती, नाव, ऐश्वर्य सर्व काही मिळाल. कोणीही शत्रू म्हणून राहिला नाही. त्यामुळे युद्ध नाही. जीवन निरस कंटाळवाणे जाऊ लागले. शेवटी त्याने फर्मान काढले कि मला जो या कंटाळवाण्या  जीवनातून बाहेर काढेल त्याला योग्य ते बक्षी दिले जाईल. अनेकांनी अनेक प्रयत्न  केले पण सर्व विफल झाले. सरते शेवटी त्याच्या मंत्र्याने विचारांती एका खेळाची मांडणी केली, राजाला तो खेळ व त्याचे नियम समजावले व स्वत: राजाशी खेळू लागला. राजाला हा युद्ध सदृश खेळ खूप आवडला.
     आता राजाची वेळ होती शब्द पाळण्याची. राजा त्या म्हणाला, " सांग तुला काय हवे? तू जे मागशील ते तुला बक्षीस रुपात दिले जाईल. मग सोन, हिरे, पैसा जे हव ते माग.  मंत्री म्हणाला, मला जास्त काही नको. एक करा, या पटावर ६४ घर आहेत, पहिल्या घरात एक गव्हाचा दाणा, दुसऱ्या घरात दोन, तिसऱ्या घरात चार, चौथ्या घरात आठ असे दाणे ठेवत  जा. अंती सर्व मिळून जेवढे दाणे होतील तेव्हडे मला द्या. दरबारातील प्रत्येक जण या मागणीमुळे  मंत्र्यावर  हसू लागले. मंत्र्याला मुर्खात काढू लागले. राजाही आश्चर्यचकित झाला व म्हणाला बस एव्हडच!!! त्याने नोकरांना मंत्र्याची इच्छा लगेच पूर्ण करण्याचे आदेश दिले. सारे नोकर कामाला लागले.
     मंत्री मूर्ख ठरला कि राजा मंत्र्याची इच्छा पूर्ण करू शकलाआपणही वही आणि पेन घेऊन पहा गव्हाचे किती दाणे मंत्र्याने राजाकडे मागितले होते? आकडा मोठा होता तर किती मोठा! आकडा लहान होता तर इतकी शुल्लक मागणी करणारा मंत्री मूर्ख होता कि महामूर्ख?  बघा,६४ पैकी किती घरातील गव्हाचे दाणे मोजता येतात ते.
      हा आलोच पुढील लेखात गव्हाच्या दाण्यांचा हिशोब घेऊन!  

No comments: