Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Thursday, November 27, 2014

0 बुद्धिबळाचा इतिहास : 1



बुद्धिबळ म्हटले कि आपल्याला महाभारतातील शकुनी, दुर्योधन आणि पांडव यांच्या द्यूताच्या खेळाची आठवण झाल्याशिवाय होत नाही. शकुनीचा तो कपटीपणा, त्याचं महाभारत या टीव्ही धारावाहिक मधील मिश्किल हास्य डोळ्यासमोरून तरळून जातं. द्तुताचा खेळ जो महाभारतात येतो तोच तो चतुरंगचा खेळ. हाच खेळ नंतर  भारत ते पर्शिया आणि पुढे युरोप असा प्रवास करता करता शेवटी आजचा बुद्धिबळ कसा झाला हा इतिहास अगदी रमणीय आहे. भारतातून पर्शियात गेल्यावर त्याच्या सोंगट्या मध्ये कसा बदल झाला. सोंगट्या चे कसे नवीन नामकरण झाले? राणी हि पटावर केव्हा आली व युध्धामैन्दानावर धुडगूस घातला. हे वाचताना मन अगदी रमून जात.

राजकुमारी अना कॉमनेना  ( Anna Comnena ) हिने आपल्या वडिलांचं  चरित्र लिहिलं. त्यात तिने वर्णन केलं कि बुद्धिबळ हा खेळ ग्रीस मध्ये अरब्स देशातून आला. ग्रीस देशात या खेळला Zatrikion म्हटले जात होते. अरेबियांस नि हा खेळ पर्शियनकडून  घेतला  व पर्शियात हा खेळ भारतातून आला. पर्शिया मध्ये हा खेळ राजा खुसरो ने आणला ज्याने पर्शियावर ४८ वर्ष्ये राज्य केले.

याचा विचार करून जर भारतात या खेळाची मुळं तपासली तर  लक्षात येते कि हा खेळ इ.सनाच्या ३००० वर्षे पूर्वीचा आहे., भविष्य पुराणात उल्लेख आहे कि राजा युधिष्ठीर व्यासांना विचारतो कि हा खेळ कसा खेळायचा, याच्या चाली कशा आहेत?
त्यावर व्यास , सोंगट्यानची   रचना कशी करायची हे सांगतात.. नंतर राजा हा कसा महत्वाचा आणि त्याची रक्षा कशी जरुरीची हे सांगतात. फासा  फेकल्यावर जर ५ आकडा आला तर राजा किव्वा एक प्यादे सरकवायचे, जर चार आकडा आला तर हत्ती, आणि तीन आकडा आला तर घोडा तसेच दोन आकडा आल्यावर शिप (उंट) सरकवायचा." पुढे व्यास प्रत्येक सोंगट्यानची चाल समजावतात. राजा एक घर कोणत्याही दिशेला चालतो. प्यादे एक घर पुढे आणि मारताना एक घर तिरकस, पुढील घरात. हत्ती त्याच्या इच्छेनुसार आडवा/ उभा कितीही घरं चालू शकतो ( फक्त रस्ता मोकळा असणे आवश्यक आहे).
शिप (बिशप ) फक्त दोन खरं तिरकस कोणत्याची दिशेला सरकू शकतो.  आणि घोडा हा अडीच घरं चालतो. राजा हा एक घर कोणत्याही दिशेने सरकतो."
अर्थात सध्याच्या खेळात कही सोंगट्याच्या  चाली  बदलल्या  आहेत.
चतुरंग म्हणंजे सैन्याचे चार भाग. 'चतुर' म्हणजे 'चार' आणि 'अंग' म्हणजे 'भाग'.  पायदळ, घोडदल, हत्ती आणि शिप ( chariots ) , एक राजा आणि त्याचा general  यांचा मिळून हा खेळ. हिंदू पुरातन युद्धपद्धतीच  हे एक चित्र.
व्यासांच्या वरील वर्णावरून लक्षात येत कि त्याकाळी राणी हि पटावर नव्हती. त्यामुळे राणीची पटावरील धमाल नव्हती. खेळ कसा निरस असेल ना?  बिशप ची चाल हि लिमिटेड होती. फक्त हत्ती हेच एक दूर पल्ल्याचं मिसाइल होतं. याच हत्तीला  'highway lover ' असेही संबोधतात. त्यामुळे हत्ती सोडला तर बाकीच्या सोंगट्यानची चाल मर्यादितच होती म्हणून  खेळात एकप्रकारचा रटाळपणा असावा. त्या काळी भारतात इतिहास लिहिण्याचा शिरस्ता नव्हता त्यामुळे याची पाळेमुळ शोधन कठीण  जातं. परंतु सहाव्या शतकात जेव्हा हा खेळ पर्शियात गेला तेव्हा या खेळाची माहिती इतिहासात मिळते. त्याकाळी सोंगट्या चित्रात दाखवल्याप्रमाणे मांडतात.





No comments: