मी आणि बाप्या एकदा कॉफी हाउस मध्ये गेलो. महागड कॉफी हाउस असल्यामुळे कॉफी यायला उशीर होता. आमच्या इकडच्या तिकडच्या गोष्टी सुरु झाल्या. गोष्टी रंगात आल्या होत्या आणि माझ्या डोक्यात एकदम विचार आला कि आज बाप्याला विचारू त्याच्या लग्न न करण्याचे कारण. मी मौका पाहिला आणि त्याला सरळ सरळ विचारलेच.त्यावर आढावे घेत तो टाळण्याचा प्रयत्न करू लागला. "काय आपल्या नशिबातच नाही रे ? " परंतु मी हि त्याचा पिच्छा पुरवला, त्यावर जरासा चिडूनच म्हणाला , " अरे प्रत्येक गोष्टीला नशीब लागत. "कभी किसीको मुकम्मल जहां नही मिलता, कही जमीन तो कही आसमां नही मिलता ." अरे आम्हाला तर ना जमिन ना आसमान !
त्यावर मी त्याला म्हणालो ,"अरे तू तर पुष्कळ मुली पाहिल्यास ना ? मग एकही पसंत आली नाही?
बाप्या म्हणाला, " जाऊदे रे असतात एकेकाचे नशिबाचे भोग"
मी म्हणालो, " बाप्या, नशिबाच्या काय गोष्टी करतो, तूच तर सगळ्यांना नाकारलं. एकही धड वाटली नाही तुला?"
आता बाप्या मात्र चिडला म्हणाला ," नशीब नाही तर काय रे?, " I was in search of perfect wife !"
मी म्हणालो, " मग तुला कुठेच मिळाली नाही".
बाप्या, " तेच तर म्हणतोय, नशिबाचे भोग. एकही मिळाली नाही जिला मी परफेक्ट म्हणू "
मी, " एकही नाही ?" अरे तुझी एव्हढी भ्रमंती चालू असते कुठेच दिसली नाही.?
बाप्या, " अरे एकदा मिळाली होती"
"मग कुठे माशी शिंकली"
अरे, इटलीची होती ( याला इटलीचीच सापडली, भारतात कोणी नव्हतीच वाटत ) मी तिला मागणी हि घातली. तीही माझाशी पुष्कळ वेळ बोलली. व काय म्हणाली ठाऊक आहे का तुला?
मी म्हणालो, " मला कसं माहित असेल?"
अरे, तीने नकार दिला आणि म्हणाली कि I am in search of perfect husband .
मी म्हणालो बाप्या," तू आम्हाला नेहमी कबीरदास जिचा दोहा सांगतोस. आज मलाच तुला सांगावा लागतोय.
कबीरदास म्हणतात, बुरा जो देखन मै चला बुरा ना मिलिया कोय,
बाप्या perfect च्या शोधात होता. तो तरी perfect होता का? असच प्रत्येकाच असतं. आपण दुसऱ्याचे दोष शोधत असतो त्यावर चर्चा करत असतो परंतु त्याच वेळेला आपल्याकडेही चार बोटे वळलेली असतात याकडे दुर्लक्षच केलं जातं.
यातही आपला अहंकारच दुसऱ्याला दोष देण्यास तत्पर असतो. अस म्हणतात कि फोर्डने ज्यावेळेस नवीन गाडी काढली होती तेव्हा त्याला रिव्हर्स गेअर नव्हता. गाडी मागे वळवण्यास खूपच त्रास जायचा. मग रिव्हर्स गेअर्स आलेत. आपणही या रिव्हर्स गेअर चा उपयोग करा आणि आतला प्रवास सुरु करा. आपल्या मनाला टटोला, लक्षात येईल कि आपल्या इतक या जगात वाईट कोणीच नाही.
गालिब सुद्धा म्हणतोच ना,
उम्रभर 'गालिब' यही भूल करता रहा,
धूल चहरे पे थी और आइना साफ करता रहा |
असच होत असतं ना? आपल्याच चेहऱ्यावर धुळ असते आणि आपण आरसा साफ करत बसतो. आरसा साफ करता करता आयुष्य निघून जातं. कोणाच्या हे पटकन लक्षात येत तर कोणाच्या उशिराने. एखाद्याच्या तर लक्षातच येत नाही अगदी आयुष्य संपेपर्यंत. ज्याच्या लक्षात येत तो गालिब होतो नाहीतर कबीर.
No comments: