मी लहान होतो त्यावेळेस 'किशोर' मासिकाच्या अंकात एक लेखमाला प्रसिद्ध होत होती. लेखांमधील एकही अक्षर आता आठवत नाही . परंतु लेखाचा विषय व शीर्षक आजही आठवत आहे. तोच विषय व तेच शीर्षक घेऊन मी हि लेखमाला सुरु करत आहे. शीर्षक आहे " चला थोडं आडवाटेने जाऊ या!" आणि विषय आहे 'वैदिक गणित" यात चटपट आकडेमोड कशी करावी याच्या वेदकालीन गणिताच्या पद्धतींवर भर दिलेली असेल. गणिताच्या जंगलात शिकारीला जायचे असेल तर सूत्रांची एके ४७ खांद्यावर घेऊन जावी लागते. या एके ४७ मध्ये पाढ्यांच्या गोळ्यांचा पट्टा असावा लागतो. जर हि कौशल्ये असतील तर तुम्ही नक्कीच या जंगलातून एखाद्या लढवय्या प्रमाणे शिकार करून बाहेर याल. मग थोड आड वाटेने चालायला लागण्या आधी आज आपण संख्यांचा एक गमतीदार प्रकार पाहू. या संख्यांना नार्सिसस संख्या असे म्हणतात.
नार्सिसस हा ग्रीक युवक दिसायला अत्यंत सुंदर, एकदा रानावनात हिंडत असताना एका तलावाच्या काठाशी येउन बसला आणि त्याचे लक्ष पाण्यात पडलेल्या प्रतीबिम्बाकडे गेलं. त्या सुंदर प्रतीबिम्बाकडे तो पाहू लागला व बघता बघता तो स्वत:वरच लब्ध झाला. एक टक लावून तो त्या प्रतीबिम्बाकडे पाहत राहिला आणि स्वत:च्याच प्रेमात पडला. एक एक दिवस उलटत राहिला परंतु तो काही तिथून उठला नाही. असे म्हणतात कि शेवटी त्याची प्राणज्योत तेथेच मालवली. पुढे तेथे एक झाड उगवले व त्याला सुंदर फुल लागले. हे फुल सुद्धा असे कळलेले होते जणू काही ते पाण्यात त्याचे प्रतीबिबच पाहत आहे. म्हणून या फुलांना हि नार्सिसस ची फुले म्हणूनच ओळखले जाते.
गणितज्ञानी अशा संख्या शोधून काढल्या कि जणू काही त्या स्वत:च्याच प्रेमात पडल्या आहेत. व या संख्यांना त्यांनी नार्सिसस च्या संख्या म्हणून संबोधले.
आता १५३, ३७०, ३७१ या संख्या पहा. यातील अंकांच्या संख्यांची बेरीज तीच संख्या येते.
153 = १३ + ५३ + 3३३७० = 33 + 73 + 0
३७१ = ३३ + ७३ + 1३
पुढील संख्या पहा,
१६३४ = १४ + ६४ + ३४ + ४४ ४१५० = ४५ +१५ + ५५ + ०
५४८८३४ = ५६ + ४६ + ८६ + ८६ + ३६ + ४६
नार्सिसस संख्यांचे अनेक प्रकार आहेत. काही संख्यांच्या घनांची बेरीज केली असता एक नवीन संख्या मिळते व परत त्या संख्येतील अंकांच्या घनाची संख्या केली असता परत तीच संख्या मिळते. असे संख्यांचे अनेक रंग आहेत. या रंगांचीही ओळख आपण वेळोवेळी करून घेऊ.
चला मग पुढील भागापासून आपण थोडं आडवाटेने चालायला सुरवात करू.
दत्तात्रय पटवर्धन.
छान विषय निवडल्याबद्दल अभिनंदन. पुढच्या पोस्टची वाट बघत आहे.
ReplyDelete