Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Monday, February 1, 2016

0 येवढा विश्वास नाही राहिला तो माणसावर



येवढा विश्वास नाही राहिला तो माणसावर 
भिंत तोडोनी म्हणे, करु या जगा शमशान सारे I

काय झाले मानवासी मानवाचा घात करतो
तो इराणी, तो इराकी, जीव घेण्या एक सारे I 

धर्म येथे आड ना ये, रंग असो कोणताही
संस्कृतीचे भान नाही, रक्त वाहो रोज सारे I

मानवाचे शौर्य सारे, एकमेकां मारणेसी
या जगाचे एक थडगेची कराया बध्द सारे I 

पाक यांची नीत कैसी, मारती भूके जनांना 
राख करणे, ध्वस्त करणे, पाकड्यांचे खेळ सारे I 

योजना कैसी तुझी आहे मला ते आकळेना 
जोडणे नाही कुठेची, तोडण्याती मग्न सारे I




        - प्रकाश पटवर्धन
        १९४२०१५  

0 क्षमता अचाट आहे, तेही अजाब आहे




क्षमता अचाट आहे, तेही अजाब आहे
स्पर्शात शब्द आहे, संवाद येथ आहे I

स्पर्शात माय आहे, स्पर्शात राय आहे
स्पर्शात नेणिवांच्या सारेच युक्त आहे I 

स्पर्शात रम्यता ती, स्पर्शात दुःख आहे
स्पर्शात या सुखाच्या सारेच लिप्त आहे I 

स्पर्शात भाव आहे, स्पर्शात ठाव आहे
स्पर्शात भव्यता ती, स्पर्शात नीच आहे I

 हा स्पर्श जीवनाचा, आविभाज्य अंग आहे 
स्पर्शाविना जगी या, अस्पर्श काय आहे !


-   प्रकाश पटवर्धन
   १५४२०१५.  

0 आज सारे आपले परकेच झाले





आज सारे आपले परकेच झाले
कोण सांगा कुणाला प्यार झाले I 

येथ सारे चिंब स्वार्थी जाहलेले
मानवाचे गोत्र त्यासी भार झाले I

मायबापा ठेवती बाहेर प्यारे
हे समाजी पापही मंजूर झालेI 

हा फुलोरा सुखवितो नेत्रास भारी
आज काट्यांचे असे ही वार झाले I 

आज दारी पाहुणे ही येत नाही 
सांत्वनी मेसेज येथे फार झाले I 

काय वर्णू येथले औदार्य देवा
वृध्द डोळे पाहुनी ते गार झाले I
 
आज श्रध्दा संपली, बाजार झाले
धर्म, प्रेषीतांचे रेटही मंजूर झाले I

हा खुला बाजार चाले दिवस राती 
येथ सारे वीर ही हो गार झाले I



-  प्रकाश पटवर्धन